२५ एप्रिल १६९३
संताजीने अलीमर्दनखानाला कैद करून बदल्यात सुटकेसाठी खंडणीचे एक लाख होन गोळा करण्यासाठी त्याच्या माणसांना भीक मागत फिरायला लावले होते.
२५ एप्रिल १६९३ चे अलीमर्दनखानाच्या लोकांनी औरंगजेब बादशहाला दिलेले एक आर्जव पत्र उपलब्ध आहे. त्या आर्जव पत्रात म्हटलंय कि, " अलीमर्दनखानास मराठ्यांनी पकडून कैदेत टाकले आहे. एक लाख होन खंडणी भरल्याशिवाय मराठे अलीमर्दनखानास सोडायला तयार नाहीत. अलीमर्दनखानाची माणसे हैदराबादेत आलेली आहेत.
अलीमर्दनखानाचे हत्ती आणि इतर जिन्नस विकून खंडणीची भरपाई करण्याचा प्रयत्न त्याचे लोक करीत आहेत. परंतु हैदराबादचे अधिकारी वरील जिन्नस विकण्यास मनाई करत
आहेत."
ह्यावर औरंगजेब बादशहाने हैदराबादचा सुभेदार जानसिपार खान ह्यास लिहून कळविले कि, "अलीमर्दनखानाच्या लोकांस हत्ती आणि इतर जिन्नस विकण्यास आडकाठी करू नये."
अक्षरशः भीक मागून आणि जवळ आहे ते सर्व विकून शेवटी अलीमर्दनखानाच्या लोकांनी पैसे गोळा केले आणि संताजी घोरपड्यांस आणून दिले. मगच संताजीने अलीमर्दनखानाची सुटका केली.
No comments:
Post a Comment