श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांच्या मृत्यूनंतर होळकर
साम्राज्याची(२१ जिल्हे) जबाबदारी हि विरांगना राणी अहिल्यादेवी होळकर
यांच्यावर आली. एवढया विशाल साम्राज्याचा कारभार हि एक स्त्री करत आहे, हे
पाहून अनेक आक्रमणे होळकर साम्राज्यावर झाली व ती राणी अहिल्यादेवी होळकर
यांनी हत्तीवर स्वार होऊन परतावून लावली.
मांडवगण ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर येथील किल्ले सदृश्य होळकर वाड्यात राणी
अहिल्यादेवी होळकर मुक्कामी असताना त्यांचा हत्ती मरण पावला. हि हत्तीची
समाधी होळकर वाड्याच्या पाठीमागील बाजूस स्थित असून उपेक्षित अवस्थेत आहे.
हि समाधी येथील काही लोकांचा थिलर पार्टीचा अड्डा आहे. एका भव्य चौथऱ्यावर
मधोमध हत्तीची अखंड शिळेमध्ये मूर्ती बसवलेली आहे. येथील १०% च सुज्ञान
नागरिकांना माहित आहे कि हि राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या हत्तीची समाधी
आहे.
 |
राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या "भैरव" हत्तीची समाधी उपेक्षित समाधी |
चौथऱ्याच्या एका बाजूला शिलालेख होता व त्यावर हत्तीची निधन तारीख व अन्य
माहिती मोडी लिपीमध्ये होती मात्र हि समाधी दुर्लीक्षित असल्यामुळे हा
शिलालेख नष्ट झाला आहे. पुरात्तव खाते व समाजातील जबाबदार व्यक्तींनी या
समाधीच्या सुरक्षेतेसाठी विशेष पुढाकार घेऊन या ठिकाणी एकदातरी अवश्य भेट
दिली पाहिजे, नाही तर येणाऱ्या काळात हि होळकर कालीन वास्तू नष्ट झाल्या
शिवाय राहणार नाही. तसेच या वाड्याचे थोडक्यात विशेष सांगायचे म्हटले तर या
वाड्याच्या प्रमुख प्रवेशद्वारालाच दोन्ही बाजूला दोन हत्ती साखळीने
बांधले जायचे व त्या साखळ्या आजही प्रवेशद्वारामध्ये दोन्ही बाजूला आहेत व
श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(प्रथम) उत्तरेत असताना सन १७८५ ला मुघल
सेण्याचा मांडवगण वर आक्रमण झाले होते आणि राणी अहिल्यादेवी होळकर
मांडवगणला येईपर्यंत तेथील होळकरांचे सरदार देशमुख यांनी मुघल सेण्याला
लढवत ठेवले होते, आणि राणी अहिल्यादेवी महेश्वरहून मांडवगणला आल्या आणि
मुघालाचा हल्ला परतून लावला. होळकर सेनेचा विजय झाला मात्र इतिहासात या
लढाईचा कोठेहि उल्लेख आढळत नाही हे शोकांतिकाच म्हणावी लागेल.
 |
हत्तीच्या समाधीचा चोथरा |
 |
चोथऱ्यावर असलेली हत्तीची मूर्ती |
 |
हत्ती बांधले जाणारे साखळदंड |
राणी अहिल्यादेवी होळकर मांडवगणला येईपर्यंत मुघल सेन्याने वाड्याच्या
प्रमुख प्रवेश्द्वारच्या दोन्ही बुरुजाचे व उजवीकडील तटबंदीचे नुकसान केले
होते ते आज हि पहावयास मिळते. मांडवगण ला श्री सिद्धेश्वर हे प्रसिद्ध
देवस्थान असून येथेच मांडवऋषींची समाधी आहे. हा वाडा सध्या ९९ वर्षच्या
करारावर शाळेस दान दिला आहे. या स्थळाची माहिती येथील स्थानिक श्री. विशाल
वाघ यांनी दिली असून राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मांडवगणमधील इतिहासाची
माहिती हि मांडवगणमधील होळकरांचे सरदार देशमुख यांच्या घरातील वंशजांनी
दिली आहे. या ठिकाणी नक्की भेट द्या.
 |
मांडवगण येथील होळकर वाड्याची भक्कम तटबंदी |
 |
मांडवगण येथील होळकर वाड्याचे प्रवेशद्वार |
Follow Us on YouTube :
Ahilya Film
Follow Us On Facebook :
होळकर राजघराण
अधिक फोटो पहा :
https://business.facebook.com/pg/HolakaraRajagharana/photos/?business_id=264277444310632&tab=album&album_id=934425823267275
No comments:
Post a Comment