विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 25 December 2025

भारताचा नेपोलियन यशवंतराव होळकर

 भारताचा नेपोलियन म्हणून ज्याकडे पाहतात ते म्हणजे यशवंतराव होळकर…1803 पासून 18 युद्धात त्यांनी इंग्रजांना सतत परभुतच केले.रियासतकारांच्या मते मराठेशाहीच्या अखेरीस यशवंतराव होळकर हे एक असामान्य पुरुष निर्माण झाले, भले ते विक्षिप्त, धाडसी आणि क्रूर म्हणून प्रसिद्ध असले तरी.यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली. एवढे झंझावाती, दुर्दैवाच्या आघातांनी भरलेले त्यांचे जीवन.

दौलतराव शिंदे आणि दुसरे बाजीराव यांनी मिळून यशवंतराव चे सख्खे भाऊ विठोजी होळकर यांचा काहीएक अपराध नसताना सत्तेच्या नशेत धुंद असणाऱ्या बाजीराव आणि त्याच्या साथीदारांनी विठोजीच्या हत्येचे फर्मान काढले. विठोजीला अपमानित करत साखळदंडांनी बांधून हत्तीच्या पायाशी सोडण्यात आले. पिसाळलेल्या हत्तीने विठोजीचा चेंदामेंदा करून टाकला. विठोजीच्या हत्येची बातमी यशवंतरावाला समजली आणि भावाच्या हत्येच्या बातमीने तो पेटून उठला. बाजीरावाची आणि त्याच्या साथीदारांची सत्तेची नशा उतरवण्यासाठी यशवंतराव पुण्यावर चालून आले. दौलतराव शिंद्यांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी यशवंतरावांनी दक्षिण मोहीम काढून घोरपडी, वानवडी, हडपसर व बारामती या लढायांत शिंदेव पेशवे यांच्या फौजांचा पराभव केला आणि मराठ्यांची राजधानी पुणे लुटली. भ्याड बाजीराव पुणे सोडून पळून गेला. विठोजीच्या हत्येनंतर खरेतर यशवंतराव फार दुःखी झाले होते. तरीही त्यांनी बाजीरावाशी बोलणी करण्याची तयारी केली. परंतु यशवंतराव आपणाला जिवंत सोडणार नाही असे वाटल्याने चर्चेची सारी निमंत्रणे धुडकावून बाजीरावाने पलायन केले.दुसऱ्या बाजीराव नें केलेली चुकीचे फळे आपण आजपण भोगत आहोत .त्यांनी 1803 नंतर एकही लढाई आपल्या माणसांच्या विरुद्ध लढली नाही

१७९७ ते १८११ असा फक्त चौदा वर्षांचा काळ यशवंतरावांच्या कर्तृत्वासाठी मिळाला. १७९७ ते १८०३ हा काळ यशवंतरावांना स्वत:चे राज्य व अधिकार प्रतिष्ठापित करण्यासाठी, स्वत:ची पत्नी व कन्येस कैदेतून मुक्त करण्यासाठी वेचावी लागली. १८०३ पासून त्यांनी इंग्रजांविरुद्ध र्सवकष अथक लढा उभारला आणि बलाढय़ इंग्रज सेनांना एकामागून एक वेळा पराजित केले.

पण मराठ्या आणि पेशवाई मधील कर्तृत्वान पुरुष म्हणजे शिवाजी महाराज ,संभाजी महाराज, पहिला बाजीराव ,माधवराव, महादजी शिंदे आणि नाना फडणवीस कडे पहाताना आपण या होळकर च्या महान योद्धकडे दुर्लक्ष केले आहे यात वाद नाही.

यशवंतराव होळकर यांचा जन्म १७७६ साली झाला.यशवंतराव हे मल्हारराव होळकर यांचे दत्तकपुत्र तुकोजीराव यांचे धाकटे पुत्र. .यशवंतराव हे तुकोजीराव होळकर यांना यमुनाबाई या दासीपासून झालेले पुत्र होते. त्यांना विठोजीराव हे सख्खे, तर काशीराव व मल्हारराव हे सावत्रभाऊ होते. तुकोजीरावांनंतर इंदूरच्या गादीसाठी तंटे सुरू झाले, तेव्हा काशीराव यांनी पेशव्यांचा, तर दुसऱ्या मल्हाररावांनी सर्जेराव घाटग्यांचा आश्रय घेतला. शिंदे यांच्याकडून दुसरे मल्हारराव भांबुर्ड्याच्या लढाईत मारले गेल्यानंतर (१४ सप्टेंबर १७९७) यशवंतराव व विठोजी हे पुण्यातून उत्तरेकडे पळून गेले. दुसरे मल्हाररावांचे पुत्र खंडोजी यांच्या नावे राज्यकारभार करण्याचे भासवून सर्व होळकरांना एकत्र येण्याचे आवाहन यशवंतरावांनी केले. यशवंतराव हे नागपूरच्या रघुजी भोसल्यांकडे आश्रयास गेले दुसरा बाजीराव आणि दौलतराव शिंदे यांनी रघुजी भोसल्यांस यशवंतरावांस कैद करण्यास भाग पाडले परंतु यशवंतराव मोठ्या चातुर्याने कैदेतून निसटले आणि धारच्या आनंदराव पवार यांच्याकडे तीनशे स्वारांसह चाकरीस राहिले. पुढे त्यांनी गनिमी काव्याने मध्य प्रांतातील मुलखात लुटालूट करून आसपासच्या संस्थानिकांकडून द्रव्य संपादन केले आणि त्यातून पेंढारी, भिल्ल, राजपूत, अफगाण वगैरेंची मोठी फौज तयार केली. दौलतराव शिंद्यांचा सूड घेऊन होळकरांची सत्ता पूर्ववत स्थापण्याचा त्यांचा कृतसंकल्प होता.याशवंतरे हे क्रूर, धाडसी व शूर होते. त्यांस दिल्लीच्या बादशहाने महाराजाधिराज राजराजेश्वर अलिबहादूर असा बहुमानाचा किताब दिला होता. त्या वेळी त्यांच्या तोडीचा दुसरा कोणी सेनानायक नव्हता.पण त्यांची ही समृद्धी काही लोकांच्या डोळ्यांत खुपत होती. गवाल्हेर चे शासक त्यावेळी दौलतराव शिंदे हे देखील होते. होळकर साम्राज्याची ही समृद्धी त्यांना बघवत नव्हती.

1804 च्या सुरुवातीला कर्नल fawcett ला बुंदेलखंडात हरवले.नंतर कर्नल मांसोन आणि लेऊकें ला बुंदी आणि कोटा मध्ये हरवले.

1804 मध्य ब्रिटिशनी शाह आलम 2 ला देखील कैदेत ठेवले त्यावर हल्ला करून बादशहा ला सोडवले.नंतर मेजर फ्राझेर ला यशेत राव नि हरवले.टेंव mason या ब्रिटिश योद्ध पळून गेला फरुखाबाद येथे यशवंतरावा आणि लेक, मानसीओन ,कर्नल मरे ,कर्नल दोन, जनेरल स्मिथ,कर्नल जेटलांड,जनेरल जॉन, सेटन यांच्यात तीन महिने युद्ध चालले .या युद्धाने पूर्ण भारत मध्ये यशेत राव चे कौतुक झाले त्यात एक वेळी तर यशवंतराव नि 300 ब्रिटिश सैनिकांचे नाक कापले.पण इंग्रजनी एक खेळी खेळली त्यांनी होळकर समाजाच्या तुकडे करून जो इंग्रजांना मदत करेल त्याला देण्याचे जाहीर केले.मीर पंढरी नि भवानी शंकर ने होळकर ची साथ सोडून इंग्रजांना सामील झाले.आमिर खान ला टोंक ची जहागीरदार दिल्ली तर भवानी शंकर ला दिल्ली चा काही भाग दिला…आज पण भवानी शंकर च्या दिल्ली मधील हवेली ला नमक हराम की हवेली असे ओळखतात .सररॉबर्ट लिहितात की होळकर हे युद्ध जिंकत असताना अचानकपणे जाट राजा रंजितसिंग ने इंग्रजांशी करार केला त्यामयले होलकर तिथून निघून गेले

होते.यशेतरावणी ऍक्टरोनी आणि बेरने यावर हल्ला केला.

त्यांच्या मागणीला – दोआब आणि बुंदेलखंडमधील प्रदेश द्यावा यास – ब्रिटिशांनी नकार दिला तेव्हा होळकरांच्या सैन्याने पुष्कर आणि अजमीर (अजमेर) लुटले. तसेच यशवंतरावांनी आपल्या सैन्यातील तीन ब्रिटिश अधिकाऱ्यांना( व्हिकर्स, डॉड व रियन) कंठस्नान घातले (१८०४). ब्रिगेडियर विल्यम मॉन्सनचा पराभव केला. यशवंतरावांनी गनिमी युद्धतंत्राने इंग्रजांना हैराण केले. त्यांच्याकडे ६०,००० घोडदळ, १६,००० शिपाई व १९२ बंदुका होत्या. त्यांचा सेनापती हरनाथ सिंग याने दिल्लीवर हल्ला केला. ). त्यानुसार त्यांस बुंदी टेकड्यांच्या उत्तरेकडील प्रदेश व टोंक, रामपुरा व इंदूर मिळाले. स्थिरस्थावर झाल्यावर यशवंत-रावांनी सैन्यात सुधारणा करून निरुपयोगी फौज काढून टाकली. बाणपुरा येथे तोफा ओतविण्याचा कारखाना काढला (१८०७).1806 मध्ये खंडेराव(द्वितुय)आणि काशीराव होळकर चे 1808 मधील निधन, सततचे युद्ध, अपेक्षा-भंग, तापट स्वभाव यांमुळे यशवंतरवांचा ब्रेन स्ट्रोक झाला. या व्याधीतच भानपुरा येथे त्यांचे निधन झाले. त्या काळात (१८०९–११) त्यांची उपस्त्री तुळसाबाई हीच सर्व राज्य चालवीत असे मात्र राज्य-कारभारात अनागोंदी माजली तेव्हा तिने यशवंतरावाचा औरस पुत्र तिसरे मल्हारराव (कार. १८११–३३) यांच्या नावे राज्य केले.

तळ टिपा:

1]त्याशिवाय ब्रिटिशांची अनेक पत्र आहेत

2]मराठी मध्ये ना स इनामदार यांनी त्यांच्या जीवनानावर झुंज आणि संजय सोनवणी यांनी पण सुंदर कादंबरी लिहली आहे

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...