अहिल्यादेवीचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर
जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. तिचे वडील माणकोजी
शिंदे हे त्या गावचे पाटील होते व धनगर होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण
प्रचलित नसतानाही तिच्या वडीलांनी तिला लिहिण्या-वाचण्यास शिकवले.
मल्हारराव होळकर जे बाजीराव पेशव्यांकडील एक सरदार होते व माळवा प्रांताचे
धनी होते,ते पुण्यास जातांना चौंडीस थांबले. आख्यायिकेनुसार, ८ वर्षीय
अहिल्यादेवींना, जी,खेड्यातील देवळात सेवा करीत होती, तीस त्यांनी बघितले.
तिचे सौंदर्य व शील बघून त्यांनी,तीला स्वतःचा मुलगा खंडेराव यासाठी वधू
म्हणून आणले.
अहिल्याबाई होळकर(इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या पदवीने संबोधित करण्यात येते.
माळवा प्रांताचा कारभार त्यांनी बांधला. त्या मल्हारराव होळकरांच्या सून होत. मुलाचे मृत्युनंतर मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. भारतभरात त्यांनी अनेक मंदिरे, घाट बांधली वा त्यांचा जीर्णोद्धार केला. त्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास त्यांचे नाव दिलेले आहे.
अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हणून ओळखतात. (इ.स. १७२५ - इ.स. १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) ही भारताच्या,माळवा साम्राज्याची, होळकर घराण्याची 'तत्वज्ञानी राणी' म्हणून ओळखली जाते. तीच जन्म महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. तिने नर्मदातीरी, इंदोर च्या दक्षिणेकडील महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. अहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर यांचे इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. १२ वर्षांनंतर, तिचे सासरे मल्हारराव होळकर हेही मृत्यु पावले.तिने, आपल्या साम्राज्याचे तुंगांपासुन??रक्षण केले. ती लढाईत स्वतः सैन्याचे नेतृत्व केले.तिने,तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. ती न्यायदानासाठी प्रसिद्ध होती. एकदा तर तिने स्वतः च्या मुलास त्याच्या दंड करण्याजोग्या कामांमुळे त्यास हत्तीच्या पायदळी तुडविण्याची शिक्षा केली[ संदर्भ हवा ]. राणी अहिल्यादेवी हीने अ नेक हिंदू मंदिरांचे बांधकाम केले आणि महेश्वर,इंदोर ची सजावट केली. ती अनेक देवळांची आश्रयदाती होती.त्यात,तीने तिच्या राज्याबाहेरही अनेक मंदिरांचे व इतर अनेक तिर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यापैकी,द्वारका , गुजरात , काशी च्या पुर्वेस गंगातीरावर वाराणसी ,उज्जैन मध्य प्रदेश, नाशिक महाराष्ट्र व परळी वैद्यनाथ महाराष्ट्र याचा प्रामुख्याने समावेश आहे.सोमनाथ चे अपवित्र व ध्वस्त झालेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शिवाचे एक देऊळ बांधले जे सर्व हिंदूद्वारे अजुनही पूजिल्या जाते.
अहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर इ.स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. १२ वर्षानंतर तिचे सासरे मल्हारराव मृत्यू पावले. इ.स. १७६६पासून इ.स. १७९५ मध्ये तिच्या मृत्युपर्यंत, मल्हाररावांनी तिला प्रशासकीय व सैन्याच्या कामात तिला पारंगत केलेले होते. त्याआधाराने अहिल्याबाईने माळव्यावर राज्य केले. इ.स.च्या १८व्या शतकात, सत्तेसाठीच्या युद्धादरम्यान, मल्हाररावांनी इ.स. १७६५ मध्ये तिला लिहिलेल्या पत्रावरुन त्यांचा तिच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसुन येते.
"चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा.तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवु शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा.....कुच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा."
पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाचे मृत्युनंतर, तिने स्वतः राज्य करण्याबद्दल, तिने पेशव्यांना विनंती केली. तिने शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य तिच्या नेतृ्त्त्वाखाली काम करण्यास उत्सुक होते.
पेशव्यांनी परवानगी दिल्यावर,ज्या ब्राह्मणाने तिला विरोध केला,त्यास पुन्हा चाकरीत घेउन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करुन, तिने पूर्ण झगमटातात माळव्यास प्रयाण केले.तीने पडदा प्रथा कधीच पाळली नाही.ती रोज जनतेचा दरबार भरवीत असे व व गार्हाणे एकण्यास नेहमीच उपलब्ध असे. जरी तिची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदोर या खेड्याचा विकास करून त्याचे सुन्दर व मोठ्या शहरात रुपांतर करणे, हे अहिल्याबाइच्या अनेक योगदानांपैकी,एक होते. तिने माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सवांना प्रायोजित केले, हिंदूमंदिरात कायमस्वरुपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली, माळव्याबाहेरही,हिमालयापासुन ते दक्षिण भारताच्या अनेक तिथक्षेत्रापर्यंतच्या क्षेत्रात,तीने अनेक मंदिरे बांधली,घाट,विहिरी,तलाव व विश्रांती-गृहांचे निर्माण केले.भारतीय संस्कृती कोशात तिने केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी, गया,सोमनाथ,अयोध्या मथुरा,हरीद्वर,कांची, अवंती,द्वारका, बद्रीनारायण,रामेश्वर व जगन्नाथपुरी . अहिल्यादेवीस,सावकार,व्यापारी,शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे, परंतु,तीने त्यावर आपला अधिकार असल्याचे कधिच दर्शविले नाही.ते करांद्वारे असो वा राज्याधिकारे.वस्तुतः, तिने तिचा सर्व कारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासुन चालविला, असे दिसते.
तिच्या जनतेच्या/रयतेच्या काळजीबद्दल अनेक गोष्टी प्रचलित आहेत.तीने अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांचे पाशी ठेवण्यात मदत केली.तिने ही ही खात्री केली की कोणीही विधवा मुलगा दत्तक घेउ शकत असे.खरे म्हणजे, एका घटनेत, जेव्हा तिच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेंव्हा,तिने दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करुन, पद्धतीप्रमाणे,कपडे व दागिन्यांचा अहेर दिला.अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणुन,सन १९९६ मध्ये,इंदोरातील मुख्य नागरीकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला.तो, दरवर्षी,जनसेवेचे विशेष काम करणार्यास दिला जातो.भारताच्या पंतप्रधानांनी यातील प्रथम पुरस्कार,नानाजी देशमुखांना दिला.
भिल्ल व गोंड या तिच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद ती सोडवु शकली नाही तरीही,तीने त्यांना पहाडातील निरुपयोगी जमिन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातुन जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला.याही बाबतीत,(आंग्ल लेखक) 'माल्कोम' नुसार,तिने 'त्यांच्या सवयीवर लक्ष पुरविले' महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणु पद्य, संगीत,कला व उद्योग यांची संस्थाच होती. तिने महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशाली राम यांना आश्रय दिला.कारागीर,मुर्तीकार व कलाकारांना तिच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. तिने महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.
एकोणीसाच्या व विसाव्या शतकातील, भारतीय,इंग्रजी व अमेरीकन इतिहासकार हे मान्य करतात,कि अहिल्यादेवी होळकरांस, माळवा व महाराष्ट्रात, त्याकाळी व आताही,संताचा सन्मान दिल्या जातो.कोणत्याही अभ्यासुस ते खोडून काढण्याजोगे काहीही सापडले नाही.
अहिल्याबाई सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपर्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असे.

No comments:
Post a Comment