विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 25 December 2025

दुसरे बाजीराव आणि यशवंतराव होळकर यांच्यामध्ये लढाई

 दुसरे बाजीराव आणि यशवंतराव होळकर यांच्यामध्ये लढाई 

यशवंतराव होळकर व पेशवा बाजीराव(दुसरे) यांच्या युद्ध होण्याची करणे खालीलप्रमाणे आहेत,

  • यशवंतराव यांचे वडील तुकोजीराव होळकर - Tukoji rao Holkar यांचा मृत्यू झाल्यानंतर यशवंतरावांचा मोठा भाऊ काशीराव होळकर हे होळकरांच्या गादीचे वारसदार झाले व ते दिव्यांग होते आणि पेशव्यांच्या ऐकण्यात होते. याच गोष्टीचा फायदा घेऊन पेशव्यांनी होळकरांचे राज्य आपल्या नावावर करण्यास सुरुवात केली याला यशवंतराव होळकर यांनी विरोध केला.
  • यशवंतराव हे कनिष्ठ असल्याने ते वंशगत राजा होऊ शकत नव्हते. होळकरांच्या गादीचा राजा कोण? याची अंतिम मान्यता हि पेशव्यांची असतं. त्यामुळे बाजीराव(दुसरे) यांनी यशवंतराव यांना कधीच मान्यता दिली नाही. यशवंतरावांनी मान्यता मिळावी म्हणून भरपूर पत्रव्यवहार केला पण बाजीराव यांनी त्याला दुजोरा दिला नाही. त्यातून यशवंतराव व बाजीराव यांचा संघर्ष वाढत गेला. अंतिम यशवंतरावानी स्वताचा राजतिलक करून स्वताला होळकरशाहीचे राजा घोषित केले. त्यामुळे होळकर संस्थानमध्ये दोन गट पडले. १.यशवंतराव व २.काशीराव, ज्यांना बाजीराव आणि शिंदे यांचा पाठींबा होता.
  • या संघर्षांत बाजीराव एक पाऊल पुढे चालले ते म्हणजे, यशवंतरावांची गरोदर पत्नी देवदर्शनाला जेव्हा महाराष्ट्रात आली तेव्हा त्यांच्या तळावर बाजीराव यांच्या सेन्यानी हल्ला चढून त्यांना जेरबंद केले व यशवंतराव यांच्या एका भावाला जागीच ठार केले त्याचं नाव मल्हारराव व दुसऱ्या भावाला हि जेरबंद करून काही दिवसांनी शनिवार वाड्याच्या समोर हत्तीच्या पायदळी दिले. त्यात त्यांचा मृत्यू झाला त्यांचे नाव विठोजी. विठोजी यांची हि हत्या होत होती तेव्हा अनेक पुण्यातील नागरिक तेथे उपस्तिथ होते.
  • दोन भावांची हत्या व गरोदर बायको जेव्हा शनिवार वाड्यात जेरबंद होती तेव्हा यशवंतराव हे पुण्यावर चालून आले.
  • यशवंतराव जेव्हा हडपसर येथे विजयी झाले तेव्हा बाजीराव यांनी पळ काढला. यशवंतरावांनी खूप दिवस त्यांचा पाठलाग केला. शेवटी बाजीराव यांनी इंग्रजांबरोबर वसई येथे तह केला. यशवंतरावांना जर सत्ता मिळवायची असती तर ते स्वता "पेशवे" बनले असते. अमृतरावांना का पेशवे बनवलं असत?

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...