विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 25 September 2024

२४ सप्टेंबर १६७९...

 


२४ सप्टेंबर १६७९...

मिन्चीनच्या पत्राला २४ सप्टेंबर रोजी उत्तर आले व मुंबईकरांनी कळवले की दौलतखानाच्या अधिपत्याखाली शिवाजीराजांचे एक मोठे आरमार खांदेरीच्या रोखाने येत असल्याची खबर हेरांकरवी मिळाली आहे तरी तूर्त सार्जंट फुलरच्या नेतृत्वाखाली आम्ही १ मचवा व सुमार १५ सैनिक पाठवत आहोत त्यांना गस्तीचा ताबा देवून आपण त्वरीत डागडुजी व नौकांच्या देखभाली करिता परत यावे.. फुलर सोबत मुंबईहून जखमींना घेवून गेलेले शिबाडही परत आले होते.. सार्जंट फुलरच्या ताब्यात गस्त देवून मिन्चीन मुंबईला परतला...

मुंबईकरांना आता पक्की खबर मिळाली की दौलतखान मोठे आरमार (सुमारे २० गुराबा) घेवून खांदेरीच्या दिशेने येत आहे तेव्हा युद्धासाठी सज्ज असे मोठे आरमार आता अनुभवी कॅप्टन रिचर्ड केग्वीन याच्या नेतृत्वाखाली खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठवण्याचा निर्णय मुंबईकरांनी घेतला. ह्या नाविक सैन्यामध्ये रिवेंज ही १ फ्रीगेट तर होतीच शिवाय २ गुराबा (यातील एकीचे नाव डव्ह होते), ३ शिबाडे, २ मचवे होते. ह्या सर्व ताफ्यावर सुमारे २०० अधिक सैनिक तसे इतर नावाडी लोक होते इंग्रजांना वाटत होते की हे आरमार पुरेसे आहे. तरी त्यांनी कॅप्टन केग्वीन ला आदेश दिले की दौलतखानाशी थेट झुंज करू नये अगोदर त्याला बेट इंग्रजांचे आहे हे पटवावे व त्याने न ऐकल्यास शक्तीचा प्रयोग करावा...

आदेशानुसार सज्ज ताफा घेवून ८ ऑक्टोबर १६७९ रोजी केग्वीन नाकेबंदीवर पोचला..१० तारखेला त्याला खबर मिळाली की दौलतखान खांदेरीच्या दिशेने येत आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...