विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 7 March 2019

" #हंबीररावांची #स्वामीनिष्ठा " भाग ४

" #हंबीररावांची #स्वामीनिष्ठा "
( एका महापराक्रमी वीराची सत्यगाथा )

भाग ४
#सरनौबत #हंबीररावांसमोर #पेच : -
हंबीररावांनी प्रधानांचे योग्यप्रकारे आदरातिथ्य केले , त्यांचं बोलणं एकूण घेतलं . हंबीररावांच्या बरोबर रंगोजी ( रुपाजी ) भोसले , महादू भोपाळकर गुजर , हे सेनानी होते . शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दक्षिण जिंकण्यासाठी मोठ्या लवाजम्यासह येणार आहे अशी बातमी , सरनौबतांना मिळाली होती , तशीच चिन्हे दिसत होती . औरंगजेबाचे आव्हान फक्त शंभूराजेच परतवू शकत होते , हे हंबीररावांना ठाऊक होते ; त्यामुळे हंबीररावांनी सोयराबाई आणि प्रधानांच्या पक्षास साथ न देता , स्वराज्यहित जाणून , शंभुराजांना साथ द्यायचे ठरविले होते . सरनौबतांनी प्रधानांना गाफील ठेवून योग्य संधी मिळता , कैद करून , युवराज शंभुराजांसमोर हाजीर केले , शंभूराजांनी प्रधानांना आणि हिरोजी फर्जंद यांस कैद केली , प्रधानांचे सोबती पन्हाळगडाचे कारभारी जनार्दन हणमंते ह्यास आधीच कैद केले होते .
पुढे शंभूराजांनी स्वराज्याचा कारभार तेथुनच सुरू केला , सर्व गडावर खलिते पाठविले . हंबीररावांनी
न्यायाची बाजू घेतली , आणि आपली स्वामिनिष्ठा दाखविली . नंतर दि. १६ जानेवारी १६८१ रोजी ,
शंभूराजांचा राज्याभिषेक झाला , शंभूराजे स्वराज्याचे द्वितीय छत्रपती झाले .
#अजय #सेनापती : -
सरसेनापती हंबीरराव मोहिते , हे सुरुवातीपासून म्हणजे सन १६७४ पासून ते अखेरपर्यंत १६८७ पर्यंत सर्वच आघाड्यांवर विजयश्री घेऊन होते .विशेष म्हणजे सन १६८२-१६८७ या काळांत प्रत्येक
मोगल - मराठा युद्धात , छत्रपती शंभूराजांच्या मार्गदर्शनाखाली , उत्तम रणनीतीच्या आधारे त्यांनी विजय मिळविला . यावरून हंबीरराव हे एक अजय सेनापती होते , हे सिद्ध होते .
★ जिंकलेल्या काही महत्वाच्या मोहिमा : -
• बुर्हाणपुरची मोहीम .
• औरंगाबादची मोहीम .
• रामशेजचा लढा .
• कुलीचखानावर मात .
• शहजादा आज्जम वर विजय .
• फिरोजजंग चा पराभव .
• शहाबुद्दीन खानावर विजय .
[ सरनौबत हंबीररावांनी कित्येक नामचीन मोगली
सेनापतींना यमलोकी धाडले . मोगल सेना त्यांपुढे
हतबल झाली होती . ]
■ वाईची लढाई - #अखेरचा #लढा : -
दक्षिण हिंदुस्तानच्या इतिहासाला , सन १६८७ हे वर्ष कलाटणी देणारे वर्ष म्हणून ओळखले जाते ; कारण ह्याच वर्षी स्वराज्याचे मैत्री राष्ट्र म्हणून ओळखले जाणारे , कुतुबशाही राज्याचा शेवट झाला , स्वराज्यनिष्ठ सरनौबत हंबीरराव मोहिते यांचा वाईच्या येथे लढाईत मृत्यू झाला ; ह्या लढाईचा वृत्तांत दुर्दैवाने मराठी साधनांमध्ये उपलब्ध नाही . हंबीरराव यांच्या जाण्याने , संभाजी महाराजांचा उजवा हात नाहीसा झाला ; त्याचे शंभराजांस मोठे दुःख झाले . सरनौबत हंबीररावांनी निर्भयपणे , हिंदवी स्वराज्याची अविरत सेवा आणि रक्षण केले होते .
#छत्रपती #संभाजीराजे #नेहमी #म्हणत , " #सबुरीचे #शिवतंत्र #हे #मात्र , #मामासाहेबांकडेच #होते " .
अशा महापराक्रमी , स्वामिनिष्ठ , अजय योध्यास माझा मानाचा मुजरा ....
■ संदर्भ ग्रंथ : - शिवचरित्र , छत्रपती संभाजी महाराज ( वा. सी. बेंद्रे ) , शिवपुत्र संभाजी , संभाजी , ज्वलनज्वलंतेजस संभाजी राजा , बखरी , शिवकाल १६३० -१७०७ , ऐतिहासिक कागदपत्रे .
#राहुल #रमेशजी #पाटील ,
शंभूमाहीतीगार
ई-मेल : - rahulp1298@gmail.com

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...