हिंदु धर्माच्या वर्णाश्रमामध्ये चार वर्णात सगळ्यात जास्त गोंधळ आहे.त्यातही मराठ्यांच्या क्षत्रियत्वाचा गोंधळ थोर आहे.सध्या आपण महाराष्ट्रापुरतं पाहू. महाराष्ट्रात सातवाहन ब्राह्मण कि क्षत्रिय हा वाद असतो.कदंबांचं क्षत्रियत्व कि ब्राह्मणत्व हा अंतिम निकाल क्षत्रियत्वाच्या बाजूला लागून संपला.अगदिच चालुक्य ,चहमान आदी कुळं हि अबू पहाडाच्या यज्ञामधून चार पुरूष निर्मिले ह्या क्षत्रियअधारित कथेवर जाऊन थांबतात.त्यामुळे अखिल महाराष्ट्राचं क्षत्रिय हे राजस्थान आणि उत्तरेतल्या राम-कृष्णा शी जाऊन भिडलं.आता,तर क्षत्रियत्वाच्या समाजमान्यतेसाठी अस्सल मराठी माटाची "जी"प्रत्यय असलेली नावे जाऊन "सिंह" प्रत्यय लावून बरीच जणे दुधाची तहान ताकावर भागवत आहेत.महाराष्ट्रातली इतिहासात ज्ञात असलेली कोणतीही घराणी घ्या .त्यांच्या कर्तुत्वान पुरूषांचे सिंहकरण अगदिच अलिकडच्या काळातले आढळेल.पण ते राजपूतीकरणाच्या पाठबळासाठी असते एवढं स्वच्छ.पण राजपूतांच्या आधीही सिंह हा प्रत्यय दक्षिणेतून उत्तरेत गेला आहे .ह्याचा पुरावा दक्षिणेत मोठ्या प्रमाणावर आराध्य असलेला नरसिंह.आणि महाराष्ट्रातल्या प्राचीन चालुक्य राजांनी नावापाठी लावलेला सिंह.एवढच काय पण क्षत्रियत्वाचा राजाभिषेक होऊन छत्रपतींच्या घराण्यातही पारंपारिक नावे ठेवली जात असत.
राजपूतांमधून सरसकट मराठे आले हे जरा जास्त धाडसाचं आणि धोक्याचं आहे.काही सन्माननीय अपवाद असू शकतात.पण ,मग महाराष्ट्र देशीच्या सातवाहन,चालुक्य, राष्ट्रकूट,वाकाटक,त्रैकुटक,कदंब,यादव,शिलाहार,बागुलवंश,अहीरराजे,चहमान,सेंद्रक ह्यासारख्या कित्येक राजवंशाचे वारस आणि वंशज सध्या कुठे आहेत हा मुळ प्रश्न शिल्लक राहतोच.महाराष्ट्रातले त्या त्या सत्तेशी नाते सांगणारे ताम्रपट हे त्या त्या घराण्यात भेटले आहेत.काही बाबीं लक्षात घ्यायला हव्यात मराठ्यांचं क्षत्रियत्व हे आर्यांचं क्षत्रियत्व नाही.महाराष्ट्रातील क्षत्रिय कुळांचा प्रामुख्याने व्रात्यस्तोम विधी झाला आहे.अबू पहाडावरच्या विधीत जी चार क्षत्रिय कुळे सांगितली आहेत ती चालुक्य,चहमान,परमार,प्रतिहार हि ह्याच मातीतली स्थानिक होते त्यांना गरजेपोटी वैदिक संस्थेने क्षत्रियत्व बहाल केलं.
क्षत्रियांचा वर्णोक्त वाद सनातन आहे.विश्वामित्र, सहस्त्रार्जुन ,प्रभू रामचंद्र ह्या कथातून तो स्पष्ट पणे दिसतो.सरसकट एकच जात क्षत्रिय असावी अथवा एकच वंश क्षत्रिय असावा हे मानने अनैतिहासिक आहे.उदा .वैदिकांच्या खिजगणतीतही नसलेला नागवंश स्वताला क्षत्रिय म्हणवतो तर बौद्ध साहित्यातून अमुक ज्ञातीचा क्षत्रिय वगैरे ची उदाहरणे येतात.समाज मान्येतेसाठी जर सुर्य आणि चांद्र वंशाशी वंशावळी जोडल्या तरी त्या तोकड्या आहेत.उदा.यादवांची वंशावळीतला मुख्य पुरूष दृढप्रहार हा जैन साहित्यातून प्रकर्षाने दिसतो .तर शिलाहारांपैकी एक शाखा हि संपूर्ण पणे जैन धर्माअधीन दिसते ह्याचा अर्थ त्यांनी क्षत्रियत्व टाकलं असा होतं नाही.उलट पक्षी वैदिकांना अभिप्रेत नसलेल्या क्षत्रिय ज्ञातींचे नियम आणि निकष जास्त नैतिक होते हे आजच्या दक्षिण -उत्तर तुलनात्मक अभ्यासावर स्पष्ट होते.
क्षत्रिय ह्या संज्ञेचा शोध आणि बोध हा विभागीय झाला तर बराच उलगडा होऊ शकतो.ह्या अभ्यासासाठी नर्मदेने केलेले भारताचे दोन सांस्कृतिक भाग हा पायाभूत विषय होऊ शकतो.
थोडक्यात नर्मदेखालच्या क्षत्रियत्वाचा आणि उत्तरेतल्या वेदोक्त क्षत्रियत्वाचा दुरान्वयानेही संबंध नसेल .एखाद दोन सन्माननीय अपवाद हि असतील पण दक्षिणेतलं क्षत्रियत्व हे कर्माधारीतच होतं हे इतिहासात ही सिद्ध होतं.
सचिन शिवाजीराव खोपडे देशमुख.
बारा मावळ परिवार.
No comments:
Post a Comment