विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 26 October 2022

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ धार येथील पवार घराणे

 

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ

पवार घराणे ०१: धार येथील पवार घराणे

 

हिंदवी स्वराज्य विस्तारक थोरल्या बाजीराव पंतप्रधान पेशव्यांनी मध्य हिंदुस्थानात रोवलेल्या मराठेशाहीच्या प्रमुख आधारस्तंभ असलेल्या शिंदे-होळकर घराण्यांसोबत आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे पराक्रमाची तळपती धारदार तलवार असणारे हे धार आणि देवास येथील पेशवेकालीन कालखंडातील पवार घराणे.

मध्य हिंदुस्थानात तत्कालीन जी 70 – 75 अशी लहान-मोठी संस्थाने होती. त्यातील एक महत्त्वाचे मराठा संस्थानिक राजघराणे म्हणजे धार येथील पवार हे होय. या संस्थानचे क्षेत्रफळ हे सुमारे पावणेदोन ते दोन हजार स्क्वेअर फूट इतके आहे. या राज्याच्या काही भागासोबत शिंदे-होळकर यांच्या संस्थानांचा भूभागही जोडला गेलेला आहे. माळवा प्रदेशात असल्याने येथील जमीन ही चांगली सुपीक आहे. याचे प्राचीन नाव धारानगरी असल्याचे उल्लेख आढळतात. विंध्य पर्वताच्या धारेवर हे शहर असल्यामुळे बहुधा हे नाम प्राप्त झाले असावे, असा कयास बांधता येतो. पूर्वापार येथे परमार राजवंशनंतर माळव्याचे सुलतान आणि तद्नंतर पेशवेकाळात पवार घराण्याची सत्ता धारवर होती. असे उल्लेख आढळतात की या घराण्याचे मूळ पुरुष कृष्णाजी हे शिवकालात होते. यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील सुपे हे होय. शिवाजी महाराजांच्या सैन्यात एका तुकडीचा प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक होती. शिवराय आणि अफजलखान संघर्षातही यांचा सहभाग होता, असे म्हटले जाते. मुसलमान पूर्वकालीन माळव्याच्या धार येथील परमार घराण्याचे आपण वंशज आहोत, अशी कृष्णाजींची धारणा होती. याचमुळे धारच्या आसपासचा काही प्रदेश आपल्या ताब्यात यावा अशी त्यांची इच्छा आणि प्रयत्न होते. पुढे यांचे पुत्र बुवाजी व केरोजी हे थोरल्या बाजीरावांसोबत माळव्याच्या मोहिमेत सोबत गेले होते. कालांतराने दिल्लीच्या मोहिमेत बाजीरावराऊस्वामींसह केरोजी हजर होता. मात्र यानंतर केरोजींबद्दल फारशी माहिती आढळत नाही. बंधू बुवाजी यांस काळुजी आणि संभाजी असे दोन पुत्र होते. त्यांच्याबद्दल इतिहासाच्या पानांत फारशा नोंदी आढळत नाहीत. मात्र काळुजींचे पुत्र तुकोजी आणि जीवाजी तसेच संभाजींचा मुलगे उदाजी व यशवंत यांचे उल्लेख पेशवेकालीन कागदपत्रांत आढळतात. हे चारही पवार चुलत बंधू अनेकदा पेशव्यांच्या बाजूने तसेच क्वचितप्रसंगी विरोधातही लढलेले दिसून येतात.

1720 ते 1729 या नऊ वर्षांच्या कालखंडात या चारही पवार बंधूंनी माळव्यावर सातत्याने स्वार्‍या केल्या होत्या व तसे माफक प्रमाणात यशही प्राप्त केले होते. अखेर पंतप्रधान पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा हे शिंदे, होळकर, पवार यांच्या संयुक्त फौजांसह माळव्यात गेले आणि तिथला मोगल सुभेदार गिरधर बहादूर व त्याचा नातलग दयाबहादूर यांस आमझेरा येथे झालेल्या घनघोर लढाईत परास्त करून माळवा प्रांतावर अधिपत्य मिळवले. हा प्रांत त्यांनी शाहू महाराजांच्या संमतीने या तिघांना वाटून दिला. पुढे मात्र गुजरात प्रांतात डभोई येथील सरसेनापती त्र्यंबकराव दाभाडे यांच्याविरोधात पेशव्यांनी पुकारलेल्या युद्धप्रसंगी 1 एप्रिल 1731 ला उदाजी, आनंदराव व माळोजी पवार हे खुद्द पंतप्रधान पेशवे तथा शाहू छत्रपतींविरोधात लढले. खरेतर उदाजी हा थोरल्या बाजीरावांचा बालमित्र होता. त्यांनी 1723 मध्येच धार येथे आपले तात्पुरते ठाणे बसवले होते, परंतु मुघल अंमलदार गिरधर बहादूर याने त्यास तिथून काढून लावले. 1727 ला पेशवे कर्नाटकातील मोहिमेत गुंतलेले असताना अचानक निजामाने महाराष्ट्रात उचल खाल्ली. यासमयी शाहू छत्रपतींनी उदाजीस तातडीने बोलावून घेतले. पुढे उदाजींचे खुद्द थोरल्या बाजीरावराऊस्वामींशी जमेनासे झाले होते. आता शाहू छत्रपतींचे सेनापती दाभाड्यांचाच पराभव झाला. त्यामुळे उदाजी पवारांचा पण पाडाव झाला.

थोरल्या बाजीरावांच्या दिल्लीवरील मोहिमेत तुकोजी, जीवाजी व यशवंतराव पवार यांनी त्यांच्यावर सोपवलेली कामगिरी चोखपणे पार पाडली. वसईच्या पोर्तुगिजांच्या विरोधातील रणसंग्रामातही त्यांचा सहभाग होता. इसवी सन 1742 मध्ये पेशव्यांनी आनंदराव पवार पहिले यांस अधिकृतपणे सनद प्रदान करून धार येथे संस्थापित केले. याचमुळे माळव्यात शिंदे, होळकर यांच्यासोबतच पवार हे देखील मराठेशाहीचा मध्य हिंदुस्थानातील एक बलाढ्य बुरुज म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे नानासाहेब पेशव्यांच्या कारकीर्दीत मराठ्यांचा दिल्लीपतीशी जो प्रसिद्ध करारनामा / तह झाला त्याची पेशव्यांच्या बाजूची हमी शिंदे, होळकर, पवार यांनी घेतली होती, असे इतिहास सांगतो. यशवंतराव पवार हे 1761 च्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांच्या बाजूने लढताना कामी आले. या सर्व घडामोडी घडत असताना धार आणि आसपासचा प्रदेश आनंदराव पवार यांस मिळाला तसेच लगतच्या देवास परगण्याच्या थोरल्या पातीचे (ीशपळेी लीरपलह) संस्थापक अधिपती म्हणून तुकोजी पवार तसेच धाकट्या पातीचे (र्क्षीपळेी लीरपलह) अधिपती म्हणून जीवाजी पवार हे मान्यता पावले. सुरुवातीच्या या धार संस्थानच्या अधिपतींनी नाणी पाडल्याचे आढळून येत नाही. कारण या राज्यकर्त्यांची कोणतीही तांब्याची, चांदीची किंवा सोन्याची नाणी आजतागायत उजेडात आलेली नाहीत. धार अधिपतींचा 1857 च्या ब्रिटिश सत्तेविरोधातील स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग असल्याच्या संशयावरून ब्रिटिशांनी धार संस्थान तात्पुरते खालसा केल्याची नोंद आढळते, मात्र पुन्हा 1864 मध्ये पवारांना त्यांचे अधिकार पुन्हा सुपूर्द केले, हा इतिहास आहे.

धार संस्थानच्या या गादीवर उदाजीराव पवार, आनंदराव पहिले, यशवंतराव पहिले, खंडेराव, आनंदराव दुसरे, रामचंद्रराव पहिले, मैनाबाई ( प्रतिनिधी ), रामचंद्रराव दुसरे, यशवंतराव दुसरे, आनंदराव तिसरे, उदाजीराव दुसरे उर्फ बाबासाहेब आणि आनंदराव पवार चौथे हे राज्यकर्ते होऊन गेले. यातील आनंदराव दुसरे यांनी आनंदनगर टांकसाळीत / चळपीं, चांदीचा रुपया पाडलेला आढळून येतो, जो उपलब्ध आहे. याचसोबत यशवंतराव दुसरे, आनंदराव तिसरे आणि आनंदराव चौथे यांनीही नाणी पाडल्याच्या नोंदी आढळतात. यातील तांब्याच्या हाती पाडलेल्या र्उीीवश लेळपी नाण्यांवर/पैशांवर दुपदरी, त्रिपदरी जरीपटका, एका हातात गदा चरलश आणि दुसर्‍या हाती ध्वज घेऊन आवेशाने धावणार्‍या श्रीहनुमंताची प्रतिमा र्ठीपपळपस ॠेव करर्पीारप, देवनागरीत धार सरकार तसेच विक्रमसंवत, खांडा तलवार, शिवलिंग, झाड इत्यादी चिन्हे छापलेली आढळतात. ब्रिटिशांनी धारवर ताबा ठेवल्यानंतर आनंदराव पवार तिसरे यांच्या कारकीर्दीत मशिनद्वारे


नाणी पाडली गेलेली आढळतात. यात 1/12 आणा (1 आणा = रुपयाचा 16 वा भाग गणला जाई. पूर्वी एक म्हण होती – काम कसं सोळा आणे बरोबर असावं, म्हणजे बंद्या रुपयाप्रमाणे चोख) म्हणजेच 1/12 आणा हा रुपयाचा 192 वा भाग – एक पै मानला जातो तसेच 1/2 पैसा आणि 1/4 आणा ही सुबक, तांब्याची नाणी इसवी सन 1887 मध्ये (अतिशय कमी प्रमाणात) पाडली गेली होती. मात्र या नाण्यांवर व्हिक्टोरिया सम्राज्ञीची प्रतिमा विराजमान झालेली आढळते. 1948 साली पवार राजघराण्याचे हे धार संस्थान अखेर मध्य भारत संघात विलीन झाले. महाराजा आनंदराव पवार चौथे यांची मध्य भारत संघाचे कनिष्ठ उपराज्यप्रमुख म्हणून निवड झाली. पुढे 1 नोव्हेंबर, 1956 ला धार संस्थान स्वतंत्र भारताच्या मध्य प्रदेशमध्ये सामावण्यात आले. महाराजा आनंदराव पवार चौथे यांनी तर सोन्याची नजराणा मोहर पाडलेली आहे, हे विशेष.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...