कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता.
या राज्यातील श्रावस्ती,कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती.
श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती.
गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते.
कोसलचा राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता.
कोसलचे राज्य मगधामध्येविलीन झाले.
2) वत्स
वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता.
कोसम म्हणजेच प्राचीन काळचे कौशांबी नगर होय.
हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते.
कौशांबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी तीन विहार बांधले होते.
राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता.
राजा उदयनानंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही. ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले.
3) अवंती
मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते.
उज्जयिनी (उज्जैन) हे नगर ही त्याची राजधानी होती.
उज्जयिनी हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते.
अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता.
अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाले.
4) मगध
बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते.
राजगृह (राजगीर) ही त्याची राजधानी होती.
महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता.
जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता.
बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते.
काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली. त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या. अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले. साहित्यातील उल्लेखांच्या आधारे असे दिसते, की इ.स.पू.6 व्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये सोळा महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यांतही कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही चार महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होत गेली.
सोळा महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे :
काशी (बनारस)
कोसल (लखनौ)
मल्ल (गोरखपूर)
वत्स (अलाहाबाद)
चेदि (कानपूर)
कुरु (दिल्ली)
पांचाल (रोहिलखंड)
मत्स्य (जयपूर)
शूरसेन (मथुरा)
अश्मक (औरंगाबादमहाराष्ट्र)
अवंती (उज्जैन)
अंग (चंपा-पूर्व बिहार)
मगध (दक्षिण-बिहार)
वृज्जी (उत्तर बिहार)
गांधार(पेशावर)
कंबोज (गांधारजवळ)
No comments:
Post a Comment