।। 16 व्या शतकातील शिवकालीन मराठा शूर सरदार कदमबांडे.।।
भाग ४
इ.स. 1710 ते 1735 हा काऴ कदमबांडे घराण्याचा सुवर्णकाऴ होता. एकाचढ एक कर्तबगार, पराक्रमी
माणसे या घरात जन्म घेत होते. या काळात त्यांनी अटकेपार झेंडे लावले. सरदार अमृतराव कदमबांडेंची दोन्ही मुले श्रीमंत सरदार रघोजीराव कदमबांडे व श्रीमंत सरदार कांताजी कदमबांडे हे मोठे पराक्रमी िनघाले..इ.स. 1720 साली सरदार कदमबांडे कातांजी कदमबांडे यांनी गुजरात भागात चढाई केली. तेथे अतुलनीय पराक्म गाजिवला. तेथून मोठी लूट ते घेऊन आले. या गुजरात स्वारीमध्ये त्यांनी 40 ते 45 उंटावर येथे धन आणले. शेवटच्या उंटावर केरसुणी आणली (केरसुणीला लक्ष्मीचा दर्जा िदलेला आहे.) असा उल्लेख आहे. श्रीमंत सरदार कांताजी कदमबांडे सोबत त्यावेऴी त्या भागातून गुजराती व मारवाडी समाज मोठया प्र्माणावर व्यापारासाठी आला. कांताजी कदमबांडेनीे नवीन पेठा वसिवल्या. सोने, चांदी व िहरे यांचे मोठमोठ्या पेठा स्थापन झाल्या. कापड उद्योगासाठी तर कदमबांडेनी मोठं उत्तेजन िदलं होत. मोठा मोमीन िवणकर समाज स्थाियक झाला. चामड्याची बाजारपेठ बहरली. अनेक व्यापारी कुटुंबे येथे स्थाियक झाली. व्यापार उिदमास येथे मोठे पो्र्त्साहन िमऴत होते. कदमबां़डे धार्िमक व मोठे दानशूर होते. त्या काळातील लघुउद्योगांना नेहमी मदतीचा हात िदला. येिथल व्यापार वाढण्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्याकाळतील ज्या- ज्या गोष्टी दैनंिदन जीवनात अत्यावश्यक म्हणून गणल्या जायच्या त्या तयार करणार्या कुशल कारािगरांची संख्या इंथ खूप मोठ्या प्रमाणात होती. रघोजीराव कदमबांडे धार्िमक वृत्तीचे होते. त्याच्याकडे मोठे सैन्य असायच. लढाईत काही सैन्य मृत्युमुखी पडायचे. ते दरवर्षी धार्िमक िवधी, शांती,यदण्य,अन्नदान करायचे. कोरठणच्या खंडोबाचा पालखीचा मान कदमबांडे घराण्यात होता.
श्रीमंत सरदार कांताजी कदमबांडे यांचेकडील घोडदऴ खूप मोठे होते. घोडे चरण्यासाठी िशरापूरचा माळ, रांधे येथील खंडोबा माळ, दरोडीचा माऴ या पट्ट्यात चारा व पाणी मुबलक असल्यामुऴे घोडदऴात उत्तम व उमेद घोडे होते. रांधे या िठकाणी मोठ्या पागा होत्या. तेथे घोड्यांची मोठी पैदास केली जात होती. अऴकुटीकरांच्या अिभमानाची गोष्ट अशी की, श्रीमंत सरदार कांताजी कदमबांडेच्या घोडदऴाचे प्र्मुख एक उमदा युवक होता. त्यांचे नाव सरदार मल्हारराव होऴकर. आश्यचर्य वाटले ना.।। मल्हारराव पूणे जहािगरीतील नेरजवळच्या होळ गावाचे धनगर समाजाचे हे पराक्र्मी युवक नोकरीच्या शोधात अळकुटी येथे आले. सरदार कांताजी कदमबांडेंच्या घोडदळाचे प्र्मुख झाले. त्यावेळी त्यांनी घोड्याच्या सरावासाठी रांधेचा खंडोबा माळ, िशरापूर, लोणीमावळा या पिरसराची मोठी रपेट मारली असेल. अळकुटीत कदमबांडेचा कारभार त्यांनी जवळून पािहला. धार्िमक व व्यापारातील सिहष्णुताही त्यांनी पािहली. या अळकुटीच्या मुशीतच त्यांना पुढील राजकारणाची पे्रणा िमळाली असेल.।। पुढे हेच मल्हारराव होळकर आपल्या पराक्माच्या जोरावर मराठेशाहीचे फार मोठे सरदार झाले..
No comments:
Post a Comment