विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 21 March 2022

कोकणातील धार पवारांचा ईतिहास

  


कोकणातील धार पवारांचा ईतिहास ... थोडक्यात ::

**************************************************************************************


कोकणातील धार पवारांचा ईतिहास पाहीला तर आपल्याला शिवशाहीच्या काळापासूनचा विचार करावा लागेल . धारच्या पवार घराण्यातील पहीले मराठा शिलेदार उदाजी पवार हे शिव रायांच्या सैन्यात रुजू होते . तसेच अजून एक नाव पुढे येते ते म्हणजे केरोजी पवार..

पुढे पेशव्यांच्या कारकीर्दीत कोकणातील सिद्दी व पोर्तुगीज यांच्या विरुद्ध मोहीमेत चिमाजी आप्पाणच्या नेत्रुत्वाखाली ल स्वारीत धारच्या पवार घराण्यातील उदाजी पवारांचे पुतणे धारचे तत्कालीन महाराजा श्रीमंत यशवंतराव पवार हे वसई व तारापुर किलल्यांवरील स्वारीत आपल्या पवार फौजेसह राबत होते.

याच सैन्यातील काही पवार सरणोबत कोकणातील गावॉगावी पाटील , राव , खोत म्हणुन नेमले गेले व ते कोकणातच स्थायीक झाले ..!

आज ही पवारांच्या ईतिहासाच्या पाउलखुणा कोकणात आढ़ळतात . दाखले द्यायचेच झाले तर रत्नागिरी जिल्ह्याती ल चिपलुण तालुक्या तील " गुढे " या गावी पवार संस्थानिकांची किल्लेवजा गढीचे अवशेष पहायला मिळतात .

श्री परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकण भूमीत एखादेच गाव अपवादाने सापडेल की जिथे एकही " पवार " नाही .




.....जय श्री भैरी भवानी ...!!!


........सौजन्य :
सनी पवार ( पवारवाडी)

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...