विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 28 April 2024

राष्ट्रधर्माचे निर्माते छत्रपती शाहू

 


राष्ट्रधर्माचे निर्माते छत्रपती शाहू -
चंबळ च्या उत्तरेस पोचून नादिरशहा ला तिथेच गाठण्याचा बाजीरावांचा मानस होता जेणेकरून नादिरशहा माळव्यात शिरू शकणार नाही. मराठा आणि मोगल हेरांनी उत्तरेत अफ़वा पेरल्या कि शाहूंनी पूर्व,पश्चिम आणि दक्षिणेतून
एकत्रित २ लाखांची फौज बाजीरावांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या रक्षणास पाठवली. या बातमीचा योग्य तो परिणाम होऊन नादिरशहा मराठ्यांच्या भीतीने दिल्ली सोडून इराण ला ५ मे १७३९ ला निघाला. जाण्यापूर्वी २५ एप्रिल ला त्याने दिल्लीहून शाहू छत्रपती आणि बाजीराव यांना पत्रे लिहिली ज्यात "हिंदुस्थान चा कारभार चालवण्यास हिंदुपती शाहूच योग्य व्यक्ती आहेत,मोहम्मद शाह याला पुन्हा बादशाह नेमले आहे त्यांचे साथीने कारभार चालवावा" असे नमूद केले.
अहमदशाह अब्दालीचा गुरु असलेला नादिरशहा हा अब्दाली पेक्षा क्रूर, विक्षिप्त आणि जिहादी प्रेरणेने भारलेला कडवा राजा होता. जर नादिरशहा बादशाह म्हणून हिंदुस्थानात स्थिरावला असता आणि दक्खनेत जाऊन त्याने मराठ्यांचा पराभव केला असता तर नादिरशहा च्या कडव्या विचारसरणीने हिंदुस्थानचे इस्लामीकरण नक्कीच झाले असते. मराठे जर उत्तरेत गेले नसते, तर संपूर्ण उत्तर हिंदुस्थान नादिरशहा किंवा अबदाली अशा धर्मवेड्या
प्रवृत्तींच्या हाती गेला असता.
छत्रपती शाहू यांनी नुसता देशच नव्हे तर धर्म सुद्धा वाचवला, भारतातल्या मुघल सत्तेचे संरक्षक बनून त्यांनी 'राष्ट्रधर्मा' ची हि निर्मिती केली. छत्रपती शाहू म्हणजे दुर्दम्य आशावादाचे प्रतीक होते, वडिलांचे लढवय्ये गुण आणि आजोबांचा दूरदर्शीपणा याची सांगड घालून त्यांनी भगवा
महाराष्ट्रातून भारतभर नेला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...