


अन् पायथ्याचे नारायणपूर हे राजधानीचे(?) नगर...
-----------------
-----------------
सतीशकुमार सोळंके देशमुख,
@..............

राजे साळुंखे चाळुक्यांनी राष्ट्राच्या उभारणी अंतर्गत राष्ट्र उभारणी प्रकृतीचे दोन मुख्य भेद मानलेले दिसतात; ते म्हणजे "ग्राम" आणि "पूर"..... राज्यातील हे 'पूर' राजधानीचे नगर असत... चाळुक्यांच्या राष्ट्रउभारणीच्या अभिलेखिय सिद्धांतानुसार त्यावेळच्या दुर्गांचे महत्व लक्षात येणारे आहे. सामागिरी अर्थात आजचा पुरंदर किल्ला ही बदामी साळुंखे चाळुक्यांची निर्मिती आहे. चाळुक्यांच्या अभिलेखातील माहितीनुसार पुरंदर पायथ्याला 'पूर' अशा राजधानी वाचक शब्दाचे गाव असणे हा काही निव्वळ योगायोग नसावा. कारण पुरंदर पायथ्याला 'पूर' प्रत्येय लावलेले नारायण'पूर' नावाचे गाव असणे, म्हणजे चाळुक्यांनी निर्मित केलेल्या पुरंदर किल्ला भागातील हे त्या वेळचे राजधानीचे नगर असावे.
राजे साळुंखे चाळुक्यांच्या अभिलेखिय मतानुसार राज्यातील हे 'पूर' एकतर राजधानीचे नगर असत. साळुंखे राजे या राजधानी नगराला "महापत्तन" (महापाटण अथवा पाटण) शब्दाचा प्रयोग करीत असत. हे नगर अत्यंत रमणीय तसेच विशाल असत. राजधानीच्या नगराच्या व्यतिरिक्त दुसरे देखील 'पूर' असत; परंतु त्यांची संख्या कदाचित खूपच कमी होती. राजधानीच्या या 'पूर' नगरासाठी चाळुक्यांनी त्यांच्या अभिलेखात "महापत्तन" अथवा "पूर" अशाच शब्दांचे उल्लेख केलेले आहेत. याचे विस्तृत असे काही वर्णन चाळुक्यांनी अभिलेखातून केलेले दिसत नाही. मात्र 'पूर' या विषयावर त्यांच्या अभिलेखातून केवळ असे म्हटले आहे, की या नगराच्या जवळ विहारण्यासाठी वन असावेत. अशा पुरामध्ये राजे साळुंखे चाळुक्यांच्या राज्य काळात अनेक व्यक्ती राहत असत. हे 'पूर' त्याकाळात कंदमुळे, फळे तसेच फुलांनी पूर्ण होते.
सामागीरी अर्थात पुरंदर किल्ल्याच्या सुरक्षितेसाठी राजे साळुंखे चाळुक्यांनी त्या काळातील नारायणपूर नावाचे राजधानीचे नगर बसविलेले असावे. साळुंखे राजे हे वैष्णव धर्मीय असल्यामुळे शिवाय हे राजे भगवान शिवाचे सर्वात मोठे उपासक राजे असल्यामुळे त्यांनी विष्णू आणि शिव अशा दोन्ही नावांचे साधर्म्य साधेल अशा नावाने या नगरात नारायणेश्वर महादेव मंदिराचेही निर्माण केलेले आहे. मंदिराशेजारी पुष्करणी बारव आहे.
सामागिरी अर्थात पुरंदर किल्ल्याच्या वर्तुळ परिसरात सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे साळुंखे चाळुक्यांच्या निर्मितीतील अनेक मंदिरादी वास्तू दिसून येतात. या वास्तू आज देखील राजे साळुंखे चाळुक्यांच्या पराक्रमी आणि वैभवशाली इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभ्या असलेल्या दिसतात. यामध्ये प्रामुख्याने पुरंदर पायथ्याचे नारायणेश्वर मंदिर, कऱ्हा नदी काठावरील पांडेश्वर महादेव मंदिर, सासवड येथील संगमेश्वर, चांगावटेश्वर, सिद्धेश्वर, पुरंदरेश्वर महादेव मंदिर, खडकेश्वर महादेव मंदिर, कऱ्हा देवी मंदिर, नीरा गावाजवळील सोमेश्वर महादेव मंदिर, जेजुरी चे खंडोबा मंदिर, भुलेश्वर मंदिर, वीर परिसरातील वीरेश्वर, म्हस्कोबा सारखी मंदिरे (प्राचीन म्हस्कोबा मंदिर आधुनिक फरश्या सिमेंट वगैरे मुळे त्याचे प्राचीनत्व हरवून बसले आहे) ही सर्व मंदिरे चाळुक्य शैलीतील निर्मित मंदिरे आहेत.
पुरंदर पायथ्याच्या नारायणपूर नगरात राजे साळुंखे चाळुक्य शैलीतील निर्मित नारायणेश्वर मंदीराच्या समोर मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस अनाम वीराचे समाधी मंदिर असून हल्ली समाधी मंदिर रामेश्वर महादेव मंदिर म्हणून पूजले जात आहे! सदरील समाधी मंदिर पुरंदरच्या पायथ्याला चाळुक्य शैलीत निर्मित असलेल्या नारायणेश्वर मंदिराच्या अगदी समोरच्या मंदिर आवार प्रवेश ठिकाणी स्थित असून हे समाधी मंदिर साळुंखे राजवंशातील एखाद्या मोठ्या वीराचे असण्याचा संभव वाटतो!
( अपूर्ण )
------------
टीप :
पोस्टला लावलेल्या तिसऱ्या छायाचित्रात अभ्यास दौऱ्यात सोबत असलेले, डावीकडून कल्याणराव राजे तौर-ठाकूर, दिनेश सोनवणे-देशमुख, पुण्यातील मित्र कृष्णा पारगे, अशोक पठारे, धनंजय सोनवणे-देशमुख, संदीप वाघचौरे आणि त्याशेजारी मी छायाचित्रात दिसत आहे.
सतीशकुमार शिवाजीराव राजे सोळंके-चाळुक्य, Kalyan Taur Thakur, Dinesh Sonawane Deshmukh Chalukya, Dhananjay Hanumantrao Sonawane-Deshmukh , Sandeep Waghachaure ....
मार्गदर्शक :
------------
प्रोफेसर डॉ. नीरज साळुंखे,
(Dr. Neeraj Salunkhe ),
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
------------
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,




सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड


No comments:
Post a Comment