झांशीची राणी लक्ष्मीबाई (लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर)
(१९ नोव्हेबर १८३५-१८ जून १८५८)
इंग्रजाविरूद्ध लढणारी १८५७ च्या उठावातील एक पराक्रमी स्त्री. पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. ही वाईच्या मोरोपंत तांबे यांची कन्या मोरोपंत हे दूसरे चिमाजी आप्पा यांचे कारभारी होते. मनूबाई हे तिचे पूर्वाश्रमीचे नाव आईच्या मृत्यूनंतर ती वडिलांबरोबर दूसर्या बाजीराव पेशव्यांकडे ब्रहयावर्तास गेली. तेथील मुक्कामात तिचे झांशीच्या गंगाधरराव नेवाळकर या संस्थानिकाबरोबर १८४२ मध्ये लग्न झाले. गंगाधरराव व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला पण तो अल्पवयीन ठरला तेव्हा मरणापूर्वी एक दिवस अगोदर गंगाधररावनी पाच वर्षाचा आपल्या घराण्यातील आनंदराव हा मूलगा दत्तक घेतला व त्याचे नाव दामोदर ठेवण्यात आले. १८५३ मध्ये गंगाधरराव मरण पावले डलहौसीने १८५४ मध्ये दत्तक पूत्र नामंजूर ठरवून झांशी संस्थान खालसा केले. या निर्णयाचा जाहीरनामा जेव्हा लक्ष्मीबाईस वाचून दाखविण्यात आला, तेव्हा तिने ‘मेरी झांशी देएंगा नही‘ असे उदगार काढले. दत्तक वारस नामंजूर केला, याबद्धलचे गार्हाणे तिने अनेक खलित्याद्धारे ब्रिटिश सरकारपूढे मांडले; पण त्याचा काहिच उपयोग झाला नाही.
अखेर झांशी संस्थान खालसा करून लक्ष्मीबाईस दरमहा रू.५,००० निवृत्तिवेतन व
राजवाडा वगैरं खाजगी मिळकत देण्यात आली. खजिन्यातील सूमारे सहा लाख
रू.रक्कम दामोदर याच्या अज्ञान दत्तक पूत्राच्या नावे ठेवण्यात येऊन झांशी
संस्थानावर ब्रिटिशांचा अंमल सूरू झाला. परतुं १८५७ च्या उठावात त्यांनी
इंग्रजांविरुद्ध लढई लढली व पराक्रम दाखविला त्यातच तिला विरगती प्राप्त
झाली.
No comments:
Post a Comment