विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 April 2024

छत्रपती शिवाजी महाराज -१०

 


छत्रपती शिवाजी महाराज -१०
---------------------------
सुरतेची लूट- ०६-१० जानेवारी१६६४.
मुघल बादशहाला दरवर्षी सुरत मधून बारा लाख रुपये अबकारी कर मिळत होता. सुरतेत इंग्रज व डचांच्याही वखारी होत्या पण त्यांची संरक्षण व्यवस्था त्यांनी केली होती. सुरतेच्या सुभेदार विनायक खान याने दरवर्षी 500 सैनिकांचे वेतन खजिन्यातून घेऊन ही संरक्षणाची व्यवस्था केलेली नव्हती. शिवाजी महाराज 4000 निवडक घोडदळासह बासिन येथून नळदुर्ग माहुली कोहाज जवाहर रामनगर मार्गे सुरतला पोहोचले होते. बुधवारी सहा जानेवारी 1664 रोजी सकाळी अकरा वाजता ते सुरतला पोहोचले आणि पूर्वे कडील बगीच्यात मुक्काम ठोकला.
त्यांनी रीत सर शहरातील श्रीमंत व्यापाऱ्यासह सुभेदारांना आपणास भेटून खंडणीच्या अटी निश्चित कराव्यात अन्यथा जाळपोळ केली जाईल असा निरोप दिलेला होता. तथापि त्यास प्रतिसाद न मिळाल्यामुळे ताबडतोब बंदूकधारी सैनिकांची तुकडी लूट करण्यासाठी रवाना झाली.
डचांच्या वखारीजवळ बहिर्जी बोहरा हा जगातील सर्वात श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्या घरातून 28 शेअर मोती जडजवाहीर माणिक पाचू आणि हिरे व अगणित धन संपत्ती मिळाली.
हाजी सैद बॅग या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरात वखारी त दोन दिवस लूट सुरू होती.
महाराजांनी इंग्रजांना सुद्धा तीन लाख रुपये खंडणी द्यावी अशी मागणी केली होती. तथापि इंग्रजांनी आम्ही तयार आहोत असे आव्हान दिले. महाराजांनी इंग्रजांना छेडणे टाळले. मिळालेली लूट घेऊन निसटणे महत्त्वाचे होते. त्यावेळी इंग्रजांकडे संरक्षणासाठी फक्त 210 लोक होते!
सुरते तील लुटी मधून महाराजांना कोट्यावधी रुपये मिळाले. बादशहाच सैन्य सुरतेला येत आहे अशी खबर महाराजांपर्यंत आली. चार दिवस आणि रात्री लूट करून रविवारी सकाळी दहा तारखेला महाराजांनी आपल्या सैन्यासह सुरत सोडली. १७ तारखेला बादशहाचे सैन्य सुरत मध्ये दाखल झाले तोपर्यंत सर्व शहर उजाड बनले होते.
या लुटीच्या दरम्यान इनायत खान या सुभेदाराने आपला एक मनुष्य दूत म्हणून पाठवला. त्याने महाराजांवर हल्ला केला. महाराजांच्या शरीर रक्षकांनी त्याला ठार केले.
सुरतेच्या व्यापाऱ्यांना बादशहाने एक वर्ष जकात माफ केली आणि इंग्रज व्यापाऱ्यांना आयात करात अर्धा टक्का सवलत दिली.
दिलीप गायकवाड.
०८-०४-२०२४.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...