समरभूमी उंबरखिंड, २ फेब्रुवारी १६६१
उंबरखिंडीची
लढाई म्हणजे महाराज स्वतः लढलेल्या लढाईपैकी एक, एक यशस्वी लढाई जिथे केवळ
मोजक्या मावळ्यांनी २०००० च्या आसपास मुघल सैन्याला नामोहरम केले.
समरभूमी भूगोल:
उंबरखिंड
लढाईची समरभूमी जाणून घ्यावयाची असेल तर, घाटमाथ्यावर लोहगड-विसापूर ते
लोणावळा-कुरवंडे-खंडाळा पासून कोकणात खोपोली, पाली ते पेण पर्यांतच प्रदेश,
महत्वाच्या घाटवाटा जसे कि, बोरघाट (आजचा खंडाळा घाट ), कुरवंडे घाट,
सावघाट, वाघजाईघाट, सवाष्णी घाट, ताम्हाणी घाट आणि कोकणातली अंबा नदीचा
प्रवाह आणि मोक्याची जागा "उंबरखिंड" या प्रदेशाचा आधी भूगोल समजून घ्यावा
लागतो.
कोकणातील
ज्या भागात कारतलबखानास उतरायचे होते, त्यास एकतर मुळशीमार्गे किंवा
लोणावळा मार्गे खाली कोकणात उतरणे भाग होते, खानाने सल्लागारासोबत सर्व
घाटवाटांची चर्चा केली,
- बोरघाट: लोणावळा - खंडाळा - बोरघाट - खोपोली
- कुरवंडा घाट : लोणावळा - कुरवंडे - कुरवंडेघाट - चावणी - अंबानदी - उंबरे - पेण
- सवघाट : तुंग -जांभुळणे - नांदगाव - मलुष्टे -सवघाट -परळी -जांभुळपाडा - पाली
- वाघजाईघाट - कोरीगड - तैलबैला - वाघजाईघाट - ठाणाळे -पाली
- सवाष्णीघाट - कोरीगड - तैलबैला - सवाष्णीघाट - सुधागड - पाली
- ताम्हाणीघाट - मुळशी -ताम्हणी - ताम्हाणीघाट - रोहा
यापैकी
बोरघाट आणि कुरवंडेघाट जवळचे म्हणून खानाने हा मार्ग निवडला, बोरघाटाने
खाली उतरत असल्याचे भासवून अचानक खानाने कुरवंडे घाट निवडला. या कुरवंडेघाट
आणि परिसराचा भूगोल समजून घेऊया.
लोहगड
विसापूर करत आपण लोणावळा पलीकडे घाटमाथ्यावरचे शेवटचे गाव कुरवंडे इथे
पोहचतो, इथून पुढे कुरवंडे घाटाने कोकणात उतरतो.सह्याद्रीची २००० फीट उंच
भिंत खाली कुरवंडे घाटाने आपण उतरतो आणि अंबा नदीच्या पात्रातून हि अवघड
जागा कशी मोक्याची बनत जाते हे आपण पाहतो. उजव्या बाजूला सखूची ठाकूरवाडीचा
डोंगर, डावीकडे स्मारकाच्या मागचा डोंगर , पाठिमागे सह्याद्रीची मुख्य
रांग (ड्युक्स नोज ), आणि पुढे काटकोनात वळत जाणारी अंबा नदी - अश्या
परिस्तिथीत पुढे जाणारी वाट जर कोणी बंद केली तर शत्रू जाणार कुठे? या
तंत्राला नलिकायंत्रं ( bottle neck ) म्हणतात.
शाहिस्तेखान
पुण्यात तळ ठोकून होता, त्याचे हेरखाते सुद्धा तितकेच पट्टीचे होते, सोबत
रायबागन असून सुद्धा कारतलाबखान या अवघड जागी शिरला किंवा त्याला तिथे
यायला भाग पाडले गेले आणि सह्याद्रीचा पुरेपूर वापर करून मोजक्या सैन्याने
या बलाढ्य शत्रूला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. भौगोलिक परिस्तिथीचा
पुरेपूर वापर. पण हा भूगोल घरात बसून समजत नाही. भूगोल स्वतः अनुभवा लागतो
आणि भूगोल समजला की, आपोआप इतिहासाची आवड निर्माण होते.
मोहिमेबद्दल :
आपण
सुरवात करतो ते कुरवंडे गावातून - कुरवंडे गाव म्हणजे खंडाळा येथील duke’s
nose च्या पायथ्याचे गाव, या ठिकाणी गजलक्ष्मी चे शिल्प आहे. इथे आपण
लोणावळा मार्गे येऊ शकता. इथून सध्या INS शिवाजी च्या भिन्तीमुळे आपल्याला
पूर्ण वळसा घालून खाली उतरावे लागते. संपूर्ण रास्ता उताराचा आहे. रस्त्यात
इंद्रायणीचा उगम अशी एक पाटी दिसते पण नक्की इथेच इंद्रायणी चा उगम आहे का
? वाटत नाही, असो. पुढे duke कडून आपण खाली उतरायला लागतो. थोडे पुढे गेलो
कि आपल्याला खाली कोकण दिसू लागते. आंबा नदीचे पात्र आणि पलीकडे छावणी गाव
( चावणी ) दिसू लागते. सरळ सरळ खाली उतारले कि अरुंद नाळ लागते- गावकरी
तिला आंबेनाळ म्हणतात, आज इतक्या वर्षांनी आपण खात्रीने नाही सांगू शकत कि
हाच तो कुरवंडा घाट, कदाचित अगदी बाजूच्या धबधब्याच्या बाजूने उतरणारी वाट
सुद्धा हा घाट असू शकते पण सध्या पाईप लाईन गेल्यामुळे ही वाट पूर्ण मोडून
गेली आहे. खाली उतरलो कि चावणी गावी पोहचतो, इथे एक विहीर आहे - असे
म्हणतात हे विहीर शिवकालीन आहे. एक खूप विस्तीर्ण वडाचे झाड आहे. चावणी या
गावी कदाचित कारतलबखान ची छावणी पडली असावी, म्हणून छावणी चे चावणी. इथून
पुढे समरभूमी चे क्षेत्र सुरु होते, थोडे पुढे जाऊन आंबा नदी उजवीकडे वळते
आणि दोन्ही बाजूचे डोंगर जवळ येत जातात. नलिकायंत्र- बाटलीचे तोंड कसे
निमुळते होते अगदी तसेच. याच ठिकाणी नदीच्या दुसऱ्या तीरावर या
उंबरखिंडीच्या विजयाचे स्मारक आहे.
उंबरखिंडस्मारक:
'छत्रपती
शिवाजी महाराज' हे नाव समोर आले कि नेहमी एक चित्र समोर येते, ते म्हणजे
हातात धोप, वाघनखे पाठीला ढाल...या सह्याद्रीत, कडे कपारीत गनिमीकाव्याने
जेव्हा आपल्या मावळ्यांनी लढाया जिंकल्या त्यांचे मुख्य हत्यार होते -
धनुष्यबाण, गोफण, भाले, दगडगोटे .. आणि अगदी याच आवेशाचे हुबेहूब चित्र
आपल्याला उंबरखिंड स्मारकामध्ये पाहायला मिळते. धनुष्यबाण, भाले, तलवारी,
सूर्यवंशी राजाचे प्रतीक-तळपता सूर्य, सिंहाने हत्तीला गारद करतानाचे
आवेषशिल्प.. ... शुभ्र घोड्यावर संपूर्ण लढाईच्या आवेशात असलेले महाराज,
चिलखत, जिरेटोप, उजव्या हातात धोप, खांद्याला धनुष्य आणि पाठीवर बाण आणि
अश्या आवेशात महाराजांसमोर हाथ बांधून दयेची याचना करणारा हतबल
कारतालाबखान... संपूर्ण १८ किलोमीटर ची ट्रेक संपल्यावर आपण जेव्हा या
स्मारकापाशी नतमस्तक होतो तेव्हा सर्व थकवा कुठच्या कुठे निघून जातो.
धन्यवाद !
No comments:
Post a Comment