विनोद जाधव एक संग्राहक

Friday 26 July 2024

*🌺!!! झाशीची राणी !!!🌺* *भाग - २.*

 


*🌺!!! झाशीची राणी !!!🌺*

*भाग - २.*

मनूचे विवाहाचे वय झालेले,त्यात फटकळ,सारे मर्दानी खेळ,कसा होईल हिचा विवाह या चिंतेने मोरोपंत ताब्यांना रात्ररात्र झोप येत नव्हती.आज सकाळी ते होमशाळेत असतांना कारभारी म्हणाले,मोरोपंत!झाशीचे राजे गंगाधर रावांसाठी योग्य कन्येचा शोध घेत, झाशीचे प्रतिनिधी तात्या दिक्षित इथे पोहोचले आहेत.तुम्ही मनूची पत्रिका त्यांना दाखवा.तात्या दिक्षितांनी मनकर्णिकाची कुंडली व पत्रिका बघीतल्यावर म्हणाले,महान राजयोग!मुलगी राणी होणार!लगेच मुलीला पाहण्याचा कार्यक्रम ठरला.
मनू थोडी भयभीत,अस्वस्थ झाल्याने तनुमावशी तीची तयारी करतां करतां समजावुन सांगु लागल्या.मनू!भाग्य तुझ्या दारी आलय,त्याचं सोनं कर. अहिल्यादेवींच्या कथा सार्थ कर!नुसती राणी न होता प्रजेची आई हो!महाराजां ची उमर तुझ्यापेक्षा अधिक,पहिली पत्नी नुकतीच निवर्तली.राणीपद म्हणजे सुवर्ण संधी!या पदामुळे सर्वाधिकार...त्याचा उपयोग दिनदुबळ्यांसाठी कर!बायकांना प्रशिक्षित करुन त्यांना धीट कर!तुझा संसार फक्त तुझ्यापुरताच न ठेवतां प्रजा हिताचे रक्षण करण्यापर्यत जाऊ दे..
अत्यंत धीटाईने मंद पावले टाकीत मनू दिवानखाण्यात प्रवेशली.तिथे उपस्थित असलेल्या थोर्यामोठ्यांना तीने वाकुन नमस्कार केला.तात्या दिक्षितांनी तीच्या हातावरच्या हस्तरेषा व पत्रिकेती ल राजयोग पाहुन आपण योग्य ठीकाणी आलो याची त्यांना खात्री पटली.तिच्या वाचनाचा दांडगा व्यासंग,शौर्याच्या खेळा तील प्राविण्य,उतुंग विचारसरणी, आणि मातेसमान असणार्या व योग्य संस्कार, मार्गदर्शन करणार्या तानुबाईबद्दलचा आदर हे सर्व पाहुन तात्या म्हणाले, गंगाधर महाराजांचे दोष सारण्याचे कसब या तेजस्वी मुलीत आम्हाला दिसताहेत.सर्वांच्या संमतीने लगेच साडी चोळी देऊन मनूबाईचा वाडःनिश्चय आणि तानुमावशीचा सत्कार केला. लग्न तिथि निश्चित झाल्यावर मनूबाईसाठी पालखी पाठवु.नानासाहेबांनी तिला थोडं चिडवल्याने वातावरण हलकेफुलके झाले.भविष्य आणि भाग्य मनूची वाट बघत होते. सर्व ठरवुन तात्या दिक्षितांनी झाशीची वाट धरली.
अत्यंत प्रमुदित मनाने राजे गंगाधरांना मुजरा करत दिक्षित म्हणाले, महाराज!ब्रम्हवर्तास मोरोपंत तांब्याची कन्या व श्रीमंत पेशवे बाजीरावांची मानसकन्या मनूबाई, सर्वगुण सपन्न, महालक्ष्मीचे रुपतेज असलेली आपल्या साठी निश्चित करुन आलोय.वैशाख पोर्णिमेचा विवाहमुहुर्त निघाल्यावर ब्रबम्हवर्तास आमंत्रणे गेलीत.अवघी झाशी नववधुसारखी सजली.काकुबाई च्या प्रशस्त वाड्यात तांबे कुटुंबाच्या राहण्याची ऊत्तम व्यवस्था करण्यात आली.जागोजागी,तोरणे,अत्तराचे सडे, फुलापाणांच्या माळा..हे सर्व पाहुन मनू बाई अचंबित झाली.
विवाहसोहळ्यास सुरुवात झाली. महाराजांकडील महिला मनूला दागिण्यां नी सजवु लागल्या.तानुमावशीकडे घाबरुन बघत म्हणाली,मावशी! मी इतके दागिणे घालुन घोड्यावर कशी बरे बसणार?या सुवर्णकैदेची तर आम्हाला शिक्षाच वाटते.
आपला प्रिय हत्ती सिध्दबध्दावर स्वार होऊन गंगाधर महाराज मनूच्या वाड्यावरुनच देवळात जातांना मनूने त्यांना झरोक्यातुन पाहिल्यावर तिच्या मनांत आदर दाटुन आला.यांच्यामुळेच आपल्याला राज्ञीपद लाभले.मनोमन ठरवलं,या संधीचं सोनं करीन. इथे कुणी दासदासी न राहतां सार्या मदतनीस असतील.श्रेष्ठ कनिष्ठ भेद असणार नाही.
विवाहासाठी निश्चित झालेले गणेश मंदिर वस्रालंकारांनी सजलेल्या प्रजेने भरुन गेले.सभामंडपाच्या मध्यभागी ऊंच बोहोलं बांधण्यात आलं.हळदीकुंकवाची तयारी,पाणसुपारी,हारगजर्याच्या दुरड्या,खणानारळाच्या ओट्या सर्व सज्ज होते.ठीकठीकाणी मोठमोठ्या समयातील ज्योती प्रकाश फेकत होत्या. दाराशी गणवेशातील इंग्रज वादकपथकां सह सज्ज होते.मनूबाई लग्नस्थळी आल्यावर उंचबोहोल्यावर वधुवर बसल्यामुळे ते सर्वांना स्पष्ट दिसत होते. सगळे मंत्रमुग्ध होऊन सालंककृत भावी राणीकडे टकमका बघत होते.मंगलाष्टक, वधूवरांवर अक्षतांचा वर्षाव...लग्नघटिका भरली.सावधानचा गजर...वाजंत्री..इतर वाद्ये,तुतार्या...त्याचवेळी किल्यावरच्या बुरुजावरुन तोफांची सलामी...त्या आवाजातच मंगळसुत्र बांधल्या गेले.वधू वरांच्या शेल्याची गाठ बांधल्या गेली. सप्तपदीनंतर वरात वाजतगाजत महा लक्ष्मी मंदिरात आली.महालक्ष्मीची ओटी भरुन तीला साडी चोळी नेसवण्यात आली.सुवर्णथाळीत महाराजांनी अंगठी ने नांव कोरले "लक्ष्मी" मनूबाईची झाली लक्ष्मीबाई....

क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...