विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 8 March 2023

अनामवीरा


अनामवीरा
("अनामवीरा", म्हणजे ज्या वीराच नाव घेतलं जात नाही.
अनेकांना प्रसिद्धी मिळते, गरज नसताना इतिहासात
जागा मिळते. आणि काही जन खूप थोर कार्य करतात पण
त्यांची दखलही घेतली जात नाही. असंच काहीस झाल
आपल्या शंभू राजांसोबत. शेकडो वर्ष त्यांचा खरा इतिहास
दडपला गेला...
मी जेव्हा हि कुसुमाग्रजांची कविता वाचतो तेव्हा तेव्हा शंभू
राजांचेच चित्र उभे राहते...)
अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात
धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी
मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा
जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव
जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान
काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा

 

No comments:

Post a Comment

मराठे आणि अफगाण संघर्ष – उत्तर भारतातील वर्चस्वासाठीचा ऐतिहासिक सामना

  मराठे आणि अफगाण संघर्ष – उत्तर भारतातील वर्चस्वासाठीचा ऐतिहासिक सामना भारतीय इतिहासात मराठे आणि अफगाण संघर्ष हा अठराव्या शतकातील सर्वात मह...