विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 13 March 2019

झाशी, उत्तरप्रदेश येथील किल्ला








झाशी, उत्तरप्रदेश येथील किल्ला
पोस्तसांभार : https://www.sanatan.org/mr/a/28865.html
झाशी, उत्तरप्रदेश येथील हा किल्ला राजा वीरसिंह जुदेव बुंदेलाने वर्ष १६१३ मध्ये बांधला. राजा बुंदेलच्या राज्याची ही राजधानी होती. हा किल्ला १५ एकर जागेत बांधला आहे. हा किल्ला राजा गंगाधरराव नेवाळकर यांचे पूर्वज श्री नारूशंकर नेवाळकर यांना राजा जुदेव बुंदेलने भेट दिला. राजा गंगाधरराव यांच्या मृत्यूनंतर राणी लक्ष्मीबाईंनी येथूनच वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी राज्य सांभाळले. १८५८ ला ब्रिटिशांनी आक्रमण केल्यानंतर हा किल्ला ब्रिटिशांच्या कह्यात गेला. या किल्ल्याला एकूण २२ बुरुज आहेत.
झाशीची राणी सर्वोत्कृष्ट होती आणि तिच्याएवढा धैर्यवान योद्धा आपण बघितला नाही, असे ज्याच्याविरुद्ध समरांगणावर तिचा शेवटचा संग्राम झाला, त्या सेनापती सर ह्यू रोजने म्हटले आहे. झाशीच्या स्वातंत्र्यासाठी ही पलटण लक्ष्मीबाईंच्या नेतृत्वाखाली तीन मास प्राण तळहातावर घेऊन लढत होती. त्या काळातील अतिशय थोड्या अश्‍वपारख्यामंध्ये तिची गणना होत असे. घोड्यावर पक्की मांड ठोकून दोन्ही हातात तलवार घेऊन ती लढू शकत होती आणि ती शेवटी तशी लढलीही. आपण बाईमाणूस असलो, तरी एक सामर्थ्यशाली राज्यकर्ती म्हणून कोणत्याही प्रकारच्या कर्तव्यपालनात रतिभरही कमी नाही, हे तिने सिद्ध केले. आपल्या राज्यात प्रजा निर्भय, निश्‍चिंत आणि दैनंदिन व्यवहार निर्धास्तपणे करत राहील, याची काळजी ती घेई.
ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे समाधीस्थळ
वर्ष १८५७-५८ च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या वेळी झाशीवर ब्रिटिशांनी आक्रमण केल्यानंतर राणी सिंदीया राजांच्या साहाय्यासाठी येथे आली; पण तेव्हा सिंदीया राजांनी राणीला साहाय्य न केल्यामुळे राणी लक्ष्मीबाई युद्धात घायाळ झाली. नंतर स्वतःचे शरीर ब्रिटिशांच्या हाती लागू नये; म्हणून युद्धभूमीपासून दूर गेल्यानंतर राणीचा घोडा कोसळल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या महंत गंगासागर नावाच्या संन्याशाला राणीने विनंती केली, मी देहत्याग केल्यानंतर ब्रिटिशांच्या हाती माझे शरीर लागायला नको. तेव्हा महंतांनी त्यांच्या कुटीतील गवत राणी लक्ष्मीबाईंच्या पार्थिवावर घालून तिची दहनक्रिया याच ठिकाणी केली. वर्ष १९२० मध्ये भारतीय पुरातत्व विभागाने या ठिकाणी राणीचा अश्‍वारूढ पुतळा बनवला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...