विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 18 August 2021

महाक्षत्रप नहपाना: (CE 32-75)

 







महाक्षत्रप नहपाना: (CE 32-75)

क्षहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली (या क्षहरातांचा व शकांचा संबंध होता व हे बहुधां मूळचे शकस्थानांतील (सीस्थान) रहिवासी होते). इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण-गोमंतकही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथल्या बंदरांतून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला.
प्रथम हा सत्रप (गव्हर्नर) होता. पुढें यानें आपल्याला महाक्षत्रप व राजा हीं उपपदें लाविलीं. यानें आपलें राज्य दक्षिण राजपुताना ते नाशिक पुणेंपर्यंत (सुराष्ट्र काठेवाड धरून) वाढविलंन होतें.
क्षत्रप शब्द का प्रयोग ईरान से शु्रू हुआ था। क्षत्रप एक प्रकार की उपाधि थी, जो राज्यों के मुखिया के लिए प्रयुक्त की जाती थी। भारत में क्षत्रप शब्द आज भी राजनीति में प्रयोग किया जाता है।
नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे(Khushan are Gurjars) अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. ३२ मद्धे नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वा-या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकुन घेतला. पुढें यानें आपल्याला महाक्षत्रप व राजा हीं उपपदें लाविलीं. यानें आपलें राज्य दक्षिण राजपुताना ते नाशिक पुणेंपर्यंत (सुराष्ट्र काठेवाड धरून) वाढविलें होतें. याची राजधानी जुन्नर (पुणें जिल्हा) येथें होती.
गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेंव्हा सातारा-क-हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता.
परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला.
विशेष पाहता सातवाहन राजा गौतमी पुत्र सातकर्णी या महाराष्ट्री प्राकृत महापराक्रमी राजाने शकांना २० वर्ष लढाई करून हरविले. आणि मराठी काळ गणना सुरु केली त्याला शके आपण म्हणतो.
गौतमीपुत्राने नहपानावर विजय मिळवून सातवाहन साम्राज्याचे गतवैभव परत प्राप्त केले आणि मराठी भाषेस सुवर्णकाळ प्राप्त केला .
नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- "खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस".हा शिलालेख प्राकृत अहिराणी भाषेत आहे.त्यात क्षहरात चा उल्लेख "खखरात " असा केला आहे.
Kharat is the prakrit form of Kshaharata (क्षहरात).क्षहरात is an Iranian word found in Avesta ( Pharasi Religious text).क्षहरात means ruler-ship.The word Shaha is derived from (क्षहरात).Shaha means king.There is similarity between Avestan and Sanskrit world like Sapthah-Hapta,Sindhu-Hindu etc..
स्वतःला राजर्षिवधू म्हणवून घेणाऱ्या त्याच्या आईने-गौतमी बलश्रीने-नाशिक येथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या मागे " खखरात (क्षहरात) वंस -निरवशेषकर शकपल्हवनिषूदन समुद्रतोयपीतवाहन" अशी बिरुदावली कोरवून घेतली आहे. त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --
"क्षत्रियांचा गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....."

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...