विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 14 August 2019

🚩मराठ्यांचा शौर्यगाथा भाग २🙏

🚩मराठ्यांचा शौर्यगाथा भाग २🙏🙏
भाग एक वरुन पुढे......
//जिंजीतिल मराठ्यांचा पराक्रम व शहजाद नजरकैदेत //
शहजाद कामबक्ष जिंजीच्या वेढयातील भीमसेन सक्सेना लिहिता ते असे......
गलगली (विजापूर) व जिजी दरम्यानचा दळणवळण डाक पत्र, हुकुम पूर्णतया मराठ्यांच्या मधल्या प्रदेशातील विजापूर -जिंजी हालचालींमुळे बंद पडली. औरंगजेब च्या छावणीचा वार्ता जिंजीतील मोगलीना समजेना. त्यामुळे कामबक्ष व मोगल छावणीत नाना अफवा उठू लागल्या व बादशहा वृध्दपणामुळे जिवंत आहे की नाही याबद्दल संशय सुरू झाला, यामुळे कामबक्षना त्याचे सल्लागार चा सल्ला घेतला ते म्हणतात ", मराठे फारच बलिष्ठ झाले आहेत आणि पुढे असेच लढत राहण्यात धोका आहे तरी त्याच्याशी तह करावा व सुखरुप परत जावे, हे बरे राजपुत्राने सल्ला मानला व रात्री आपले सर्व सैन्य तयार ठेवले तसेच राणी व इतर जनानखान पालख्या प्रवासी साठी तयार केल्या, वजीर आसदखानाला याचा पत्ता लागला त्यांना कामबक्षला विचारले, " या रात्रीच्या तयारीचा अर्थ काय?
कामबक्षाने सांगितले, "हेरांना बातमी आणली आहे की मराठे हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, ...
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे ९०४९७६०८८८
आसदखानाने त्याला कळविले की बातमी खोटी आहे आपले लोक पहार्यात आहेत व धोका नाही, त्यामुळे कामबक्ष थांबला पण आसदखानाने ही गोष्ट झुल्फीकारखान ला कळविली त्या वेळी झुल्फी वेढयाच्या मोर्चावर होता, त्यांना भीमसेनास लक्ष ठेवण्यासाठी सांगून तो व राय दलपत आसदखानाकडे आले ते खूपच चिंतित झाले. कारण कामबक्ष हाऔरंगजेबाचा आवडता राजपूत्र होतां पण रात्री त्यांना विचार - विनिमय केला कामबक्षना हाय खाल्ली तर वेढयावर विपरीत परिणाम होईल म्हणून कामबक्ष ला कैद करण्याचे ठरविले व झुल्फी नजरकैदेत टाकले, व झुल्फीकारखाने वेढ्यातून माघार घेण्याची ठरविले, भीमसेनने पाहिले की मराठे गुपचुप रात्री जिंजीवरून मोगल मोर्चा वर तोफा पळविण्यासाठी येतात, त्याने बंदुकीचे गोळीबार करून त्यांना पिटाळले व झुल्फीस कळविले, झुलफी ने वेढा उठविण्याचा निर्णय घेतला. ज्या तोफा परत आणता येत नाही त त्या नष्ट केल्या छावणीकडे परतताना सुध्दा मराठयाशी लढतच् यावे लागले, मराठे रोज रात्री मोगल छावणीवर हल्ल करतच होते.
धनाजी जाधव हे अगोदर देखील झाले जिजीसमोर आला त्याने वेढा घालुन बसलेल्या मोगली सैन्यावर हल्ला केला धनाजीकडे ७००० हजार सैनिक होते अचानक हल्ल्यामुळे मोगलची दाणादाण उडाली. वेढा उठवून मोगल लष्कर घाईघाईने मुख्य तळावर जमा झाले या घाईत इस्लामखान मखा धनाजीच्या तावडीत सापडला, धनाजीने मोठ्या विजयोत्सव त्याला छत्रपती राजाराम महाराज यांच्या समोर १३ डिसेंबर १६९२ रोजी हजर केला पाठोपाठ येणार सरसेनापती संताजी घोरपडे बदल मोगल सैन्य शी अंदाज आले नाही यावेळी संताजी कडे १५०००फौज घेऊन जिंजीत आले
१३ डिसेंबर रोजी धनाजी जाधव व १४ डिसेंबर रोजी सेनापती संताजी घोरपडे यांनी जिंजीच्या पायथ्याशी मोगल सैन्याचे पराभव करुन औरंगजेबाच्या छावणीत गोंधळ निर्माण केला होते व मराठे छत्रपती राजाराम महाराज यांच्या सरंक्षण करण्याचे काम तरबेज आहे त हे बादशहा ओळख न होते तर १६ डिसेंबर १६९२ रोजी झुल्फीकारखान यांना औरंगजेब च्या पुत्राशी नजरकैदेत ठेवले म्हणजे १३/१४/१५/१६ या चार दिवसांत मुघलांच्या ६० हजार सैन्याचे छत्रपती राजाराम महाराज, सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांना मोगली चा काय अवस्था बिकट केला आहे हे लक्षात घेतील तर भरपूर झाले कारण औरंगजेब नंतर सर्वात जास्त फौज वजीर आसदखान, शहजाद कामबक्ष व झुल्फीकारखान याचा कडे जिंजी वेढात होते. हे सर्वात मोठा पराभव पत्करावा लागल्याने औरंगजेब यांना हाय खाल्ली विशेषतः सेनापती संताजी घोरपडे यांनी मोगली सैन्याचे अशी कात्ल केली की झुल्फीकार खान पुन्हा संताजीचे आले हे समजलेवर पळत भई थोडे होई हिच तो झुल्फीकारखान ज्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुत्र बाल शिवाजी व महाराणी युसेबाई यांना कैद केले होते
क्रमश.... लवकरच भाग ३ देऊ
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे ९०४९७६०८८८
फोटो - सदर गंडभेरूड हे फोटो तील प्रतिमा हे आहे जो विजयनगर साम्राज्य चे व मराठ्यांचा दक्षिण विजयाचे प्रतीक आहे म्हणून टाकते आहे

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...