विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 7 March 2019

" #हंबीररावांची #स्वामीनिष्ठा " भाग २

" #हंबीररावांची #स्वामीनिष्ठा "
( एका महापराक्रमी वीराची सत्यगाथा )
पोस्त सांभार : #राहुल #रमेशजी #पाटील ,
शंभूमाहीतीगार
ई-मेल : - rahulp1298@gmail.com


भाग २
#नेसरीचे #युद्ध आणि #हंसाजी : -
#आदिलशाह , स्वराज्याची भूमी जिंकण्याकरिता सतत प्रयत्न करीत होता , अशातच सन १६७३ मध्ये , आदिलशाहीतील महाकपटी सरदार ,पन्हाळा परिसराचा सुभेदार , बहलोलखान पठाण ,
१० हजारांची कडवी फौज घेऊन किल्ले पन्हाळ्यावर चालून आला , ' हि खबर लागताच , शिवरायांनी सरनौबत प्रतापराव यांच्या नेतृत्वाखाली १५ हजार सैन्य व आनंदराव , विठोजी शिंदे , कृष्णाजी भास्कर , विसो बल्लाळ , सिद्दी हिलाल या नामांकित आसामी बरोबर दिल्या होत्या . पुढे उंबराणी येथे , दि. १५ एप्रिल १६७३ रोजी , दोन्ही सैन्यात प्रचंड मोठी लढाई झाली , उत्तम रणनीतीमुळे , मराठ्यांचा विजय झाला . सरनौबतांनी , बहलोलखानाकडून मोठी खंडणी घेतली ; परंतु खानाला सोडून दिले ( कपटयाने डाव साधला ) .
हि खबर , शिवरायांना समजताच , राजांनी सरनौबतांना पत्र लिहले , " तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोलखान येतो , यांशी गांठ घालून बुडवून फत्ते करणे नाहीतर आम्हांस तोंड न दाखविणे " , असा निरोप प्रतापरावांना मिळताच , हे शब्द त्यांच्या जिव्हारी लागले .
पुढे सात महिने हुबळी व कोलपुरच्या भागात मोहीम चालू करून हुबळीची धनाढ्य पेठ लुटली . याचकाळात बहलोलखान पठाण पुन्हा स्वराज्यावर , कोल्हापूर येथे येत असल्याची खबर सरनौबतांना मिळाली . प्रतापरावांनी गडहिंग्लजजवळ १ मैलावर नेसरीच्या खिंडीत खानाच्या फौझेला सामोरे गेले , " त्यावेळी प्रतापरावांसोबत मात्र ७ वीर होते " , मराठी सेना मागे होती . ह्या शूरवीरांनी अनेक गनीम कापले ; परंतु अखेर सैन्यबलामुळे खानाने त्यांस पकडले , व कौर्याने सरनौबत प्रतापरावांस ठार मारले , " एका महान वीराचा दुर्दैवाने अंत झाला " .
यावेळी हंसाजी मोहिते , धनाजी जाधव , संताजी घोरपडे यांनी तात्काळ रणनीती आखून बहलोलखानावर आक्रमण केले . या युद्धाचे वर्णन ग्रँड डफ असे करतो कि , " हंसाजी मोहितेच्या सैन्याने अतुलनीय पराक्रम गाजविल्याने बहलोलखानाच्या सैन्याला पळ काढावा लागला " , पुढे हंसाजींनी पार विजापुरपर्यंत आदिलशाही फौझेचा पाठलाग करून , जहागिरीची नासधूस केली . कित्येक गनिमांची कत्तल केली , फार मोठी लूट मारली . यानंतर , शिवाजी महाराजांनी हंसाजी रावांस नेसरीच्या युद्धमधील केलेल्या अतुलनीय पराक्रमाबद्दल मानाची वस्त्रे आणि " हंबीरराव " हा किताब दिला , व दि. ८ एप्रिल १६७४ रोजी , चिपळूण येथे शिवरायांनी हंबीरराव यांस , स्वराज्याचे सरनौबत केले . हंबीरराव स्वराज्याचे चौथे सरनौबत झाले .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...