११ मे १७०१
लक्ष्मेश्वर
हे कर्नाटकातील तालुक्याचे ठाणे हुबळी पासून दक्षिण पूर्वेला ५४ किलोमीटर
अंतरावर आहे. लक्ष्मेश्वरला मराठी साधनांमध्ये श्री वेंकटेश देखील म्हटलेले
आहे. या लक्ष्मेश्वराजवळ ११ मे १७०१ रोजी मोगल आणि मराठ्यांचे एक भयंकर
युद्ध झाले.
गदगचा
मोगली फौजदार शेरखान हा रसद आणित होता. राणोजी घोरपडे हे आपला चुलत भाऊ
भुजंगराव हिंदुराव घोरपडे यांच्यासह मोठे सैन्य घेऊन शेरखानवर चालून गेले. ही बातमी ऐकताच शहजादा बेदरबख्त हा त्वरीत निघाला. त्याने २५ कोसाची दौड केली, त्यामुळे गडबडीत त्याचा एक हत्ती व काही घोडी वाटेत मागे राहिले. विजापूर प्रांतात लक्ष्मेश्वरजवळ बेदरबख्तने राणोजी घोरपडे यांना गाठले. तुंबळ घमासान युद्ध सुरू झाले. मराठ्यांनी आपल्या तलवारीचा हिसका मोगलांना दाखवला. राणोजी आणि भुजंगराव यांनी एकच कत्तल माजवली. बेदरबख्ताची शेरखानाला कुमक मिळाल्याने मोगलांचे बळ वाढले, तरीही राणोजी आणि भुजंगराव मागे हटेनात. लढाईत भुजंगराव घोरपडे यांनी पराक्रमाची शर्थ केली. त्यांच्या शरीरावर अशी एक जागा नव्हती जिथे जखम नव्हती.

या
युद्धात ममलकतमदार संताजी घोरपडे यांचा पुतण्या व बहिर्जी घोरपडे यांचा
मुलगा भुजंगराव हिंदुराव घोरपडे मारले गेले. मोगलांच्या कडील बरीच माणसे
ठार झाली. भुजंगराव हिंदुराव घोरपडे यांचा देह लक्ष्मेश्वरच्या पवित्र
भूमीत विसावला परंतु दुर्दैव असे की इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या या
मराठा वीराचे समाधी स्थळ देखील अज्ञातच राहिले. अशा अज्ञात वीरांची स्मारके
याच पिढीने शोधून काढावी हीच त्या वीरांना वाहिलेली खरी आदरांजली असेल.
घरादारापासून कोसो अंतर दूर स्वातंत्र्याची किंमत मोजणाऱ्या या
स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती जपून भावी पिढीला प्रेरणा मिळावी.
नक्कीच वाचा,
पुस्तक - मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा
लेखक - अमर श्रीरंग साळुंखे
@sarsenapati_santaji_ghorpade
#मराठ्यांच्या_दक्षिणेतील_पाऊलखुणा
#ममलकतमदार
#sarsenapati #santajighorpade #shivajimaharajhistory #sambhajimaharaj #karnataka #history #ghorpade #harharmahadev
No comments:
Post a Comment