विनोद जाधव एक संग्राहक

Friday 9 August 2024

V…!! The Maratha's

 


V…!! The Maratha's
दक्षिणेकडील फ़्रेंच गव्हर्नर मार्टिन आपल्या रोजनिशीत जिंजी प्रदेशातील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या वादळी हालचालींन बद्दल नोंद करतो...!!
तो लिहतो :-
" या प्रदेशातील मोगल रसदींचे संरक्षण करण्याची जबाबदारी अलीमर्दानखान हा आपल्या ६०००/७००० घोडदळानिशी संभाळत असे.या महिन्यात जिंजी पायथ्याशी असलेल्या मोगली सैन्यासाठी जाणाऱ्या रसदेचे संरक्षण करण्याचे काम तो करत होता.मराठयांचा नामांकित सेनापती संताजी घोरपडे हा महाराष्ट्रातुन जिंजीच्या मदतीला आपल्या १०/१२ हजार घोडदळासह निघाला होता.त्याला ही मोगली रासदेची बातमी समजली,तेव्हा युद्धकलेत निपुण व निशांत असणाऱ्या या मराठा सेनापतीनं आपले तरबेज लष्कर मोगल रसदेच्या मार्गावरच उभे केले.त्यानं निवडलेली जगा त्याच्या लष्करी डावपेचाला अगदी अनुकूल अशी होती.शत्रू जवळ आल्याचे समजताच त्याने आपले बहुसंख्य घोडदळ मागे ठेवून तो स्वतः २/३ हजार घोडदळासह शत्रूवर चाल करून गेला.मराठयांचे घोडदळ मोगलांच्या घोडदळाहुन लहान होते.पण त्याची पर्वा न करता मराठयांनी चाल केली.थोडीशी चकमक होताच मराठयांनी माघार घेण्याचा आव आणला.मोगलांनीही मराठयांचा पाठलाग सुरू केला.संताजीची ही माघार पूर्वनियोजित होती.त्याला विजयासाठी काही अवधी हवा होता.
आपल्या पाठीवर शत्रू घेत त्याने त्यास अशा जागी आणलं की,
जिथे मराठयांचे मुख्य घोडदळ तयारीत होते.शत्रू टप्प्यात येताच मराठयांनी त्यांस सर्व बाजूंनी घेरले.मोठी धुमश्चक्री उडाली.मराठयांनी अलीमर्दाखानासह कित्येक मोगली नामांकित सरदार व व्यापारी यांना कैद केले.शिवाय ८ हत्ती ४०० उमदे घोडे,वाहतुकीची जनावरे आणि सर्व सामानसुमान त्यांच्या हाती पडले.त्या सर्वांना घेऊन मराठे जिंजी किल्ल्यात निघून गेले...!!"
जेघे शकावलीतील नोंद :-
" संताजी घोरपडे यासी पंधरा हजार स्वारानिसी राजश्री रामचंद्रपंती रवाना केले.ते चंदीस ( जिंजी ) आले.येते वेलेस
कचीजवळ ( कांचीपुरम ) अलीमर्दानखान दस्त केले.पंधरासे घोडे,हत्ती ८ पडावा केले..." ( १४ डिसेंबर १६९२ )
इंद्रजित खोरे
सर्व सरदार , शिलेदार , मावळ्यांना मानाचा मुजरा...!!
शूरवीरांच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा...!!
सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!💐💐💐
पोस्ट साभार - इंद्रजित खोरे
छायाचित्र - राम बाळासाहेब देशमुख
पोस्ट - @sarsenapati_santaji_ghorpade

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...