विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 7 March 2019

कोंडाजी फर्जेद ची अनसुनी कहाणी भाग १

कोंडाजी फर्जेद ची अनसुनी कहाणी
पोस्त सांभार :प्रा #रवि #आत्माराम #बाविस्कर

भाग १
#स्वराज्याचे #दुसरे #छत्रपती #संभाजीराजा #सिंहासनाधिष्ट
होत नाही तोच हंबीररावांनी बुऱ्हाणपूर मारले. ती तारीख होती
३० जानेवारी १६८१आणि सोबतच राजांनी सिद्दीची कुंडली हाती घेतली होती. उंदेरीच्या जलकोटावर एक जबरदस्त हल्ला चढवला होता. पण एवढ्यातच एक वार्ता उठली." #कोंडाजी #दुष्मनास #सामिल #झाला " दगाबाज झाला" स्वराज्याची निष्ठा सोडून गनिमाच्या- सिद्दीच्या चाकरीत दाखल झाला !

बुलंद दुर्गास अगदि आतूनच सुरूंग लागावा तशी ही घटना.
शिवकाळातच कोंडाजी हा नाव मिळवून होता. पन्हाळ्याच्या वेढ्यात राजापूरकर इंग्रज काही तोफा घेऊन पैशाच्या अमिषाने सिद्दी जोहरच्या वेढ्यात सामिल झाले होते.यावेळी कोंडाजीने मोठ्या बेमालूमपणे इंग्रजांचा वेश धारण करून सिद्दी जोहरच्या तोफा निकामी केल्या होत्या. पुढे पन्हाळगड जिंकण्यास त्याने प्राणाची बाजी लावून अवघ्या ६० मावळ्यांसह पन्हाळगड एका रात्रीत सर केला होता. असा हा वीर !सिद्दीचे आश्रयस्थान ते जंजीरा. तसे जलदुर्ग कुठलाही असो तो पाण्याने सुरक्षित असतोच. शिवाय त्याजवळ पोचण्याच्या प्रयत्नात असलेल गलबत मोठ्या सहजतेने त्या जल दुर्गावरील तोफांच्या भक्षस्थानी पडत असे. अशाप्रकारे प्रत्येकच जलदुर्ग हा अभेद्य ठरत असे. म्हणूनच सन १६८२ मध्ये, सिद्दीला त्याच्या वारूळातच गाठून माराव असे योजून संभाजीराजांनी सिद्दीकडून जंजिरा जिंकण्यासाठी एका कूटनितीचा अवलंब केला. आणि यासाठी निवड करण्यात आली ती कोंडाजी फर्जंद या योद्ध्याची !ठरल्या मसलती प्रमाणे कोंडाजीं राजांची चाकरी सोडून सिद्दीस सामील झाला होता. सिद्द्यानेही या योद्ध्याचे मोठे आगत स्वागत केले.एवढेच नाहीतर सिद्दीच्या ऐषारामी- रंगेल रंगात बेमालूमपणे रंगून कोंडाजीने एक बटीकही खरेदी केली. मात्र खोल काळजाच्या त्या कप्प्यात स्वराज्याचा मानस शाबूत होता. अभेद्य जंजीऱ्याच्या दारूकोठारास आग लाऊन तो भस्म करण्याचा तो बेत त्याच्या बुद्धीत आकारास येऊ लागला होता. सापाच्या वारूळात शिरून ते उध्👌वस्त करण्याचा हा बेत म्हणजे प्राणचीच बाजी.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...