शिवरायांचे पराक्रमी मावळे 



बलिदान स्मारक (समाधीस्थळ)


'सरदार सूर्यराव काकडे' हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी, वयाच्या 16 व्या वर्षी शिवबांनी श्री रायरेश्वराच्या मंदिरात भगवान श्री शंकराला साक्षी मानून
बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे बंधू सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक,बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर आणि सूर्यराव काकडे या आपल्या सवंगड्यांसोबत इ. सन 27 एप्रिल 1645 रोजी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
येथून तर साल्हेरच्या युद्धापर्यंत सूर्यरावांनी स्वराज्याच्या अनेक मोहिमा लढवल्या आणि जिंकल्या.
"रोहिडा" आणि "जावळी" मोहिमेत सूर्यरावांचा मोठा वाटा होता,जवळीवर दोन हजार सैन्य सूर्यरावांनी रवाना केले होते, इ. सन 10 नोव्हेंबर 1659 अफजल खान वधाच्या वेळी महाराजांबरोबर दहा अंगरक्षक होते,त्यापैकी सूर्यराव हे एक होते, इ. सन 1672 मध्ये महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर स्वारी केली, त्यांनतर साल्हेरच्या पायथ्याशी मोठे युद्ध झाले, या लढाईत सूर्यरावांनी मोलाचे कार्य केले होते.
स्वराज्य म्हणजे धगधगतं अग्नीकुंड आणि त्यातील एक मौल्यवान रत्न म्हणजे सूर्यराव काकडे, साल्हेरच्या युद्धाप्रसंगी एका तोफेचा गोळा लागून ते धारातिर्थी पडले,
* सभासद बखरीतील उल्लेख:- "सुर्यराव जणू पंचहजारी, मोठा धारकरी, युद्ध थोर केले ते समयी, जंबुरियाचा गोळा लागून पडीले,सूर्यराव सामान्य योद्धा नव्हे, भारती जैसा कर्ण त्या प्रतिमेचा, असा शूरवीर पडला"
ह्या शूरवीर महापराक्रमी सरदाराने महाराजांनी दिलेली प्रत्येक कामगिरी अलगद पेलली व पूर्ण केली, स्वराज्यास
प्रत्येक समयी, प्रत्येक प्रसंगी विजय मिळवून दिला
आणि शेवटी युद्धात आपला देह ठेवला.

कायम राहील, तोपर्यंत सूर्यरावांची कीर्ती,त्यांचा पराक्रम हा उंच गगनापर्यंत अबाधित राहील.
"स्वराज्याला नेहमी यवनांपासून अबाधित राखावं,शिवरायांसाठी लढता-लढता मरण यावं
आणि उभ्या आयुष्याचं सोनं व्हावं"
ही त्याकाळच्या मावळ्यांची महाराजांप्रती
अपार भावना होती,हे सूर्यरावांचा पराक्रम
आठवल्यावर समजतं.
आज या परमप्रतापी विराच्या समाधीवर,पुन्हा एकदा मस्तक टेकण्याचं भाग्य लाभलं, एकीकडे सूर्यरावांचा पराक्रम आणि साल्हेर युद्धाचा प्रसंग आठवत होता,एकीकडे भगवा डोलत होता,एकीकडे महाराज तर,एकीकडे बलाढ्य साल्हेर नजरेस पडत होता.
सूर्यरावांची समाधी ही पूर्वाभिमुख बांधली आहे,
त्यामुळे एक वैशिष्ट म्हणजे,इथे एक सूर्य दुसऱ्या सूर्याचे नमन करण्यासाठी दररोज प्रगट होतो,इथे दोन सूर्य एकमेकांची महती वर्णन करतांना दिसतात,जोपर्यंत क्षितिजातून सूर्यनारायण उगवत राहील,तोपर्यंत सोनकिरनांच्या रूपाने महाराज आपल्या लाडक्या सवंगड्याला भेटायला दररोज येतं राहतील.
शिवस्वराज्यातील सूर्यासारखा तेजस्वी हिरा
महापराक्रमी वीर सूर्यराव काकडे
यांना शत शत नमन 



No comments:
Post a Comment