विनोद जाधव एक संग्राहक

Friday 9 August 2024

१ ऑगस्ट १६९४ एका मोहिमेची बातमी

 

१ ऑगस्ट १६९४
संताजीराव घोरपडे, धनाजीराव जाधव, रामचंद्रपंत यांनी अनेक संयुक्त मोहिमा काढल्या एक मोगली बातमीपत्रात यांच्या एकत्रीत असणाऱ्या

एका मोहिमेची बातमी कळते २२ जुलै १६९४ चे बातमीपत्रात तळबीडचा ठाणेदार अडाणी याने धनाजी जाधव व हणमंतराव (निंबाळकर) ससैन्य तळबीड जवळ आले असून धामधूम माजविली आहे हे कळते सोबत संताजी घोरपडे आहेत आणि रामचंद्रपंत येऊन सामील होणार असल्याचे देखील समजते यावर बादशहाने आज्ञा केली की हिंमतखानाने जाऊन गनिमांवर हल्ला चढवावा,
याच्याच नंतर रामचंद्र अमात्य येऊन मिळाल्याने मराठ्यांची कुमक वाढली असून ते साताऱ्याच्या आग्नेयस असणाऱ्या वारूगड काबीज करण्याचा त्यांना इरादा असावा यासाठी महिमानगडाच्या किल्लेदाराने बादशहास अधिक कुमकीसाठीच अर्ज केला याची तारीख होती १ ऑगस्ट १६९४
पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा, 🙏
- रवि शिवाजी मोरे
Artist - @rambdeshmukh
@sarsenapati_santaji_ghorpade

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...