सिद्दी हिलाल
सिद्दी हिलाल हा मुळचा आफ्रिकेतील इथिओपिया या देशातला. आफ्रिकेतील
रहिवाशांना आपल्याकडे हबशी म्हणत. सिद्दी हि या हबशांची एक जमात आहे.
जेव्हा हा हिलाल ८-९वर्षांचा होता, तेव्हा त्याला भारतात गुलाम म्हणून
विक्रीस आणले गेले. याचे नशीब जरा बलवत्तर होते. कारण शहाजी राजांचे चुलत
बंधू खेळोजीराजे यांनी या गुलामाला विकत घेतले होते. त्याचा सांभाळ त्यांनी
आपल्या मुलासारखा केला. असे म्हणतात, त्याकाळी मुसलमानांना हिंदुधर्मात
घेण्याची प्रथा नव्हती नाहीतर ह्या हिलालला त्यांनी हिंदूच केले असते.
पुढे शहाजीराजांनी याला आपल्यासोबत घेऊन
लष्करी प्रशिक्षण दिले. ताकदवान आणि शूर असल्यामुळे त्यांच्या सोबत राहून
हा लष्करात साधा शिलेदार बनला. त्यानंतर याच उल्लेख अफजल खानाच्या मोहिमेत
येतो. शहाजीराजांनी याला मुद्दामून खानासोबत पाठवले होते.' खानाच्या गोटा
तील माहिती शिवाजी महाराजांना द्यायची आणि वेळ पडल्यावर त्यांना सामील
व्हायचे ' असे याला सांगण्यात आले. ८ एप्रिल१६७० च्या एका पत्रात सिद्दीचा
गुप्त माहिती पूरवण्याचा उल्लेख आला आहे. खानाने पुण्यावर हल्ला करण्यास
याला पाठवले असता तो थेट महाराजांना समिल झाला. काही ठिकाणी नोंद आहे कि,
हा खानाच्यावधानंतर शिवरायांना शरण आला होता. पण मुघल दरबाराच्या नोंदी
नुसार हा त्यापूर्वीच महाराजांना सामील झाला होता.
नोव्हेंबर १६५९रोजी शिवाजी महाराजांनी कोल्हापुरावर भगवा झेंडा फडकवला.
हि बातमी विजापूर दरबारात गेली. दरबार संतापला. त्याने शहाजीराजांवर
मनःपूर्वक प्रेम करणाऱ्या रणदुल्ला खान याचा मुलगा ' रुस्तुमेजमान ' आणि
आपल्या बापाच्या वधानंतर म्हणजेच अफजलखानाच्या वधानंतर मराठ्यांना घाबरून
पळून जाणाऱ्या 'फाजलखान ' या दोन सरदारांना कोल्हापुरावर पाठवले. यावेळी
राजे पन्हाळ्यावर होते. त्यांच्या सोबत पालकर, जगताप, इंगळे, जाधव, महाडिक व
सिद्दी हिलाल हे मातबर सरदार होते. हेरांकडून विजा पुरची खबर आली. राजांनी
जगदंबेचे दर्शन घेतले आणि कूच करण्याचा इशारा दिला. स्वतः राजे आणि
नेताजीराव आपल्या निवडक सरदारांसोबत रुस्तुम आणि फाजलच्या दहा हजार फौजेवर
चालून जाणार होते.
राजांनी सर्वाना आपापली
कामे सांगितली. ते हिलालला म्हणतात, ''जाधवराव तुम्ही आणि हिलाल यांनी
गनिमांची डावी बगल झोडपून काढायची.'' ठरल्याप्रमाणे सर्वांनी विजापुरी
फौजेवर एल्गार केला. सिद्दी हिलालाने हुकुमा प्रमाणे गनीम कापायला सुरुवात
केली. दहा हजार असून सुद्धा मराठ्यांपुढे त्यांचा निभाव लागत नव्हता.
त्यांची चौफेर दाणादाण उडाली. मराठयांचे हे रूप पाहून फाजल खान पळाला.
त्याच्या मागे रुस्तुमेजमानहि पळत सुटला. दहा हजारांच्या या बादशाही फौजेची
मराठ्यांनी पाळताभुई थोडी केली.
मार्च १६६० पन्हाळगडाच्या
पायथ्याशी सिद्दी जौहरची खूपच मोठी छावणी पडली. राजे पन्हाळ्यातच होते आणि
आता ते जौहरच्या वेढ्यात अडकले होते. वेढा फार कडक होता. मुंगी जाईल एवढीहि
जागा नव्हती. त्यातच खालून गडावर तोफा, बंदुकीचा मारा चालत होता. बघता
बघता दोन महिने लोटून गेले. जून १६६० वेढा अजूनही सुरूच होता. पण १इंच जागा
सुद्धा जौहरच्या फौजेला जिंकता आली नाही. राजे आता नेताजीरावांची वाट पाहत
होते. खूप दिवस झाले पण ते काही पन्हाळ्याकडे आले नाही. सरनौबत नेताजीराव
©Rohitsarode यावेळी विजापुरावर चालून गेले होते. विजापुरी मुलखात त्यांनी
धुमाकूळ घातला होता. बादशाह प्रचंड घाबरला होता. पण जेव्हा त्याला समजले
कि, नेताजीकडे फक्त २ हजारांची फौज आहे.तेव्हा त्याने आपली ५ हजारांची फौज
नेताजींवर रवाना केली. जोरदार युद्ध झाले. हजार मावळे कमी आले. शत्रूचे बळ
वाढत असल्या मुळे नेताजींनी तेथून पळ काढला वाटेत त्यांना बातमी कळली, '
राज पन्हाळ्यावर जौहरच्या वेढ्यात अडकून पडलत. '
इकडे राजगडावर आईसाहेब चिंतेत होत्या. किती दिवस झाले त्यांची आणि
राज्यांची भेटच झाली नव्हती. सारनौबतांची वाट पाहून त्याही थकल्या होत्या.
आणि एके दिवशी त्या ताडकन उठल्या! कमरेला पदर खोचला! आणि म्हणाल्या,
''आम्ही स्वतः जातीन जात आहोत पन्हाळ्यावर! माझ्या शिवबाला सोडवून आणायला!
कोण आहे तिकडे, आमचा युद्धवेश आणा, आमची समशेर आणा! '' आईसाहेब
जगदंबेसारख्या दिसत होत्या. युद्धवेश करून त्या सदरेवर आल्या. इतक्यात
सरनौबत नेताजीराव शिवापुरहून गडावर आले. सोबत हिलालही होता. आईसाहेब
त्यांना म्हणतात,
'' आलात, आपला राजा गनिमांच्या वेढ्यात आणि
आपण गनिमांना भिऊन पळून आलात. शाबास! आता ती तुमच्या कमरेची समशेर द्या
आम्हास. आम्ही स्वतः जात आहोत पन्हाळ्यावर. शिवबाला सोडून आणायला.''
''
नाही आईसाहेब आम्ही असताना आपण मोहिमेवर जात आहात. मग आम्ही काय बांगड्या
भरल्याय का? आपण चिंता करू नये. आई भवानी आहे पाठीशी. म्या असा जातो अन
राजांना घेऊन येतो.'' असे बोलून नेताजी आणि हिलालाने आईसाहेबांना मुजरे
घातले. ते दोघेही पन्हाळ्याच्या दिशेने निघाले.
सिद्दी
हिलालच्या सोबत त्याची पाच मुले होती. त्यापैकी एकाचे नाव उपलब्ध आहे.
सिद्दी वाहवाह. हा वाहवाह तरुण व ताकदवान होता. घोड्यावर बसलेल्या हिलालाने
आकाशाकडे पाहून प्रार्थना केली, '' या अल्ला मेरे मलिक, मैं राजासाहब को
छुडाने के लीए जा रहा हूं| मुझे एसमे फत्ते दे मरे मलिक|'' इकडे राजे फार
काळजीत होते. आपल्या वाड्यात असतांना त्यांना खबर मिळाली, '' सरनौबत
नेताजीराव आलत.'' गडाखाली जौहरवर मराठ्यांची स्वारी आली होती. जौहरने आपली
शिलकी फौज त्यांच्यावर पाठवली. पण वेढ्यातला एक माणूस सुद्धा मागेपुढे केला
नाही. हिलाल आणि वाहवाह यांनी दातखाऊन विजापुरी फौजेवर चाल केली. ते दोघे
फौजेवर तुटून पडले. शत्रूची ताकद जास्त होती. तरी हे निकराने लढू लागले.
घोड्यावर असलेल्या वाहवाहला खूप जखमा झाल्या होत्या. तो तसाच घोड्यावरून
कोसळुन खाली पडला आणि तिथेच ठार झाला. हिलाल असंख्य जखमा आपल्या अंगावर
घेऊन लढत होता. त्याने दूरवरून त्याच्या मुलाकडे पहिले. त्याला
वाचवण्यासाठी तो त्याच्याकडे धावत सुटला. पण उपयोग नव्हता वाहवाहला शत्रूने
ओढून नेले होते. हिलालही जखमांमुळे खाली पडला. हे दृश्य पाहताच मावळी फौज
चौबाजूने पळत सुटली. हिलालही जखमी अवस्थेत पळू लागला. राजांना वेढ्यातून
बाहेर काढण्याचा एक प्रयत्न फसला.
काही ठिकाणी अशी नोंद आढळते कि, त्यावेळी हिलालची
चार मुले ठार झाली होती. पाचवा यायाखान आणि तो स्वतः जखमी अवस्थेत पळाले
होते.
पुढे राजे वेढ्यातून सुटून आल्यावर त्यांनी हिलालला
सोन्याचे कडे देऊन त्याचे कौतुक केले. असेही म्हणतात कि महाराजांच्या
सांगण्या वरून हा मुघलांना मिळाला होता. १२वर्ष मोगलां सोबत राहून
त्यांच्या गुप्त बातम्या तो महाराजांपर्यंत पाठवत असे. त्यानंतर फाजलखान
मोगलांना मिळाला आणि त्याने सिद्दी हिलालचे बिंग फोडले. १८आक्टोबर १६७२
च्या एका पत्रात '' मोगलांकडून फुटून सिद्दी हिलाल शिवाजीला मिळाला आहे.''
असा उल्लेख आहे. याचा शेवटचा उल्लेख मिळतो प्रतापरावांसोबत. बहलोल खानावर
जे सात मावळे चालून गेले होते त्यात हाही होता आणि तिथेच त्याचा अंत झाला.
याचा अर्थ एकच शिवाजी महाराज हे कधीच मुस्लिम
विरोधी नव्हते. गरीब रयतेचे हाल करणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी भवानी तलवार
हाती घेतली होती. म्हणूनच मुसलमान सुद्धा त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावित
असत.
◆आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा :-
rohisthoughts@gmail.com
संदर्भ सूची :-
◆राजा शिवछत्रपती
(पृ.क्र.
४६७ - ४८२)
◆इतिहासकार डॉ.विजय कोळपे यांचे व्याख्यान
◆शिवकालीन पत्र
No comments:
Post a Comment