विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 20 July 2021

Pathanpura Gate of Chandrapur (Erstwhile Chanda) Fort in 1870s


 Pathanpura Gate of Chandrapur (Erstwhile Chanda) Fort in 1870s

चांदा (सध्याचे चंद्रपुर) किल्ल्याचे 'पठाणपुरा' नावाने प्रसिद्ध असलेले प्रवेशद्वार.
हे छायाचित्र 'रिटर, मोल्केनटेलर आणि कंपनी' ने १८७० च्या दशकात काढलेले असून मध्य प्रांताचे तत्कालीन मुख्य आयुक्त (Chief Commissioner of Central Provinces) सर रिचर्ड कर्नाक टेम्पल यांच्या संग्रहातील आहे.
गोंड राजा हिरशाहच्या (इ.स. १४९७-१५२२) कारकिर्दीत या मुख्य प्रवेशद्वाराचे बांधकाम झाले असून गोंड राजांची पूर्वीची राजधानी बल्लारपूर (बल्लारशाह) कडून नवी राजधानी चांदा (चंद्रपुर) कडे येणाऱ्या मार्गाचे हे दक्षिणेकडील प्रवेशद्वार होते. 'पठाणपुरा'द्वार व हनुमान खिडकी दरम्यानच्या बुरुजावर लेफ्टनंट-कर्नल स्कॉटच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश तुकडीने मारा करून किल्ल्यात प्रवेश केला आणि २० मे १८१८ मध्ये चांदा किल्ल्याचा ताबा घेतला.
(लेखन व संपादन - अमित भगत)

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...