विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 16 February 2024

राजेश्री बापाजी नरसिंगराव व विठोजी शितोळे देशमुख प्रांत पुणे

 



राजेश्री बापाजी नरसिंगराव व विठोजी शितोळे देशमुख प्रांत पुणे
हे पत्र शिवछत्रपतींची पत्रे खंड १ मधे छापलेले आहे (पत्र क्रमांक ६६), या पत्रा संबंधी टीप आहे (टीप क्रमांक १०७) त्यात "हे पत्र अस्सल वाटावे असे केले आहे तरी बनावट आहे (श्री राजा शिवछत्रपती भाग २, पृष्ठ १०१-१०४ पहा) असे लिहिलेले आहे. पूर्ण लिप्यंतर....
मसुरल अनाम राजेश्री बापाजी नरसिंगराव व विठोजी सिंतोले देशमुख पा। पुणें प्रति राजेश्री शिवाजी राजे उपरी तूम्ही नारोकृस्ण धडफले हजुर पाठविले त्याणी येऊन मालूम केले किं कदीम हक देसमुख होनू १९०६ येकुणीसे
सा व गावखंडी व इनामती व बाजे हक व देस कुलकर्णी होनु
५९४ पांचसे चौऱ्याणव आहेत त्या वरी इनामती खंड
णी माहाराज साहेबाचे कारकीर्दीस गाव खंडी व बाजे हक व
इनामती माफ करुनू य़ैन हकावरी देशमुखा कडे होन ३०५
तिनसे पांच व देसकुलकर्णी होनू ९५ पंच्याणव येणें
प्रमाणे च्यारसे होनू घ्यावयाचा तह आहे त्या प्रमाणे मा
हालाचे कारकून आजार लाविताती हालीं मोगलाचे धामधू
मेने मुलूक वैरान जाला आहे या करीतां दस्त माफिक
इनामती खंडणी द्यावयाचा हुकूम केला पाहिजे
म्हणऊनू मालूम केले त्यावरून महालाच्या कारकुनास
हुकूम अलाहिदा सादर केला असे ते दस्त माफिक
तुम्हा पासून इनामती खंडनीचा वसूल घेतील ब
हुत लिहिणे तरी तुम्ही सुज्ञ असा (मर्यादेयं विराजते)
साभार राहुलजी मराठे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...