विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 7 March 2019

कोंडाजी फर्जेद ची अनसुनी कहाणी भाग २

कोंडाजी फर्जेद ची अनसुनी कहाणी
पोस्त सांभार :प्रा #रवि #आत्माराम #बाविस्कर

#सिद्धीचा #महाल
भाग २
जंजीऱ्याच्या महालात कोंडाजी आपल्या सहकाऱ्यांसह राहू लागले. सिद्दीच्या गळ्यातील ताईत झाले.आणि एका ठरल्या दिवशी किल्ल्यामधील दारू कोठारास आग लावून एकच भडका उडवून द्यायचा तो बेत आता पूर्णत्वास जावयास आतूर होता. कोंडाजीचे सहकारी कामाला लागले. दूर रायगडाच्या दरबारी मुजरे स्विकारीत असलेला राजाही मधूनच हरवून सागर दिशेने नजर लावून बघत होता. आता कोंडाजीही सहकाऱ्यांसह सिद्द झाला होता. आणि विश्वासाधिन असलेल्या आपल्या त्या बटिकेस त्यांनी तो बेत सांगीतला. तेव्हा तिनेही सोबत येण्याची तयारी चालवली. मात्र तिच्या या घाईची कहानी तिच्या दासीला समजली. आणि तिने थेट सिद्दीला गाठले, आणि अचानक घातच झाला..!
ती दासी काझी महमद तालकर याची स्त्री होती. तिच्याकरवीच सिद्दीस सर्व माहिती मिळाली व लगेच त्याने कोंडाजी आणि मंडळीस कैद करण्याचा हबश्यांना हुकूम दिला. कोंडाजीसह साऱ्यांची धरपकड झाली. सिद्दी तसा क्रूरकर्माच ! त्याने लगेच हुकुम फर्मावला आणि …कोंडाजींचा शिरच्छेद करण्यात आला.सोबतींपैकी काहींना जल समाधी देण्यात आली तर धांदलात कुणी पळोन गेले. तटावरून उडी मारून खडकावर आदळून जाया झाले. स्वराज्याच्या आसमंतातील एक तारा निखळला होता... स्वराज्याच्या दुर्गाचा बुलंद बुरूजच ढासळला होता.कोंडाजींचे वर्तमान संभाजीराजांना कळताच त्यांनी पुढचे एक धाडसी पाउल उचलले. एवढ्या दिवसापासून रचलेला एक धाडसी प्रयत्न फसला होता. आता मोहिमेची सूत्रे संभाजीराजांनी आपल्या हातात घेऊन जंजीऱ्याच्या दिशेने कूच केले.संभाजीराजांनी मोहीम हाती घेतल्यापासून तोफांची तुफान सरबत्ती करून सिद्दीला जेर केले. या संबधी मुंबईकरांनी सुरातकरांना १९ जाने १६८२ रोजी पत्र पाठवलेले उपलब्ध आहे त्या मधील नोंदीनुसार – ‘सिद्दी जोपर्यंत तह करत नाही किंवा माघार घेत नाही तो पर्यंत संभाजीस शांतता मिळणार नाही असा त्याने निग्रह केला आहे’.
काही केल्या किल्ल्यात प्रवेश करणे जरुरीचे होते, किल्ल्याच्या आत प्रवेश केल्याशिवाय विजयश्री प्राप्त होऊ शकत नव्हती, जंजि-या भोवती सिद्दिचे आरमार आणि किल्ल्यातून होणारा प्रतिकार यामुळे काही प्रवेश करणे शक्य नव्हते, म्हणून संभाजी राजांनी आता सिद्दीस जेरीस आणण्यासाठी सागरात सेतू बांधण्याचा निर्णय घेतला! हे म्हणजे कल्पनेपलीकडचे होते, इतिहासा मधूनच इतिहास पाहायचा म्हटले तर जसे प्रभू रामचंद्रांनी वानर सेनेच्या मदतीने सेतू बांधून लंका प्रवेश केला तसेच थेट खाडी बुजवून सेतू बांधून जंजिरा सर करण्याचा संभाजीराजांचा मानस होता. सेतू बांधण्याचे काम सुरु झाले. लाकडाचे ओंडके, आवश्यक तेवढी साधन सामग्री मागवण्यात आली. हा प्रयोग कितपत यशस्वी होईल हा एक मोठा प्रश्नच होता, पण या कडे एक धाडसी निर्णय म्हणून पाहता येईल. सेतू बांधण्यात थोडे यश प्राप्त झाले खरे पण निसर्गचक्रापुढे कोणाचे काय चालणार ? सागरास भारती आली आणि केल्या कामावर पाणी फेरले गेले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...