विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 27 July 2024

!!! झाशीची राणी !!! भाग - १८.


 !!! झाशीची राणी !!!
भाग - १८.
सकाळी विष्णुभट जाताच दुपारी राणीसाहेबानी विश्वासु अनुचर व सेना नायक असे मोजक्याच लोकांची बैठक बोलावली.राणीसाहेब बोलण्यास सुरुवात करीत म्हणाल्या,माझ्या शूर निष्ठावान जिवलगांनो!आतां प्राण पणाला लावायची वेळ आली आहे. सगळीकडे स्वातंत्र्यसंग्राम उठाव सुरु झाला.प्रथम इंग्रजांच्या तैनातीत असलेल्या आपल्या देशी सैनिकांना आपलेसे करा.राणीसाहेब! कॅप्टन स्कीनच्या अधिन असलेलं आपलं ८८१ देशी सैन्य उठावाच्या तयारीत आहेत. आम्ही पण इंग्रजांना अनुकुल असल्याचा बहाणा चालु ठेवत अस्रशस्राना धार लावत आहोत.हरहर महादेव..जय भवानीच्या गर्जनेत दरबार संपला.इंग्रजांचा स्टारफोर्ट ह्या लहान किल्ल्यावर असलेला दारुगोळा गनिमी काव्याने हल्ला चढवुन ताब्यात घेतल्या वर कॅप्टन डनलाॅपला मोठाच धक्का बसला.तोवर इंग्रजांचे दोन बंगले जळुन खाक केले.मुख्याधीकारी बक्षी अलीने तुरुंगातील सर्व कैदी सोडुन दिले. कार्यालयातील दस्तएवज जाळले.राणीं चा जयघोष करीत हजारो सैनिकांनी किल्ल्यास वेढा घातला.आजपर्यंतचा अपमान,अवहेलना,उपेक्षा राणींवरचे अनेक अन्याय या सुडाने पेटलेले सैनिक कोणालाच आवरेनासे झाले.कांही इंग्रज अधिकारी राणींकडे येत असतां त्यांनाही तुडवले.दिल्लीवरचं इंग्रजी सरकार संपलं मेरठची छावणी जाळली.इंग्रजांना बाहेरुन कोणतीही मदत मिळत नव्हती. त्यांना मदत करणारा यमसदनी जात होता.७जुनला आत्मसमर्पनार्थ कॅप्टन स्कीनने किल्ल्यावर पांढरे निशाण फडकावले.राणीसाहेबांनी झोकनबागेत आश्रयास त्यांना पाठवले असतां काले खाॅंच्या नेतृत्वाखाली ६४ बायकामुले व कॅप्टन स्कीनला कापुन काढले. ६५ प्रेते झोकनबागेत पडले.बेफान सैनिकांनी प्रजेला लुटु,छळु नये म्हणुन एक लाखाचे दागिने राणींनी त्यांना दिले.सैनिक दिल्ली कडे राणींचा जयजयकार करत निघाले.
शासनव्यवस्था सांभाळण्यासाठी सर्वानुमते राणीसाहेबांना विनंती करण्यात आली.सर्वांची विनंती मान्य करुन राणीसाहेब म्हणाल्या,आम्हाला फक्त एकच खंत इंगज बायकामुलांना मारण्याची.ही परिस्थिती अशीच ठेवण्या साठी गनिमीकाव्याने वागणे भाग आहे. युध्दाचा सरंजाम व किल्ल्यावर तोफा सिध्द ठेवा.आपण पुर्ववत किल्ल्यावर रहावयास जाऊ त्यासाठी वास्तुशुध्दी करुन,महालक्ष्मी मंदिर,गणपती मंदिरांत अभिषेक पुजा,चौघडा,सनई, पुर्ववत सुरु करा.त्याप्रमाणे कमिशनर इरिस्कीनला पत्र जाऊ द्या.झोकनबागेतील शवांचे दफन करण्याची आज्ञा देऊन सभा संपवली.
झाशीवर राणी लक्ष्मीबाईंचे राज्य सुरु झाले.शासनाचे बागदोर आतां राणीं च्या हाती होते."मेरी झाॅंशी नही दूंगी" अशी गर्जना करत हाती आलेलं राज्य वज्रकठोर होऊन प्राणपणाने सांभाळाय चे होतं.ओरच्छा आणि दतिया राणींवर दात खाऊन असल्यामुळे किल्ला, परकोटांची दुरुस्ती करुन किल्ल्याच्या बुरुजांवर तोफा उभ्या केल्या.नव्या तोफा गोळा बारुद,शस्रे,अस्रे यांचे कारखाने धडाधड चालु झाले.सर्व जाती धर्माच्या लोकांना भेदभाव न ठेवतां सेनेत भरती करण्यांत आले.महिलांचं दल वाढविण्या त आलं.लक्ष्मीबाईच्या दूरदृष्टीचा उदोउदो होत होता.दरम्यान सागरचे कमिशनर इरिस्कीनचे घोषणापत्र आले,जोपर्यत ब्रिटिश अधिकारी व सैन्य झाशीत पोहचत नाही तोपर्यंत राणी लक्ष्मीबाई ब्रिटिश सरकारच्या नांवाने शासन सांभाळतील,सर्व वस्तुचे,मालगुजारीचे अधिकार देण्यांत आले.अशी दवंडी नगरात पिटण्यात आली.आणि त्याच वेळी मोजक्या अधिकार्यांसह गुप्त बैठक चालु होती.राणीसाहेब बोलु लागल्या..
आतां इथे ब्रिटिश कधीच पोहचणार नाही ही काळजी घेऊन अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे. फितूरांपासुन सावध राहा.नजरबाज आपले डोळे,त्यांना भरपुर बिदागी द्या. सैन्य मजबुत करा.वसुलीमधे सुट द्या. इंग्रज कधीही उठाव करुं शकतो हे पुरते लक्षात असु द्या.तात्या टोपे,नानासाहेब, रावसाहेब स्वराज्यासाठी लढत आहे. त्यांनी मेरठ,दिल्ली हस्तगत केली.इटावा मैनपुरी,नसीराबाद इथल्या देशी सैन्यांनी इंग्रजांशी असहकार पुकारला.नाना साहेबांनी इंग्रजांचे पाठीराखे असल्याचा अस्सल बहाना केल्याने,परकोट व नबाब गंज इथे असलेल्या खजिण्याच्या रक्षणार्थ व्हिलरने नानासाहेबांना आमंत्रित केले आणि नानासाहेबांनी इंग्रजांना भूलवत खजिन्यावर व दारु गोळ्यावर आपले चौकी पहारे बसविलेत असाच गनिमी कावा आपल्यालाही अनुसरायचे आहे.सावध रहा.बैठक संपली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...