पुणे -अहमदनगर रोडवर फिनिक्स मॉल च्या समोर उजव्या हाताला जो रास्त जाते तो वडगाव शेरी गावाच्या जुन्या गावठाणा जाते. गावात प्रवेश करताना उजव्या हाताला वेताळाचा ठाण आहे यावेळी आपण वेताळच दर्शन घेऊन पुढे गावात प्रवेश करतो गावात अजूनही गावगाड्यातली जुनी वाडी पद्धत असून अनेक वाडी हे सुटसुटीत आहेत गावचे कुलदैवत हे भैरवनाथ असून सदर भैरवनाथ मंदिर चा उरूस इथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि मोठी यात्रा भरते परिसरातील गावगाड्यातील आणि कष्टकरी चाकरमाने हे बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित असतात सदर भैरवनाथाच्या उसासाठी यावेळी गावातील परिसरात बाहेर राज्यातील व्यापारी मंडळी व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित असतात सदर गावात आपण प्रवेश करताना भैरवनाथ मंदिर हे पूर्व मुख्य असून अष्टकोनी आहे तसेच समोरील बाजूस महादेव मंदिर आहे सदर भैरवनाथ मंदिराच्या समोर निवृत्तीराव गलांडे पाटलांचा वाडा आहे गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोर बाजूला गणपती मूर्ती आहे तसेच गावातील जुन्या काळातील मारुती मंदिर ही उत्कृष्ट असून सदर हे दीडशे ते दोनशे वर्षे जुना असावे त्यात सोबत मारुतीच्या मंदिरात गणपतीची मूर्ती हे आहे हे आणि ती डाव्या हाताकडे आहे आणि सदर मारुती मंदिराचा सभामंडप हा 60 फूट आहे या गावात काळुबाई व मांढरदेवी यांची दोन स्वतंत्र मंदिर आहेत याच्या शेजारी गावातील एक नाथ संप्रदायातील ठाण पुर्वी असावे असे वाटते व या काळुबाई व मांढरदेवी मंदिर कडे जाताना डाव्या हाताला दोन समाधी असून त्याच्यावर विविध चिन्ह आहेत




सदर गावातील वतनदार घराणं हे गलांडे पाटील असून या घराण्यातील अनेक सरदार मराठेशाही काळात स्वराज्यात सेवा करताना दिसतात या प्रामुख्याने 1705 ते 1725(उपलब्ध कागदपत्रे तून) मध्ये कावजी गलांडे यांचा उल्लेख सापडतो कारण यांच्याकडे असलेल्या सरकाराच्या लष्करी पागासाठी वैरण - पाणी देण्यासाठी सदाशिव पंत यास १७०५-०७ मधील उल्लेख आढळतो छत्रपती कडून सांगण्यात असे उल्लेख सापडतो तसेच सदर सरदार कावजी गलांडे यांना 1724 मध्ये पुणे दिवाणीतून इनाम देण्यात आला आहे




कावजी नंतर 1725- 26 मध्ये गणोजी गलांडे यास ही सरकारीतून इनाम देण्यात आलेलं आहे या संदर्भातील उल्लेख आपणास आढळतात होते असे दिसून येते
२-४_1-अ16/१
यासोबतच पुणे -वाघोली जाणाऱ्या भाविकांसाठी व वाटसरूसाठी सरकारी तून एक विहीर बांधण्यास सांगितले आल्याचे एक पत्र पाठीमागे आढळून आला आहे ते या ठिकाणी आम्ही देत आहोत


सतीआई समाधी
गावात एक सतीआई समाधी आहे जो गलांडे पाटील घराण्यातील असुन त्या सतीआई समाधी चे नूतनीकरण करण्यात आले आहे
येरवडा वडगावशेरीची धर्मपोई* (पाणपोई) 



!!श्री!!
यादी दत्तराम सेट गुजर पेठ रविवार कll पुणे यांनी मौजे येरवडे तालुका हवेली प्रांत मजकूर येथील रानात वाघोली वाटेचे उत्तरेस धर्मपोही करिता विहीर खाटली तेथे वाटसरू येऊन बसतात त्याची छाया नाही यामुळे पाच पंचवीस झाडे लावून छाया होय ऐसे करावे तरी शेत गावचे याज करिता सरकारातून शेत सेट मजकुरास दिल्या गुदस्ता मौजे वडगाव येथील गलांडे कुणबी याने वीसा रुपयाची उखते केले होते ते सेते साल मजकुरी गलांडेने टाकले आहे त्याप्रमाणे सेटे मजकूर यासी सरकारआतून द्यावे उखता पैका सरकारआतून वाजवी ठरेल तो सेट मजकूर सरकारात परभारी साल दरसाल देत जातील सरकारची सनद करून देवावी शेत रूके 6६ साहा आहे शेत वाघोलीचे वलेस आहे याज करिता उखते ठराव करावा सदरहू पत्र साल गुदसता दिले होते ते गैरविलेस पडले सबब दुसरे पत्र द्यावे.
स.ग. जोशी दप्तर
(भारत इतिहास संशोधन मंडळाच्या त्रैमासिकांमधून)
__________
: गंलाडे पाटील हे वाडागावशिरो ता हवेली जि पुण्यातील पाटील घराणे होय सदर वाडागावशिरो गाव पुणे नगर (अहिल्यादेवी नगर) रोड पासून तीन कि. मी अतील भागात आहे पण सदर वाडागावशिरो हद्दीतून मौजे वाघोली रोड जो पुणे -अहिल्यादेवी होळकर नगर रोड जाते याठिकाणी आजच्या विमान नगर येथील फिनिक्स मॉल यांच्या प्रवेशद्वार मध्ये पुर्व एक विहीर होते जो तत्कालीन वाघोली रोड शेजारी होते पुण्यातील वाढलेल्या शहरीकरण सोबत राष्ट्रीय महामार्ग झाले त्यानंतर सदर विहाराच्या शेजारी फिनिक्स मॉल यामुळे सदर विहीरावर स्लॅब टाकण्यात आला . एक मोठी जाळी बसवण्यात आली पुणे कसबा पेठेतील दत्तोजीराव शेठ गुजर यांनी धर्मकार्यासाठी पाणीपुरी वाघोली रोडवर येरवडा हद्दीत बांधली आहे म्हणून यानंतर सादर विहिरीचा शोध घेतला असता सदर विहीरही आजच्या वडगाव शेरी हद्दीत येते आणि तत्कालीन येरवडा जे एकदम राष्ट्रीय महामार्गाच्या परिसरात आहे सदर विहिरीच्या ठिकाणी भेट दिली असता व खात्री करून घेतली असता त्यास पायऱ्या असून ही 30 बाय 30 गोलाकार विहीर आहे आणि तत्कालीन गलांडे पाटलांच्या शेतात आहे अशी नोंद सदर पत्रात सापडली पूर्वी विहिरीच्या परिसरात वाटसरूंसाठी झाडे लावण्यात आली होती व सांभाळली जात असल्याची माहिती दिली शहरीकरणामुळे आज त्यावर स्लॅप टाकून झाकण्यात आले आहे अशी ही माहिता समोर आले.. याबाबत सदर पत्रातील तपशील की दत्तूजीराव गुजर दत्तू राम गुजर पाटील यांनी बांधलेली विहीर आणि त्यासाठी जमीन देणारे कुणबी गलांडे यांचे धर्म कार्यासाठी धर्मकार्यासाठी आपल्या शेतातल्या जमिनीत विहीर खोदण्यास दिलेली मान्यता आणि सरकारीतून झाडे लावण्यासाठी वाटसरांच्या सावलीसाठी झाडे लावण्यासाठी दिलेली अर्ज यावरून गलांडे पाटील हे सामाजिक भान ठेवून आपल्या गाववाड्यातील पाटील की कारभार सांभात असल्याचं याद्वारे दिसून येते इतिहासाच्या पानात असे अनेक घराणे आहेत की जे आपल्या सत्कार्यामुळे अजरामर झाले.
इतिहासाच्या पानावर अनेक घराण्यातील वीरांचीआपलं पराक्रम कर्तृत्व धामूधूमीच्या कालखंडातील पडझडीमुळे इतिहासातील अनेक संदर्भ पुरावे हे नष्ट झाले आणि याचा फटका या घराण्यांच्या इतिहास पुढे आणताना बसत आहे पण आज रोजी झालेल्या संशोधनातून गलांडे घराण्यातील तीन सरदारांची नावे आढळून आले आहेत ती सदर या लेखात आम्ही दिलेली आहेत यातील कावजी गलांडे हे 1705 पासून ते 17 26 पर्यंत मराठ्यांच्या इतिहासात कागदपत्रातून आढळून येतात याचेही लढवावी असून यांच्याकडे सरकारी च्या पागाची जबाबदारी असावी कारण शेजारील मुंढवा येथे पेशव्यांच्या लष्करी पागा होत्या आणि लष्करी तळही होतं हे इतिहासात सर्वश्रेत आहेत या दृष्टीने भविष्यातील अभ्यास व संशोधन झालं पाहिजे आपले राष्ट्रमाता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य
संस्थापक संतोष झिपरे
9049760888
No comments:
Post a Comment