विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 12 October 2022

सूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच ! भाग १

 सूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच !
मूळ लेखक : प्रिं.अमरसिंह राणे
संदर्भ : दैनिक पुढारी (बहार ) , रविवार, दि.२८ नोव्हेंबर १९९९ .
लेखन : अभिजीत पाटील


भाग १
"कूणीही फ़ितुर झालं की त्याला महाराष्ट्रात ताबडतोब ’सूर्याजी पिसाळ’ हे विशेषण जाते.जणू काही फ़ितुरांना दिला जाणारा किताबच.निवडनुकीच्या काळात ’सूर्याजी पिसाळ’ हे नाव शिवी म्हणुन मुक्तकंठाने वापरले जाते.....पण मराठेशाहीतील लढवय्या सुर्याजी पिसाळ हा योद्धा हा साहसी लढवय्या कधिही फ़ितुर झाला नव्हता.हा स्वराज्यनिष्ठ देशमुख आजतागायत फ़ितुरीची खोल जखम कपाळी घेऊन वावरत आहे..... पण आता त्याची खोल जखम भरुन निघायलाच हवी... कारण तो खरोखरच स्वराज्याचा प्रामाणिक पाईक होता."
           इतिहास हा व्यक्तिंभोवती फ़िरतो. व्यक्तिपरत्वे गुणदोष आलेच.इतिहास लेखणाची पुनर्छाननी व मुल्य तपासले जावे.त्यातील बारकावे आणि तपशील देताना शास्त्रशुद्ध, ओघवते विवेचन दिसले पाहीजे सत्याचा अपलाप न करता काल्पनिक,पुर्णत: कादंबरीमय घटना आणि व्यक्तीचित्रणे असता कामा नयेत. तटस्थ व्रुतीने आणि निष्पक्षपणे लेखण व्हावे लागते.मराठ्यांच्या इतिहासात अनेक समज,गैरसमज आणि अपसमज आढळुन येतात. इतिहासलेखण देखील व्यक्तीच करतात.छत्रपती संभाजी,सुर्याजी पिसाळ, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर, दुसरा बाजीराव,आनंदीबाई, सोयराबाई शिर्के, टिळक, छ.शाहु आदी; एवढेच काय छत्रपती शिवरायांच्या बाबतही आपल्या काही लेखकांनी अवास्तव, अवाजवी गोष्टी लिहुन ठेवल्या आहेत.विशेषत: बखरकारांना गोंधळ व भडक, रंजक चित्रणे तर विचारायलाच नको.त्यातले सत्य शोधणे/ घेणे आवश्यक.
वाडःमयाची घुसखोरी
           वास्तवाशी फ़ारकत घेतली आणि काल्पनिकतेस प्राधान्य दिले की इतिहासाची प्रासादिक कादंबरी होते.तसे पाहता ऐतिहासिक कादंबरीनेही इतिहासाशी प्रामाणिकपणा राखला पाहीजे आणि म्हणूनच श्रीमान योगी, छावा, राजेश्री आदी ग्रंथ, ऐतिहासिक कादंबरी न राहता कादंबरीमय इतिहास किंवा इतिहासमय कादंबर्या झाल्या आहेत.ग्रंथाच्या तिनीही  नामवंत लेखकांनी सत्य, ऐतिहासिक घटना अनेकवेळा पाठीमागे ठेवून स्वत:च्या प्रासादिक फ़ुलोर्यास अतिमहत्व दिले आहे.परंतु सर्वसामान्य वाचक  आणि प्रेक्षक त्या प्रसंगांना सहजपणे सत्य मानतो.त्यावरील चित्रपटात तेच दाखवले जाते.म्हणून अशा कादंबर्या, चित्रपट आणि नाटके ऐनैतिहासिक ठरतात. मग लेखनपरत्वे अनेक ऐतिहासिक व्यक्तिंच्यावर अन्याय होतो.समजापसमजास वाव मिळ्तो आणि तेच सत्य म्हणून समाजात वर्षानुवर्षे, शतकानुशतके प्रचलित होत राहते.हा एक दैवदुर्विलासच.याच द्रुष्टिकोनातुन "सुर्याजी पिसाळ" या इतिहासकालीन देशमुखावर अन्याय झालेला आहे.
सुर्याजी पिसाळ आणि राजकारण
          ’सुर्याजी पिसाळ’ म्हणजे ’फ़ितूर’ हे समीकरण जे झाले आहे, ते निखालस खोटे.इतिहासात आणि  राजकारणातले फ़ितूर व गद्दार हे शब्द अगदीच सापेक्ष असतात.आजचा फ़ितूर हा उद्याचा जीवस्चकंठस्च मित्र होऊ शकतो.मतभेदांपायी कोणी दुर गेला तर गद्दार होतो.मग गद्दाराचा विजय झाला तर त्याला तसे म्हणणारा करंटा होऊ शकतो.कुटील नीती अथवा राजनीतीचा तो अपरिहार्य  भाग असतो. नाही तरी राजकारण हे बदमाशांचे शेवटचे आश्रयस्थान असे कोणी आंग्ल  लेखकाने गमतीने खरेच लिहून ठेवले आहे.त्या उक्तिचा उपयोग देखील आपण एक ठाम सत्य म्हणुन सरसकट वापरात आणतोच.तसे पाहीले

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...