।। 16 व्या शतकातील शिवकालीन मराठा शूर सरदार कदमबांडे.।।
भाग ५
सरदार रघोजीराव कदमबांडे व कांताजी कदमबांडे यांच्या पराक्माच्या बातम्या शाहू महाराजांपर्यंत जात होत्या. रघोजीराव कदमबांडेंचा मुलगा शूरवीर पराक्मी सरदार मल्हारराव कदमबांडे हेही खूप कर्तबगार िनघाले.. त्यांनी छञपती शाहू महाराजांचे लक्श वेधून घेतले. शाहू महाराजांनी आपल्या मुलीसीठी मल्हाररावांसाठी मागणी घातली. छञपतीची नात आपल्या घरची सून होणार यामुऴे रघोजीरावांना खूप आनंद झाला. अऴकुटी शहरात हत्तीवरुन साखर वाटण्यात आली. छञपती शांहूची मुलगी गजराराजे भोसले व श्रीमंत सरदार रघोजीरावांचा मुलगा सरदार मल्हारराव कदमबांडे यांचा शाही विवाह सातारजवळच्या वडगावला मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. दोन्ही घराण्यातील तालेवार मंडळी या िववाहाला हजर होती. अशा तरे्हने सातारच्या गजराराजे भोसले या अळकुटीच्या सुनबाई झाल्या..
हैदराबादच्या िनजामाने मराठी मुलुखात चढाया चालू केल्या होत्या. सरदार दाभाडे, सरदार कांताजी कदमबांडे, सरदार िपलाजी गायकवाड यांनी िनजामाचा पराभव केला..
सरदार कदमबांडे यांनी 1726 मध्ये गुजरातमधील सधन शहर वडनगर लुटले. यावेळी मोठ्या प्र्माणावर लूट िमळाली. त्यावेळी महाराष्टाच्या राजकारणाचा हळूहळू छञपती घराण्याचा प्रभाव कमी होऊन सर्व सूञे पेशव्याच्या हाती एकवटली. पहीले बाजीराव पेशवे खूप पराक्रमी व मुत्सद्दी िनघाले. त्यांनी प्र्थम सर्व मुलुख मराठेशाहीत आणला. पेशव्यांकडून लढताना अनेक सरदारांनी बहादुरी दाखवली. महाराष्ट काबीज झाल्यानतंर पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावण्यास सुरूवात केली. पिहल्या बाजीराव पेशव्यांकडून सरदार िपलाजी गायकवाड, सरदार कांताजी कदमबांडे,तळेगावचे सरदार दाभाडे यांनी गुजरातचा बराच मुलूख काबीज केला. िजंकलेल्या प्रदेशात सत्ता अबाधीत ठेवण्यासाठी त्या भागात राहणे गरजेचे होते. म्हणून सरदार कांताजी कदमबांडे व दमाजी गायकवाड यांनी गुजरातचा पिरसर वाटून घेतला. गायकवाड यांनी तापीचा पिलकडचा भाग व बडोदा मुख्यालय घेतला, तर कदमबांडे यांनी तापीचा अिलकडचा भाग धुळे पिरसर रनाळा, कोपर्ली, तोरखेड हा भाग घेतला. त्यांनी तोरखेड हे मुख्यालय केले तर कोपर्लीला सैिनकाची छावणी केली. त्या भागात मोठा िवस्तार केला. त्यांच्या मदतीला रघोजीराव कदमबांडे व पराक्मी मुलगा म्लहारराव हे अळकुटी येथून तोरखेड येथे गेले. मल्हाररावांच्या पत्नी शाहूकन्या गजराराजे या अितशय िशवभक्त होत्या. त्यांच्या पूजेसाठी खास ञ्यंबकेश्वरहून अळकुटी येथे जागृत स्वयंभू िशविलंग मागिवण्यात आले होते. त्या िशविलंगाची स्थापना राजवाड्याच्या तळघरात करण्यात आली होती. नतंर मल्हारराव व गजराराजे तोरखेड येथे स्थाियक झाले. तेथे त्यांचा राजवाडा आचही पहावयास िमळतो.कारण हा मुलूख पेशव्यांच्या पुण्यापासून लांब होता. 5 वर्षाचा शेतसारा पेशव्यांकडे भरून ते त्या भागाचे राजेच झाले होते. अळकुटी भागात मल्हाररावांना पराक्माला वाव िमळाला नसता. कारण पूर्ण महाराष्ट पेशव्यांच्या अंिकत झाला होता. छञपती घराण्याशी एकिनष्ठ म्हणून त्यांचे खच्चीकरण करण्यात आले असते. हा दूरदर्शीपणा ओळखून रघोजीराव व मल्हारराव तोरखेड येथे स्थाियक झाले. तेथे त्याच्या पराक्माला मोठा वाव िमळाला. गुजरातबरोबर मध्यप्देशात त्यांनी धडक मारली. यावेळी त्यांच्याकडे फार मोठे सैन्य होते. इ.स. 1750 नंतर अळकुटीच्या गादीचे महत्व कमी होऊन, तोरखेडच्या गादीला महत्व पा्र्प्त झाले. अळकुटी येथील गुजराती व्यापारी िनघुन गेले. सरदार रघोजीरावांचा दुसरा मुलगा कमळाजी हे अळकुटी भागाचे कारभार पाहू लागले.. या भागातून जाताना महत्वाचे कागदपञे तळघरात ठेवले असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच इतके मोठे पराक्मी घराणे असूनसुध्या ते कागदपञांअभावी प्र्काशात आले नाही.. या घराण्यावर संशोधन होणे गरजेचे आहे..
No comments:
Post a Comment