इतिहासातील तीन सोनेरी पाने
हल्ली महाराणी ताराबाईआईसाहेब यांचा मुक्काम प्रतापगडी होता.भवानीच्या छत्रछायेखाली बाल शिवाजी आणि राजमाता सुरक्षित होत्या. औरंगजेबानं घेतलेले गडकिल्ले पुनश्च स्वराज्यात सामील करण्याची लगबग सुरू होती.सकाळ सकाळ कोवळ्या उन्हात आईसाहेबांचा मेणा पाच-पन्नास खास पट्टेकऱ्यांच्या घेऱ्यात बालकिल्ला उतरून भवानीमाता मंदिराच्या आवारात ठाण झाला.आईसाहेब मेणा उतार होताच
मानकरी,सरदार,पुज्यारी कमरेत झुकले.देवीचं दर्शन घेऊन. तीचं मंगलमय तेज आपल्या डोळ्यात साठवून आईसाहेब मंदिरासलागून असलेल्या सभामंडपात स्थानसंपण झाल्या.
अदब धरून सर्व सरदार,किल्लेदार फडावरील सर्व मंडळी उभी राहिली.
दहा-पंधरा दिवसापूर्वीच कोपल प्रांताचा करीना आईसाहेबांच्या कानी आला होता.त्या भागातील मराठयांचा अमल असताना सुद्धा तेथील किल्लेदारानं हरामखोरी करून किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला होता.त्यामुळे आईसाहेब चांगल्याच संतापलेल्या होत्या.म्हणून स्वतः जतीन लक्ष घालून त्यांनी नरहरी रुद्र या सरदारास सेनाकर्ते पद देऊन त्यांना जरुरी त्या सूचना केल्या.
त्या प्रांती मराठयांच्या पदरी असणाऱ्या देसाई आणि इतर बडे सरदार यांचा जमाव एक करून किल्ल्यावर पुन्हा यलगार करून किल्ला जेर करण्यास सांगण्यात आलं.तसेच ज्या दुदुसकर नामक किल्लेदारानं ही हरामखोरी केली होती त्याची गर्धन मारावी असा कडक हुकूम देण्यात आला.
गेले चार-दोन दिवस त्या या खबरेची वाट बघत होत्या.आणि आज सकाळपासूनच तो विषय त्यांच्या मनी घोळतं होता.योगा योग म्हणजे दिवस फुटीला किल्ल्याचे दार उघडताच दक्षिणेकडील सर्व हाकीत उचलून एक स्वार गडात शिरला.राजआसनावर बयटक घेताच.आईसाहेबांनी प्रथम त्याच मुद्याला हात घातला.तातडीनं त्या खबरगिरास समोर पेश करण्यात आलं.त्यांनी जुबानी खबर पेश केली." आईसाहेबांची
आज्ञा होताच रुद्र आप्पानं सर्व जमाव एक केला.रात्रीच्या समय
मोका साधून त्यांनी किल्ल्यावर यलगार केला.अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आतील शिवबंदीला सावरण्यास अवधी मिळाला नाही.किल्लेदार हबकला आणि पळाला.त्यामुळं किल्ला आपसूक रुद्र आप्पाच्या ताब्यात आला.दिवस उगवतीला रुद्र आप्पांनी किल्ल्यावर पुन्हा जरीपट्टा फडकवला."
खबर कानी पडताच आईसाहेब मनीखुश झाल्या.त्यांनी खबरगीरास सोनमोहरा बक्षीस म्हणून दिल्या.
इतर कामांच्या बाबतीत चरच्या करण्यात आली.सगळा आढावा घेऊन सर्वांना रजा देण्यात आली.मात्र बहिरो पंडित यांना दोन-तीन खलिते ताबडतोप सिद्ध करण्याचे सांगण्यात आले.
आईसाहेबांनी खास दोन खालीत्यांचे मजकूर स्वतः सांगितले होते.एक होता सरदार धावजी विसार यांच्यासाठी तर दुसरा होता सरदार चाफाजी शिंदे यांच्यासाठी.त्यांच्या समशेरीच्या जोरावरच ते स्वराज्यात नावारूपाला आले होते.बऱ्याच मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या.आता ही तशीच मोठी जोखीम आईसाहेबांनी त्यांच्यावर सोपवली होती.आणि ती म्हणजे लोहगड फत्ते करण्याची.या मोहिमे कामी आईसाहेब स्वतः लक्ष ठेवून होत्या.जाणाऱ्या खालीत्यांन बरोबर एक चारशे
मावळ्यांची शेलकी तुकडी आईसाहेबांनी खासा कुमक म्हणून
पाठवणार होत्या.त्यांना पहिल्या झडपेतच कामगिरी फत्ते करायची होती.
खलिते सिद्ध होताच ते टाकोटाक गडउतार होऊन मार्गी लावा अशी करडी आज्ञा होती आईसाहेबांची.दहा-पंधरा दिवस कामाच्या धांदलीत लोटले.एके दिवशी आईसाहेबांचा नजर बाज भयरु कोळी गड चढून आला.भयरुची जाणपयचान
गडभर आल्यामुळे त्याला कोणी हटकल नाही.किल्लेदारानं
आईसाहेबांची परवानगी कडून त्याला थेट आईसाहेबांन समोर उभा केला.मुजरा करून भयरुनं खबर पेश केली. " गुरुवारच्या मावळतीला धावजी आणि चाफाजीराव आपला आणि त्यांचा जमाव घेऊन आवंढे गावच्या जगलात उतरली.त्याच राती त्यांनी
दुघिवरे खिंड पार करून विंचूकडा गाठला.तटाला माळा लावून
आतमंदी उढ्या टाकल्या.किल्ल्याला जाग येण्या अघुदरच नेटानं कापाकापी सुरू केली.धावजीरावांनी थेट पन्नास-एक मावळे संगती घेऊन किल्लेदारास येरगाटला.त्याला अंगावर घेऊन घटकाभराची झुंज झाली.मोक्का साधून धावजींनी एक वरमी वार किल्लेदाराच्या मानगुटीवर उतरवला तसा किल्लेदार पडला.किल्लेदार पडताच किल्ल्यावर हशमांनची पळापळ उठली.चाफाजीरावांनी गड ताब्यात घेऊन लगेच चौक्या पहारे बसवले.जे हशम सापडले त्यांना कैद करून त्यांची रवानगी बंदीखाण्यात केली.रविवारीचा दिस साधून दोघांनी मिळून ढाल काटी बुरुजावर जाऊन पुनींदा जरीपट्टा फडकवला अनं मला
खबर रुजू करण्यासाठी इकडं धाडलं..." भयरुनं एकादमात सगळा करीना आईसाहेबांच्या काणी घातला.
सगळा वृतांत समजून घेताच आईसाहेबांचा चेहरा उजळून निघाला.बसल्या बसल्या त्यांनी भवानी मंदिराच्या दिशेनं हात जोडले.भयरुला बक्षीस म्हणून चांदीची सलकडी देण्यात आली
लोहगडाचा विजय मोठा होता.आईसाहेब अगदीच खुश होत्या
त्यांनी गडाची भांडी वाजण्याची आज्ञा केली.साऱ्या गडभर साखर वाटण्यात आली.धावजी आणि चाफाजीराव यांना
शाबासकी देऊन त्यांचं कवतुक करावं या हेतूनं आईसाहेबांनी तात्काळ पत्र सिद्ध करण्याचा हुकूम केला.आईसाहेब स्वतः मजकूर सांगूलागल्या.
" श्री राजा सिवछत्रपती याणी धावजी विसार यासी आज्ञा केली यैसी जे राजमाचीस तुम्ही असत.तो जगा तांब्रास हस्तगत झाला ते गोष्टीची शंका मानून स्वामीकार्य करून दाखवावे हे हेतूनं राहिले होतेस,त्यास सांप्रद राजश्री बहिरो पंडित प्रधान यांणी तुम्हास लोहगड घ्यावयाची आज्ञा केली.तुम्ही कस्त करून किल्ला घेतला.किलेदार तुम्हास ते लि.वर्तमान पंडित मारनिलहेनी हुजूर लि.आहे त्याजवरून विदिज झाले.येशास तुम्हीही चांगली मेहनत करून लोहगड हस्तगत केला. हे काम थोरच केले.तुमचे शेवेचा मुजरा झाला.राजमाचविसी काही शंका मानाल तरी ते गोष्टीचे काये हाये.त्या प्रांतीची भिस्त फार पंडित मशारनिलहेवरी आहे.स्वामीकार्य ईत्पत्याचे आज्ञेत वतोंन
राजमाची आधीकरून आणखी देसदुर्ग साध्य करणे आणि आपला मुजरा करून घेणे जाणीजे." ( ८ जानेवारी १७०५ )
लेखन समाप्त
इंद्रजित खोरे
टीप :- वरील मुद्दा हा डॉ सुवर्णाताई नाईक निंबाळकर यांचे
भद्रकाली ताराराणी पुस्तकातुन पान क्र १४७ वरून घेतला असून त्याचे पुन्हा कथा रुपी लेखन केले आहे.हेतू एकच होता की ज्या सरदार,शिलेदारांनी श्रींच्या राज्यासाठी आपली समशेर गाजवली त्यांची नावे आणि कार्य प्रकाशात यावी यासाठी हा शब्द रुपी अट्टहास.
No comments:
Post a Comment