सूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच !
संदर्भ : दैनिक पुढारी (बहार ) , रविवार, दि.२८ नोव्हेंबर १९९९ .
लेखन : अभिजीत पाटील
घटनाक्रम असा-
संभाजीराजे गिरफ़्तार
राजारामांचे मंचकारोहण
१ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी छ संभाजी संगमेश्वराजवळ अलकनंदा व वरुणा या नद्यांचे संगमावरील नावडी येथे होते.मोंघल सरदार शेख निजाम तथा मुकबर्रखानने चकमकीनंतर त्यांना पकडले.संताजी घोरपडे यांचे वडील आणि शिवकालिन सरदार मालोजी घोरपडे त्यावेळी ठार झाले.रायगडावर ९ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम अटकेत असताना ही वार्ता कळाली.त्याची सुटका होऊन राजारामांनी ’ मंचकारोहण’ केले.
रायगडचा किल्लेदार चांगोजी काटकरने कैदेतील मानाजी मोरे इ. ना सोडले तर यसजी व सिदोजी फ़र्जंद यांचा कडेलोट केला.म्हणजे रायगडावर सुर्याजी पिसाळ त्यावेळी किल्लेदार नव्हते.राजप्रतिनीधी म्हणुन राजाराम राज्यकारभार १२ फ़ेब्रुवारी १६८९ पासुन शाहू लागले.कारण शिवाजी द्वितीय (शाहू) केवळ सात वर्षाचे होते.हा दुरदर्शीपणा येसूबाईंचा.मराठ्यांची राजधानी व नविन राजा यांना ताब्यात घेण्यास आसदखानपुत्र इतिकादखानने रायगडला २५ मार्चला वेढा घातला.
पक्षांच्या पंखावर शेवाळ उगवते.
आवळसकर सांगतात की, याबाबत पुर्व इतिहासकारांचे लेखन अत्यंत भ्रामक स्वरुपाचे आहे. मराठ्यांनी शर्थ केली,पण शेवटी रायगड सुर्याजी पिसाळांच्या फ़ितूरीमुळे मोंगलांच्या हाती गेला तसे नाही.शिवसून येसूबाईंनी रायगड मजबुत आहे, हे जाणले होते.’छत्रपती राजाराम व त्यांच्या पत्नींनी गडावरून निघावे’.राजाराम सहकुटूंब प्रतापगडाकडे ५ एप्रिल १६८९ ला बाहेर पडल.वेढा आरंभी अगदीच शिथील होता.
संपुर्ण रायगडला वेढा देणे, तेथील आजची ही भौगोलिक स्थिती पाहाता अशक्य होते.राजारामांच्या बरोबर खंडो बल्लाळ, रामचंद्र आमात्य, प्रल्हाद निराजी, शंकराजी नारायण इ. नामवंत माणसे वेढ्यातून निसटली. एकही मोंघलांच्या हाती लागला नाही.रायगडच्या खोर्यात श्रावण, भाद्रपद व आश्विन महिन्यात पाऊस इतका कोसळतो की ’पक्षांच्या पंखावर शेवाळ उगवते’ व वारा इतका सुटतो की, त्यावेळी वेढा घालणार्या सैनिकांना नुसते उभे राहाणेदेखील अशक्य ! ’वेढा नाममात्र. गड अजिंक्यच ! मोठी मंडळी बाहेर पडल्याने शत्रु त्यांचे अंगावर जाईल, गडावरील ताण कमी होईल.
राजारामांच्या दोन्ही भार्या रांगणा,विशाळगड, गगनगडकडे सुरक्षित गेल्या.छत्रपती राजाराम पुढे जिंजीस जाताना कोल्हापूर प्रांतातील शिवगड (दाजीपूर) गगनगड-काळम्मावाडी खोर्यातूनच गेले, त्यासमयी भागातील राणे, जाधव, खोपडे, पाटील, कुलकर्णी या मराठ्यांनीच त्यांना सर्व बाबतीत सहय्य केले आहे.
मोठी लढाई नाही, ठिसूळ पुरावा
म्हणजे परीसरात अशी लढाई झाली नसावी. तसे पुरावे नाहीत.शर्थीची झुंज दिली असती तर शेकडो मुसलमान सैनिक मरण पावले व त्यांची एखादी कबर तरी रायगड परिसरात सापडली. एकही नाही ! मराठ्यांनी नष्ट केली म्हणावे तर त्यांचा तो स्वभाव नाही.रायगडावरच्या फ़ितूरांचा गवगवा,गाजावाजा हा कालविपर्यासाचा प्रकार आहे.सुर्याजी वाई प्रांतातील ओझर्डे देशमुख.तो दुरवरच्या रायगडावर कशाला जानार ? तो सरदार वा किल्लेदारही त्यावेळी नव्हता.
’फ़ितुरी’स भक्कम पुरावा नाही.इतिहासकारांचे भ्रामक,रंजित लिखानच काय तो ठिसुळ पुरावा.तो ग्राह्य धरता येणार नाही.पण गडावरुन सुटलेल्या राजारामांचे तरुण साथीदार संताजी व धनाजींनी बादशाही फ़ौजेस ’दे माय धरणी ठाय’ करुन सोडले.बादशहाच्या तंबूचे सोन्याचे कळसही कापले.पाण्यात त्यांना ही जोडगोळी दिसायची म्हणे.खरे की वाडःमयीन रंजितपणा ? मग त्यांनी फ़ितुर सूर्याजीचा खातमा का केला नाही ? तसे काही नव्हतेच.
शुभविवाह
विशेष गोष्ट अशी की, छत्रपती राजारामांची दासीपुत्री व सूर्याजी पिसाळांचा दासीपुत्र यांचा विवाह होऊन ते व्याही झाले.हा विवाह इ.स.१६८९ नंतर व १७०० चे पुर्वी दासीपुत्री अनौरस..तिचा विवाह कोनाशीही झाला तरी चालेल असे अशी समाजनिती इतिहासकालात नव्हती.उलट समसमासंयोग साधण्याची प्रव्रुत्ती असे. त्या कालात अशी संतती शिष्टसंमत होती.छत्रपती राजाराम सूर्याजीशी नाते जोडतात, याचा स्पष्ट अर्थ असा की सूर्याजी इ.स.१७०० पर्यंत तरी फ़ितुर नव्हते.रायगड समेटामुळे पडला ती तारीख ३ नोव्हेंबर १६८९ आहे.झुल्फ़िकारखानाच्या मर्दमुखीमुळे नव्हे, तर राणी येसूबाईंच्या मुत्सदीपणामुळे गड ताब्यात दिला गेला.
फ़ितुर्यांच्या, खंजीर खुपसणार्यांच्या मुलास, स्वातंत्र्याची किंमत जाणणारा, जाणत्या शिवरायांचा मुलगा राजाराम आपली मुलगी,दासीपुत्री असो , देईलच कसा ? इति सूर्याजी पिसाळ रायगडप्रकरणी पुर्णपणे निर्दोष आहेत. माझे तसे स्पष्ट मत आहे.
इतिहासकार सरदेसाई
इतिहासकार सरदेसाई म्हणतात, फ़ितूरीपुढे हद्द आहे... वाईच्या सूर्याजी पिसाळास देशमुखी हवी होती.तिच्या लोभाने किल्ल्याचा दरवाजा खानास सताड उघडा झाला असे एके ठिकाणी लिहितात, तर दुसरीकडे ’ आठ महीने झाले तरी इतिकादखानाचे (झुल्फ़िकारखान) पाऊल य:त्किंचितही पुढे पडेना.... कपटविद्या, हुशार सूर्याजी पिसाळास वाईच्या देशमुखीचे आमिष .... त्याने मोंघलांचा आत प्रवेश करुन दिला.राणी येसूबाईंच्या अवस्थेची त्यांना काळजी पडते ! आणि त्या खानाकडुन शपथ घेववुन मुलामंडळीसह खानाच्या स्वाधिन होतात.असे सांगतात.कुलाबा ग्याझिटियरने तीच री ओढली आहे. पण प्रथम सूर्याजी हे वाईचे नव्हे,ओझर्ड्याचे. तसेच ते किल्लेदार नव्हते की रायगडावरही त्यांचे आस्तित्व १६८९ मध्ये नव्हते.ही दुसरी गोष्ट लक्षात घेतली तर फ़ितूर ठरविणारे सारे खोटे पडतात.
शिवाय पुणे जहागीर व आसपासचे पहीले तीन देशमुख शिवाजीराजेंना मिळाले ते जेधे,पिसाळ व मरळ हे होत.ते प्रथमपासून विश्वासातील होते, असे सध्याचे त्यांचे वंशज ओझर्डेचे नरसिंगराव पिसाळ, देशमुख ठासून सांगतात.सूर्याजी हे मुळ पुरुष हरनाकपासून सातव्या पिढीतील.
No comments:
Post a Comment