सरसेनापती संताजीराव घोरपडे यांनी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करणार्या आणि मराठेशाही उध्वस्त करू पाहणाऱ्या बादशाह औरंगजेबाच्या आलिशान, अवाढव्य आणि कडेकोट बंदोबस्त असलेल्या गूलालबाग तंबूचे तिन सोन्याचे चांदतारा अवघ्या दोन हजार स्वारानिशी हल्ला करून कापून आणून, बादशहाच्या, त्याच्या सरदारात, सैनिकात एवढेच काय? त्यांच्या घोड्याच्या उरात धडकी, दहशत बसवून मराठेशाही उध्वस्त करू पाहणाऱ्या बादशाह औरंगजेब याचे स्वप्न भंग केले. आणि पुढे... रायगडास वेढा घालून बसलेल्या इतिकादखानाच्या छावणीवर हल्ला करून पाच हत्ती ताब्यात घेवून तिन्ही बंधूंनी छत्रपती राजाराम महाराज यांचे समोर हजर केले असता, या वीरांचे शौर्य, धाडस, पराक्रम आणी स्वराज्याची सलावत वाढवणार्या वीरांना छत्रपती राजाराम महाराज यांनी संताजी यानां ममलकत मदार, बहिर्जी यानां "हिंदुराव" मालोजी यानां "अमीरूल उमराव" आणि विठोजी चव्हाण यानां "हिम्मत बहादूर" असे किताब बहाल करून गौरव करण्यात आला होता. आणि पुढे "सर्वसेना धुरंधर राजमान्य राजश्री विश्र्वानिधी सरसेनापती संताजी घोरपडे यानां" सरसेनापती पदाची वस्त्रे ममलकतमदार हे भुषण स्वरुपी पद व काळ्या पांढरया रंगाचा झेंडा देवुन स्वराज्याची पुर्णबाधणि करण्याचा विडा दिला.
तो दिवस होता" नागपंचमी इ, स. १६८९
आजही नागपंचमीच्या दिवशी सेनापती कापशी येथे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या तलवार पालखीत ठेऊन विधिवत छबीना (मिरवणूक) काडली जाते
आज त्यादिवसाची.. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची, शौर्याची आणि स्वराज्य प्रेमाची एक आठवण.. एक स्मरण,
@sarsenapati_santaji_ghorpade
No comments:
Post a Comment