विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 7 March 2019

" #हंबीररावांची #स्वामीनिष्ठा " भाग ३

" #हंबीररावांची #स्वामीनिष्ठा "

( एका महापराक्रमी वीराची सत्यगाथा )

पोस्त सांभार : #राहुल #रमेशजी #पाटील ,
शंभूमाहीतीगार
ई-मेल : - rahulp1298@gmail.com

भाग ३
#हंबीरराव : -

नेसरीयेथील पराक्रमाबद्दल राजांनी ,
हंसाजींना " हंबीरराव " हा किताब दिला . हंबीरराव हा शब्द अमीरराव या अर्थाने रूढ आहे . अमीर म्हणजे श्रीमंत नव्हे तर शौर्यवान , कर्तृत्वसंपन्न या अर्थाने ओळखला जातो .

पुढे राज्याभिषेकानंतर सरनौबतांनी बहादूरगडाची मोहीम , मोगली प्रदेशात लूट , विजापुरशी संघर्ष अशा निरनिराळ्या मोहिमांवर जाऊन विजयश्री मिळविला तर पवित्रा कायम ठेविला , आणि पुढे दक्षिणदिग्विजयात बहुमोलाचे कार्य केले .

■ हंबीरराव , नेतोजी पालकर आणि दक्षिणदिग्विजय : -

हंबीरराव ( हंसाजी ) , सुरुवातीपासून हुशार होते , सैन्यात दाखल झाल्यापासून त्यांचे उत्तम गुण दिसून येत होते , तेच गुण हेरून शिवरायांनी नेतोजी रावांस , त्यांना विशेष प्रशिक्षण द्यावयास सांगितले . नेतोजींनी हंसाजींस गनिमी कावा , कृष्णकावा , इंगित जाणण्याची कला , निरनिराळे शस्त्र चालवीन्याचे शिक्षण , कट्यारीचा प्रसंगी ढालीप्रमाणे उपयोग , हेरगिरी , वेषांतर अशा अनेक विद्या शिकविल्या , व हंसाजींनी उत्तमरीत्या आत्मसात करून घेतल्या . पुढे दक्षिणदिग्विजयासमयी , हंबीररावांचा महापराक्रम पाहून , नेतोजी पालकरांचे मन भरून आले , दिलेल्या शिक्षणाचे सोने झाले , त्यामुळे हंबीररावांस त्यांनी
आपली एकबानी कट्यार भेट म्हणून दिली ( हंबीरराव यांनी अखेर पर्यंत हि कट्यार सोबत ठेवली होती ) ,
गुरू - शिष्याची हि महान जोडी इतिहासात अजरामर झाली [ ; परंतु खंत हि आहे कि , आम्हा त्यांच्या वारसदारांना ह्याची भ्रांतसुद्धा नाही ] .

#तेजोनिधी #मावळला : -

दक्षिणदिग्विजयानंतर , हंबीरराव मोगली प्रदेशांवर हल्ले करून ते प्रदेश लुटत होते , खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी जालनापूर लुटले . अशातच युवराज शंभूराजे स्वराज्यात परतले . पुढे किल्ले पन्हाळ्यावर शिवरायांची आणि शंभूराजांची भेट झाली . पिता - पत्रांमध्ये चर्चा झाली , पुढचं नियोजन ठरलं , व युवराजांवर कोल्हापूर प्रांताचा आणि दक्षिणदिग्विजयात जिंकलेल्या प्रांताचा कारभार तसेच जबाबदारी सोपवून , शिवराय राजधानी रायगडावर परतले . न सरनौबत मोगल प्रदेशाची लूट रायगडावर सोपवून , तळबीडला आले .

यानंतर दि. ३ एप्रिल १६८० , शनिवार , सूर्योदयानंतर दोन प्रहरांनी राजांनी किल्ले रायगडावर देह ठेविला . राजांचे अंत्यविधी सुरू झाले , " शिवरायांच्या पवित्र देहाला अग्नी देण्याचे कार्य हे भोसले घराण्यातील दूरचा नातेवाईक साबाजी भोसले याने केले " . मुळात शंभूराजांच्या अनुपस्थित अग्नी देण्याचे महापुण्याचे कार्य राजारामराजेंनी करावयास हवे होते ; परंतु सत्ताप्राप्तीसाठी त्यांनी केले नसावे किंवा करून दिले नसावे ; हिंदूसंस्कृतीनुसार मृत्यू झाल्यावर , परिवारास सुतक लागते , व १२ दिवस परिवारातील व्यक्तींनी काही व्यवहारीक कार्ये तसेच महत्वाची कार्ये करायची नसतात , पण परिवारातील राजकुमार असेल तर सिंहासनाच्या शास्त्रानुसार पुढील राजास सुतक लागता कामा नये , आणि जास्ती काळ सिंहासन रिकामे ठेवता येत नाही , राजाच्या मृत्यूनंतर लगेचच नवीन राजाच्या नावाची ग्वाही दिली जाते , हि एक प्रथा आहे ; कदाचित या प्रथेनुसारच साबाजी भोसले यास राजांच्या पवित्र देहाला अग्नी द्यायला सांगितले असावे . पुढे १५ दिवसांनी , आबासाहेब गेल्याची बातमी शंभुराजांना कळली , नंतर मंत्रीमंडळामार्फत सोयराराणी आणि कपटी अनाजीने , दि. २१ एप्रिल १६८० रोजी , राजरामास मंचकी बसविले वा मंचकरोहण केले , आणि सर्वत्र नव्या राजाची ग्वाही फिरवली . पुढे लगेचच प्रधानमंडळी ( अनाजी , मोरोपंत ) ५ हजार फौझेसह शंभुराजांना अटक करण्यास निघाले , रायगडहून प्रधानमंडळी तळबीडला गेले , त्यांच्या पक्षात हंबीररावांना सामील करण्याच्या हेतूने ते गेले होते .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...