विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 7 March 2019

कोंडाजी फर्जेद ची अनसुनी कहाणी भाग ३

कोंडाजी फर्जेद ची अनसुनी कहाणी
पोस्त सांभार :प्रा #रवि #आत्माराम #बाविस्कर


भाग ३
याच दरम्यान खासा औरंगजेब संपूर्ण ताकदीने दख्खनेत उतरला होता. फेब्रु १६८२ च्या सुमारास त्याने बुऱ्हाणपूर सोडले. त्याच वेळी औरंगजेबाचा सरदार हसन अली याने आपला मोर्चा कोकणाकडे वळवला आणि कल्याण भिवंडी जाळून भस्म केले याची नोंद जेधे शकावली मधे मिळते – ‘शके १६०३ माघमासी हसनअली कल्याण भिवंडी जाळोन फिरोन गेला.
औरंगजेब दख्खनेत उतरल्यामुळे आणि त्याचे सरदार कोकणात उतरल्यामुळे संभाजीराजांना जंजिरा मोहीम अर्धवट सोडणे क्रमप्राप्त झाले. खासा दिल्लीपतीच महाराष्ट्रात आल्यामुळे संभाजीराजांसमोर मोठे आव्हान समोर उभे होते, त्यामुळे दादाजी रघुनाथ यांच्याकडे मोहिमेची सूत्रे देऊन संभाजीराजे खानाच्या समाचारास परतले ! असा हा धाडसी राजा व असे त्याचे धाडसी योद्धे ! पण संभाजीराजांसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्यात कोंडाजी फर्जंद हा प्रथमवीर ठरला !

आज मात्र या जंजिऱ्यात जो इतिहास सांगितला जातो त्यात या महावीराचे नाव कुठेच घेतले जात नाही. जंजिरा अजिंक्य म्हणून फुशारकी मारणारे सिद्यायचे वंशज खोटा इतिहास सांगत फिरतात. मात्र आजही जाऊन जंजीऱ्याच्या त्या अभेद्य तटबंदीच्या पाषाणास विचारा-ते ही सांगतील की,
आम्ही उरलो ते सिद्दीची जुल्मी सत्ता सांगावयास वा पिडित रयतेचे हाल बोलावयास नव्हे !!!
तर उरलो आम्ही तुम्हा सांगावयास बेखौफ उमद्या #छत्रपतीची चाल तूफानी व तयासाठी जान कुर्बान करणाऱ्या दिलफेक योद्ध्याची ही अमर काहानी !
कारण उरात दडलेल्या या शौर्य कथा, थंड पाण्यातील ज्वलंत व्यथा, ज्या सागराशी झुंजावयाचे धाडस
आजही देतात आम्हांस , सदैवच !!!
-प्रा #रवि #आत्माराम #बाविस्कर
|| #शौर्यशंभू |

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...