मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Friday, 26 July 2024
*!!!झाशीची राणी लक्ष्मीबाई!!!*
*!!!झाशीची राणी लक्ष्मीबाई!!!*
*!! प्रस्तावना !!*
!! नमस्कार !!
आतांपर्यंतच्या माझ्या सर्व लिखानाला आपण सर्वांनी भरभरुन कौतुक करुन प्रोत्साहित केले.सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद! क्रिया प्रतिक्रिया अपेक्षित!
आतां आपल्यासमोर घेऊन येत आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई!धगधगती शलाका,इतिहासातील एक पर्व!स्वाभिमानाने आणि देशप्रेमाने लखलखणारी तेजोमय गाथा!इंग्रजांचा तनखा खात,त्यांचे पाय चाटत,देशाची माती त्यांच्या स्वाधीन करुन ऐषारामात जगणार्या संस्थापिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी तेजोमयी ज्योत म्हणजे झाशीची राणी!मुलाला पाठीशी बांधुन युध्दात उडी घेणारी समूर्त साहस!प्राणांवर तुळशीपत्र ठेवुन स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर अवघ्या २६ व्या वर्षाचं आयुष्य झोकुन देणारी अग्निशिखा,रणचंडी!इंग्रज सैन्यावर कडाडुन कोसळणारी,स्वातंत्र्याची आग खेडोपाडी पोहचविणारं ठिणग्यांचं झाड, विद्युल्लता!ही तेजशलाका मोरोपंत तांब्यांची कन्या!
ब्रम्हवर्त येथे शेवटचे पेशवे श्रीमंत बाजीरावांकडे त्यांचे धर्मकार्य करणारे मोरोपंत त्यांचे आश्रित!पोरवयातच आईच्या अपमृत्युने मातृविहिन झालेली मोरोपंताची कन्या मनुला बाजीराव पेशव्यांनी मानसकन्या मानुन तीला श्रेष्ठ स्थान दिले होते.तालिमखान्यातील तात्या आणि बाळागुरुजींच्या मार्गदर्शनाखाली बाजीरावांचे दत्तकपुत्र नानासाहेब, राव साहेब,बाळासाहेब या धर्मबंधुबरोबर कुस्ती,मलखांब,घोडसवारी,तलवारबाजी या मर्दानी खेळाची आवड असलेली मनु सार्या विद्येत पारंगत झाली.पेशवे तीला लाडाने छबेली म्हणत.ही छबेली अत्यंत स्पष्टवक्ती,फटकळ,अपार बुध्दी व संस्कारक्षम होती.तीचा आदर्श अहिल्या बाई होळकर होत्या.ज्ञानेश्वरांची अपार सहनशीलता असलेली तेजस्वी मनकर्णिका...मनू...छबेली पुढे झाशीची राणी झाली.लग्नानंतर या मर्दानीला पती चे विकृत वागण्याचा अतिशय मानसिक क्लेष होत होते.तरीही नंतर आलेल्या अनेक आपत्ती,स्वातंत्र्यसंग्रामाच्या कठीण परीक्षेच्या काळात ही कणखर राणी अगदी निर्धोक लढत राहिली.सागर सिंह डाकुस वेढा घालुन पकडणारी ही शूर राणी,नत्थे खाँ बरोबर झालेल्या घनघोर युध्दात सपासप तलवार चालवली.स्वतः तोफेला बत्ती देत असे. बहादूरपूरला जयाजी शिंद्यांच्या सैन्यावर अचानक छापा घालुन ते सैन्यच आपल्या कडे वळवुन घेतले.यात तिचा मुत्सद्दीपणा,शूरत्व दिसुन येते.तिचं आयुष्य म्हणजे एक तेजस्वी वाटचाल! तीचा बुध्दीवाद,देशाभिमान,देशप्रेम,यांचा गरगरणारा जणुं आकाशपाळणाच!
कटाई सराईचं युध्द लढतां लढतां राणीला विरमरण आलं.रणांगणात प्रत्यक्ष लढाईत उतरलेली ही तेजस्वी तेज शलाका!तीच्या आयुष्यात केवळ रणांचा योग असलेल्या ह्या रणयोगीनी,अवघ्या २६ वर्षाच्या आयुष्याचं रक्तदान देणार्या रणचंडीकीला कोटी कोटी प्रणाम!
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...
No comments:
Post a Comment