विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 13 November 2022

ग्वाल्हेर येथील शिंदे घराणे – 3

ग्वाल्हेर येथील शिंदे घराणे – 3

प्रशांत सुमती भालचंद्र ठोसर | मराठा नाणी संग्राहक, लेखक, व्याख्याते | नाणेघाट

पेशवाई कालखंडात उत्तरेत रोवला गेलेला मराठेशाहीचा भक्कम आधारस्तंभ म्हणजे ग्वाल्हेरचे शिंदे. थोरल्या बाजीरावांचे अत्यंत विश्वासू असलेले संस्थापक राणोजीराव शिंदे व पुढे शिंदे घराण्याचा कळसाध्याय ठरलेले महादजीराव यांच्यासह अनेक शिंदेकुलोत्पन्नांनी दख्खनदौलतीची खंबीर सेवा केली आहे.

ग्वाल्हेर राज्य संस्थापक राणोजीराव शिंदे हे इ. स. 1745 मध्ये मृत्यू पावले. त्यांना एकूण पाच पुत्र होते – जयाप्पाराव, दत्ताजीराव, जोतिबाराव, तुकोजीराव व महादजीराव. राणोजीरावांनंतर ज्येष्ठ पुत्र जयाप्पाराव गादीवर आले. यांच्या काळात ग्वाल्हेर संस्थानचे महसुली उत्पन्न सुमारे 65 लाखांच्या घरात होते. ग्वाल्हेर संस्थानाला केंद्रीय अधिपत्यापासून म्हणजे मध्यवर्ती स्वराज्यसत्तेपासून विलग होण्याची महत्त्वाकांक्षा होती, पण 1761 मधील पानिपतच्या युद्धापर्यंत ते शक्य झाले नाही. मात्र राणोजीपुत्र महादजीराव शिंदे यांनी 1761 नंतर काही काळ कमकुवत झालेल्या मध्यवर्ती मराठा सत्तेच्या स्थितीचा फायदा घेत आपली पकड अधिक मजबूत केली. दरम्यान, जयाप्पाराव हे इ.स. 1755 ला निवर्तले. जयाप्पाराव यांना जयाप्पा दादासाहेब असेही म्हटले जायचे. जयाप्पाराव शिंदे यांच्यानंतर त्यांचा मुलगा जनकोजीराव हा गादीवर आला. मात्र जनकोजी हासुद्धा पानिपतच्या युद्धात आपले काका वीरयोद्धा दत्ताजीराव शिंदे यांच्यासोबत मारला गेला. इतिहासात असे नमूद आहे की, अफगाण आक्रमक अहमदशाह अब्दालीचा सेनानी नजीबखानाने युद्धात पठाणांकडून जखमा झाल्याने युद्धभूमीवर जर्जर होऊन मरणासन्न स्थितीत पडलेल्या वीर दत्ताजीला कुत्सितपणे विचारले, ‘क्यों मरहट्टे और लढोगे क्या?’ मात्र त्याही अवस्थेत साक्षात मृत्यू समोर दिसत असतानाही दत्ताजीने वीराला साजेसे अजरामर उद्गार काढले, जे इतिहासात कायमचे सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहेत.

‘क्यों नहीं, बचेंगे तो और भी लडेंगे.’ हे ऐकून त्या क्रूरकर्म्याने दत्ताजीराव यांना ठार मारले. अजून एक धगधगती मराठा मशाल पानिपतवर कायमची शांत झाली. पानिपतावर सांडलेल्या मराठ्यांच्या अमूल्य प्राणांपैकी दत्ताजीराव शिंदे हे यमुना काठाच्या बुराडी घाटातील लढाईत इहलोकीची यात्रा (10 जानेवारी 1760) संपवते झाले.

जयाप्पाराव यांचा जन्म इ. स. 1720 सालचा. त्यांनी जोधपूर संस्थानाच्या अंतर्गत बाबीत लक्ष घातल्याने म्हणा किंवा हस्तक्षेप केल्याने म्हणा जयाप्पाराव यांचा त्या संस्थानाच्या हस्तकांकरवी राजस्थानमधील नागौर येथे 25 जुलै 1755 रोजी अपमृत्यू झाला, असे इतिहास सांगतो. जयाप्पाराव यांना जनकोजीराव हा पुत्र व चार कन्या होत्या. त्यातील एक निंबाळकर घराण्यात, दोन घोरपडे घराण्यात व एक सावंत-भोसले यांजकडे सोयारिक करून दिल्या होत्या. जयाप्पाराव यांनी फारशी काही नाणी पाडलेले आढळून येत नाहे. मात्र त्यांनी जी काही थोडीफार नाणी पाडली आहेत ती उपलब्ध आहेत. ग्वाल्हेर संस्थानच्या या दुसर्‍या अधिपतीनंतर त्यांचा पुत्र जनकोजी हा तिसरा महाराजा म्हणून अल्पवयातच गादीवर आला. यांचा जन्म इ.स.1745 चा व मृत्यू पानिपतच्या लढाईत म्हणजे 1761 मध्ये झाला. अवघा 16 वर्षांचा हा तरणाबांड मराठा जनकोजीराव शिंदे दिल्लीपतीचे तख्त राखताना युद्धभूमीवर धाराशाई पडला. जनकोजीराव हा त्या प्राप्त अवघड परिस्थितीत निरुपाय होऊन अब्दालीच्या बरखुरदारखानाच्या स्वाधीन झाला. बरखुरदारखानाला हा इतका महत्त्वाचा मोहरा हाती लागल्याने भरपूर खंडणी घेऊन त्यास सोडायची इच्छा होती. त्याने जखमी जनकोजीरावावर औषधोपचार पण केले, परंतु नजीबखानास याचा सुगावा लागून त्याने अब्दालीला ही खबर कळवली. आता अब्दालीची खपा मर्जी होऊ नये म्हणून आधी बरखुरदारखानाने जनकोजीराव ताब्यात आहे हे नाकबूल केले. मात्र नजीबाने अब्दालीला पुन्हा डिवचल्याने त्याने बरखुरदारखानाच्या गोटाची / तंबूची झडती घेण्यास फर्मावले असता बरखुरदारखानाने शेवटी भयास्तव नोकर पाठवून आश्रयास आलेल्या तरुण तडफदार जनकोजीरावांस ठार मारून खड्डा खणून गुपचूप पुरून टाकले. अशा रीतीने नजीबखानाच्या दुष्ट कपटनीतीस हा तरुण शिंदेकुलोत्पन्न जनकोजीराव बळी पडला. जयाप्पारावांचा भाऊ दत्ताजीराव हा जनकोजीचा प्रतिनिधी म्हणून ग्वाल्हेर संस्थान सांभाळत होता. शिंदे संस्थानाच्या र्डेीींह ईळरप उेळपी उरींश्रेर्सीश मधील उल्लेखानुसार सुमारे 20 एक तरी टांकसाळी होत्या. त्यामध्ये तांब्याची, चांदीची व प्रसंगी सोन्याच्या मोहरादेखील छापण्यात आल्या आहेत.
शिंदे यांच्या ग्वाल्हेर संस्थानाच्या नाण्यांमध्ये भरपूर वैविध्य आढळून येते. अनेक चिन्हांनी टंकित अशी ही नाणी असतात. मूळच्या महाराष्ट्रातील पण आता मध्य भारतात प्रस्थापित झालेले हे नागवंशीय शिंदे घराणे महाराष्ट्रातील एक आद्य घराणे गणले जाते. याचमुळे शिंदेकुलोत्पन्नांच्या नाण्यांवर आपणांस मुख्यत्वेकरून नाग अथवा सर्प हा कोरलेला आढळून येतो.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...