विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 13 March 2019

मराठा साम्राज्याचे झाशी येथील सुभेदार, राजे नेवाळकर घराणे


मराठा साम्राज्याचे झाशी येथील सुभेदार, राजे नेवाळकर घराणे
हे नेवाळकर घराणे मूळचे रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील कोट या गावचे.) पूर्वी हे गाव बलवंतनगर या नावाने ओळखले जायचे. महाभारतातील चेदी वंशाचे (जयद्रथ) येथे राज्य होते.
चौदाव्या शतकात राजा वीरसिंह देव या ओर्च्छाच्या राजाने झाशीत किल्ला बांधला. राजाला समोरच्या पर्वतावर सावली (छाया) दिसली आणि तो ‘झॉई सी’ असे बुंदेली भाषेत म्हणाला. तेव्हापासून झाशी हे नाव रूढ झाले, असे म्हटले जाते. १७व्या शतकात बुंदेलखंडाचे राजे छत्रसाल यांनी बाजीरावांना मदतीसाठी बोलावले, त्या वेळी हा प्रदेश मराठ्यांकडे सुपूर्द केला. तेव्हा बाजीरावांनी नारोशंकर यांना सुभेदार नेमले. नारोशंकर होळकरांकडे आले आणि इ. स. १७३५पासून त्यांची चाकरी करू लागले. एक लढाऊ शिपाई म्हणून होळकरांनी नारोशंकरांची पेशव्यांकडे शिफारस केली. बाजीराव पेशव्यांच्या आदेशावरून नारोशंकर यांनी ओडिशाकडे कूच केले. वाटेत टिकमगड जिल्ह्यातील ओरछाच्या राजाचे नारोशंकरांशी भांडण झाले, तेव्हा त्यांनी ओरछाच्या राजाकडून अठरा लाख रुपयांचा खजिना मिळवून पेशव्यांना आणून दिला. बाजीराव पेशव्यांनी नारोशंकरांना ओरछाचा व इंदूरचा सुभेदार केले. इ. स. १७४२मध्ये पेशव्यांनी त्यांना राजेबहाद्दूर हा किताब दिला. नारोशंकरांना पेशव्यांनी दुसऱ्या कामगिरीसाठी बोलावून घेतले व झाशी नेवाळकरांकडे सोपविली. १७६६मध्ये विश्वासराव नेवाळकर सुभेदार झाले. त्यांच्याच काळात महालक्ष्मी मंदिर आणि रघुनाथ मंदिर बांधले गेले. गंगाधरराव यांच्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे.
गंगाधरराव नेवाळकर
(जीवनकाळ: इ.स.चे १९वे शतक) हे मराठा साम्राज्याचे झाशी येथील सुभेदार, राजे होते. इ.स. १८५७चा स्वातंत्र्यलढ्यातल्या सेनानी झाशीची राणी लक्ष्मीबाई या त्यांच्या पत्नी होत्या.
झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे पती होते. त्यांचात आणि लक्ष्मीबाई यांच्यात खूप वर्षाचे अंतर होते. झाशीच्या राणीचे पहिले मूल हे बालपणातच दगावले. म्हणून गंगाधरराव आणि लक्ष्मीबाई यांनी दामोदर नावाच्या मुलाला दत्तक घेतले. इ.स. १८५७ च्या भारतीय उठावापूर्वीच गंगाधरराव वारले. त्यांच्या मृयूनंतरदेखील झाशीची राणी लक्ष्मीबाई खंबीरपणे लढल्या. परंतु युद्धात ती धारातीर्थी पडली. झाशीचा लढा अपयशी ठरला आणि झाशी हे संस्थान ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जिंकले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...