कापशीकर घराणे हेच घोरपडे घराणे इतिहास
Posted by नवनाथ आहेर
भाग १
सेनापति कापशीकर नवन्याळकर घोरपडे
नवलिहाळकर ( आपण अपभ्रंषाने ‘नवन्याळकर ‘ म्हणतो ) हे घोरपडे घराणे मुळचे कोण ? आणी या घराण्याचा कापशीकर सेनापतींच्या घोरपडे घराण्याशी काही संबंध आहे काय ? “…

राजर्षी
छत्रपती शाहूमहाराजांच्या दत्तक विधानाच्या समारंभावर पहिल्यांदा ‘
जयरामराव घोरपडे नवलिहाळकर यांचे छत्रपतींच्या दरबारात आसन होते हा उल्लेख
मिळाला … मात्र हे जयरामराव घोरपडे राजपुत्र ‘ अर्थात राजस्थानी परिभाषेत ‘
राजपूत ‘ आणी महाराष्ट्रातील राजपूत घराणी यांचा अभ्यास करत असताना मला
नवलिहाळकर घोरपडे घराण्याचे उगमस्थान सापडले …
घोरपडे हे मुळचे सिसोदीया वंशीय भोसले … छत्रपती शिवाजी हाराजांचा आणी घोरपड्यांचा वंश एकच …. 1471 मध्ये कर्णसिंह , शुभकृष्ण आणी भिमसींह या तिघांनी घोरपडीच्या पाठीला दोर बांधून किल्लावर प्रवेश करुन किल्ला जिंकला त्यामुळे बहामनी सुलतान महंमद गवान याने त्यांना घोरपडे हे उपनाव दिले….. आणी तेव्हापासून कापशीकर , मुधोळकर , इचलकरंजीकर , दत्तवाडकर वगैरे सर्व घोरपडे घराण्यातील राजचिन्हावर ‘ घोरपड ‘हा प्राणी बघायला मिळतो ….
चोलराजा हे घोरपडे घराण्याचे आद्य पुरुष आणी फर्जंद शहाजीराजेंना कैद करुन विजापुरी नेणारे आदिलशाही सरदार बाजी घोरपडे यांचे आजोबा श्रीमंत पिलाजीराजे घोरपडे आणी वल्लभजी घोरपडे हे चोलराजांचे पुत्र … यापैकी पिलाजीराजे हे मुधोळकर घोरपडे आणी वल्लभजी हे वाई प्रांताचे सरदेशमुख… याच वल्लभजींचे नातू श्रीमंत म्हाळोजीराजे हे आपली स्वतःची पाचशे स्वारांची फौज घेऊन आपल्या संताजी , बहीरजी आणी मालोजी या तिन मुलांच्या सह स्वराज्यात सामील झाले …म्हाळोजीराजे हे पन्हाळा किल्ल्याचे तटसरनौबत आणी कोल्हापूर प्रांतातीलदेशमुख आणी सरदेशमुख ….. हेच कापशीकर घोरपडे … युवराज संभाजीराजे जेव्हा दिलेरखानाकडून स्वराज्यात परत आले तेव्हा त्यांना म्हाळोजीराजेंच्या संरक्षणात पन्हाळ्यावर ठेवले होते …. त्यांच्या सोबत त्यांचे पुत्र संताजी घोरपडेंनी आपल्या तलवारीने स्वराज्याच्या रक्षणासाठी थोर पराक्रम केला …
जालना शहर मराठयानी लुटले पण लूट परत आणताना रणमस्तखान या मोगल सरदाराने हल्ला केला आणि बरीच लूट परत घेउन गेला, या यूद्घात सिधोजी निंबाळकर कामी आले त्यामुळे शिवाजी महाराजांनी संताजीवर नाराज होऊन “मुजोरीयास ( मुजऱ्यास ) न येणेस ” फर्मावले … तरीही कालांतराने संताजीच्या पराक्रमाने स्वराज्याच्या निर्मितीमध्ये हातभार लावला आणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास जिंकला … छत्रपती शिवाजी महाराजांनी संताजी , बहीरजी आणी मालोजी या तिन्ही बंधुंना स्वतंत्र पथके देऊन सेनापती हंबीरराव मोहीतेयांच्यासोबत मोहीमेवर पाठवले …. त्यांना जुमलेदारी दिली … आणी सातारा जिल्ह्यात पाटीलकीची वतने दिली …

No comments:
Post a Comment