विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 20 July 2021

मध्यवर्ती संग्रहालय - नागपूर (Central Museum - Nagpur)

 



मध्यवर्ती संग्रहालय - नागपूर (Central Museum - Nagpur)

'अजब बंगला' म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या संग्रहालयाची स्थापना ब्रिटिश काळात सन १८६३ साली झाली होती. मध्यप्रांताच्या मुख्य आयुक्तांनी २७ ऑक्टोबर १८६२ रोजी घेतलेल्या बैठकीत पुराणवस्तू संकलन संस्थेची (Antiquarian Society) स्थापना केली. कॅप्टन डॉड्स, कॅप्टन कोब, स्टीफन हिस्लॉप, कॅप्टन मॅकेन्झी, कॅप्टन अॕशबर्नर हे या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. या संस्थेने मध्यवर्ती संग्रहालय व सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करण्यासंबंधीचा प्रस्ताव मांडला. संग्रहालयाच्या इमारतीचा नकाशा कॅप्टन कोब यांनी तयार केला. तत्कालीन नगरपालिकेने या संग्रहालयाच्या इमारतीसाठी आर्थिक तरतूद केली होती. संग्रहालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी एकूण ७००० रुपये खर्च आला होता. व त्याचे उदघाटन मध्यप्रांताचे मुख्य आयुक्त सर रिचर्ड टेम्पल यांच्या उपस्थितीत झाले. सप्टेंबर १८६३ मध्ये टाकळघाट येथील शिलावर्तुळाचे उत्खनन करून बोरी येथील कॅम्पला परतत असताना पावसाळी नाल्यात वाहून गेल्याने स्कॉटिश मिशनरी स्टीफन हिस्लॉप चा दुर्दैवी अंत झाला. मध्यवर्ती संग्रहालयाची स्थापना, त्याच्या निर्मितीसाठी अहोरात्र झटणाऱ्या हिस्लॉपला श्रद्धांजलीच आहे असे मत पुराणवस्तू संकलन संस्थेने व्यक्त केले होते.
(लेखन व संपादन - अमित भगत)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...