----------------------------
सुरतेची लूट आणि शाहिस्तेखानावरचा अपमानास्पद हल्ला यामुळे संतापलेल्या औरंगजेबाने आपल्या 30 सप्टेंबर 1664 च्या वाढदिवसानिमित्त च्या सोहळ्यादिवशी शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग यांना पाठवत असल्याचे जाहीर केले. सोबत दिलेरखान, दाऊद खान कुरेशी, राजा रायसिंग सिसोदिया, एहतेशाम खान शेखजादा, कुबेर खान, राजा सुजाणसिंग बुंदेला व किरात सिंग यांचीही नियुक्ती केली.
मिर्झाराजे जयसिंग 9 जानेवारी 1665 रोजी हंडीयाजवळ नर्मदा नदी ओलांडून 10 फेब्रुवारीला औरंगाबाद मध्ये पोहोचला. तिथे दख्खनचा सुभेदार शहजादा मुअज्जम याला भेटून स्वारीची तयारी करून 13 फेब्रुवारी रोजी पुण्याकडे कूच केले. 3 मार्च रोजी पुण्यात पोहोचताच महाराजा जसवंत सिंग यांची भेट घेतली व कामाची जबाबदारी स्वतःकडे घेतली. आठ वर्षाचा अनाथ मुलगा म्हणून मुघल सैन्यात दाखल झालेला जयसिंग तेरा वर्षाचा असताना सन सोळाशे बावीस मध्ये अंबरचा राजा म्हणून राज्याभिषेक केला होता. बालक पासून विजापूर पर्यंत आणि कंदहार पासून मुंगीर पर्यंत त्याने युद्ध केलं होतं. शहजादे असलेल्या सैन्याच्या तुकडीचा अधिपत्याचा मान त्याला दिलेला होता. त्याला हे यश शौर्य पेक्षा मुत्सद्दीपनामुळे मिळाले होते.
मिर्झाराजे जयसिंग यांनी आपल्या मोहिमेची काटेखोर आखणी केली. विजापूर आणि गोवळकोंडा येथून शिवाजी महाराजांना रसद येऊ नये यासाठी त्याने आपला तळ दोहोंच्या मध्ये पुण्याच्या पूर्वेला निश्चित केला. विजापूरकरांना सवलती देऊन शिवाजी महाराजांना मदत करणार नाहीत याची खात्री केली. शिवाजी महाराजांचे सर्व शत्रु एकत्र केले. जंजिऱ्याचा सिद्धी, बसव पाटणचा जमीनदार, जवाहरचा राजा, जावळीचे चंद्रराव बाजी आणि अंबाजी गोविंदराव मोरे, माणकोजी धनगर, कल्याणचे कोळी राजे आत्मा जीव कहार, सुपे परगण्याच्या जागीरदारांच्या वंशातील राम आणि हनुमंत ही प्रमुख नावे होत.
बादशहाने जयसिंगाकडे संपूर्ण मुलकी आणि लष्करी अधिकार देऊन अहमदनगर व परांडा येथील किल्लेदारांनाही त्यांच्या आखात्यारीखाली ठेवले. जय शिंगाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इच्छा भूत अभ्यास करून मध्यावर घाव घालण्याची नीती ठरवून सासवडला आपला तळ उभा करण्याचे निश्चित केले.
शिवाजी महाराजांची सगळीकडून नाकेबंदी करण्यासाठी त्याने लोहगडासमोर तळ उभा करून कुतुबुद्दीन खानाला 7000 घोडदळासह लोहगड ते कोकणातील मुलखापर्यंत लक्ष ठेवण्यास सांगितले. लोहगडाला 3000 सैन्याचा वेढा घातला व नळदुर्ग ची नाट्यबंदी केली. येथे श्याम खानाला 4000 चे घोडदळ देऊन पुणे व सभोवताली नजर ठेवण्यासाठी नेमले. पुणे ते लोहगड देखरेख ठेवण्यासाठी 2000 चे घोडदळ नेमले. सय्यद अब्दुल अजीज याला 3000 घोडदळ देऊन शिरवळ चे ठाणे तसेच दक्षिणेकडून पुरंदरची मदत रोखण्याचे काम दिले.
पुरंदर ला वेढा घालण्याची तयारी जयसिंगाने सुरू केली. 14 मार्च रोजी तो पुण्यातून बाहेर पडला तोच शिवाजी राजे लोहगडावर आल्याचे त्याला समजले. जयसिंग बाहेर पडतात मुघलांच्या ठाण्यांवर ते हल्ले करणार होते त्यामुळे जयसिंग परत फिरला आणि कुतुबुद्दीन खानाला परत बोलावून लोहगडावर व राजांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. नंतर तो 23 तारखेला पुण्यातून निघून लोणी येथे पोहोचला. तिथे त्याने राम व हनुमंत यांच्या नेतृत्वाखाली 300 घोडदळ व तीनशे बरकंदास देऊन ठाणे उभारले. 29 मार्च रोजी दिलेरखानास सैनिक तोफा व अवजड सामानासह पुरंदर पासून चार मैलावर जाऊन मुक्काम करण्यास सांगितले.
दाऊद खानास रक्षणासाठी पाठीमागे ठेवून जयसिंग 30 मार्च रोजी दिलेरखानाच्या छावणी च्या दिशेने निघाला. त्याच दिवशी दिलेरखान छावणीसाठी टेहळणी करत पुरंदर जवळ पोहोचला. तिथे गडाच्या माचीवर मराठे बरक अंदाज जमले होते त्यांनी खाली उतरून मुघल सैन्यावर अचानक हल्ला चढवला. परंतु दिलेरखानाने ती माची जिंकली. मुघल सैन्याने तिथली घरे जाळून तोफांच्या टप्प्याच्या बाहेर मुक्काम केला. जयसिंगाने दिलेरखानाच्या मदतीला रायसिंग किरत सिंग कुबदखान मित्रसेन इंद्रमणी बुंदेला आणि इतर सरदारांच्या नेतृत्वाखाली तीन हजारांचा घोडदळ पाठवलं.
पुरंदर टेकड्यांच्या समूहाने बनलेला किल्ला असून वज्रगड व पुरंदर असा तो जोड किल्ला आहे. जयसिंगानं आधी वज्रगड घेण्याचा निर्णय घेतला. त्याने पुरंदर आणि वज्रगड म्हणजेच रुद्रमाळ यांच्या दरम्यान खंडक खणला. सर्व मोर्चे बांधणी करून त्याने आपली छावणी आणखी जवळ आणली. अब्दुल्ला खान, फात - ए- लष्कर, हाहेली या अवजड तोफा चढवण्यात आल्या. या तोफांच्या अखंड माऱ्यामुळे रुद्रमाळचा पाया ढासळला. लगेच तिथे सुरुंग पेरला आणि भगदाड पाडले. 13 एप्रिल दिवशी दिलेरखानाने जोरदार हल्ला चढवला. जयसिंगाने ही आपले स्वतःचे रजपूत सैनिक पाठवून दिलेरखानाला मदत केली. जयसिंगने तोफ गोळ्यांचा मारा सतत चालू ठेवल्यामुळे शिवनदीने शरणागती पत्करली. धूर्त जयसिंगाने शिबंदीस सोडून दिले. शौर्याने किल्ला लढवणाऱ्यांचा जयसिंग व दिलेरखनाने पोशाख देऊन सन्मान केला. हेतू हा की इतरांनीही त्यांचे अनुकरण करावे.
शिवाजी महाराजांच्या पारिपत्त्यासाठी जयसिंगाने काटेखोर आखणी केली होती. पुरंदरच्या सभोवतालच्या सर्व मुलखामध्ये लुटमार व जाळपोळ यांचा कहर माजवला होता. त्यासाठी त्याने कुच कामाचे, आळशी आणि नकारात्मक बोलणारे खोडसाळ असे सर्व सरदार नेमून शिवाजी महाराजांना सळो की पळो करून सोडले होते. राजगड सिंहगड आणि रोहिडा परिसरात उत्पात माजवला होता. दरम्यान शिवाजी महाराजांनी लोहगडाजवळ मोठी फौज जमा केल्याचे जयशिंगाला समजतात त्याने आपल्या पुण्याजवळच्या सैन्याला तिकडे पाठवले आणि ती फौज विस्कळीत करून टाकली. तसेच लोहगड विसापूर तिकोना टांगाई या चार किल्ल्यां भोवतींची सर्व गावे लुटून जाळून उध्वस्त केली.
वज्रगड ताब्यात आल्यानंतर दिलेरखानाने पुरंदर कडे हळूहळू कुच केले. यावेळी मराठ्यांनी शत्रूच्या तुकड्यांवर रात्रीचे हल्ले करून बेजार करून सोडले. तथापि दिलेरखानाने निर्धाराने आगेकूच सुरू केली. मुघलांचे खंडक दोन पांढऱ्या बुरुजांच्या पायथ्याशी येऊन भिडले. हे बुरुज तोफ गोळ्यांच्या माऱ्यामुळे उडवले होते. मराठ्यांनीही निकराची झुंज दिली होती. काही केल्या दिलेरखानाला पुढे येणे कठीण केले होते. परंतु संख्येने कमी असलेल्या मराठ्यांना त बलदंड शत्रूला थांबवणे अवघड झाले. किल्लेदार मुरारबाजी प्रभुने 700 मावळे सोबत घेऊन दिलेरखानावर अचानक हल्ला चढवला आणि पाचशे पठाणांचा खात्मा केला. त्याच्या शौर्याचे कौतुक करत त्याला जीवदान देऊन दिलेरखानाने स्वतःच्या हाताखाली काम करण्याचा प्रस्ताव दिला. परंतु मुरारबाजीने तो साप नाकारला आणि दिलेरखानावर हल्ला केला. मग दिलेरखानाने ही त्याला बाण सोडून ठार केले. त्यावेळी 300 मावळे ही ठार झाले होते.
आता मराठ्यांनी पांढरा पुरुष सोडून दिला आणि काळ्या बुरुजा आड गेले. आम्ही सर्व बाजीप्रभूच आहोत या निर्धाराने मराठी लढले. याचा परिणाम असा झाला की दिलेरखानाला आपली मोहीम धीम्या गतीने चालवावी लागली. त्याने आधी ताब्यात घेतलेल्या मुलखाचे व्यवस्थित रक्षण केले आणि पांढरा बुरुज ताब्यात ठेवला. दोन दिवस झटून त्यांनी लाकडी रचना उभी केली आणि त्यावर तोफा चढवल्या. या तोफांच्या माऱ्याला मराठे तोंड देऊ शकले नाहीत. त्यामुळे दोन जून रोजी मेढेकोट मुघलांच्या हाती पडला. अशाप्रकारे खालच्या किल्ल्याचे पाच बुरुज आणि एक मेढेकोट मुलांच्या हाती आला. किल्ल्यावरच्या शिबंदीचे प्रचंड नुकसान झाले होते.
महाराजा जयसिंग धूर्तपणे व निश्चयपणे अचूक चाली करत आहे हे लक्षात येताच शिवाजी महाराजांनी त्याच्याशी संपर्क साधण्या साठी दूत पाठवले. तथापि औरंगजेबाने शिवाजी कुठल्याही प्रकारच्या वाटा घाटी करायच्या नाहीत असे सांगितले होते. त्यामुळे जयसिंगाने सुरुवातीला तिकडे दुर्लक्ष केले. 20 मे रोजी महाराजांनी रघुनाथ बल्लाळ अत्रे यांना जयसिंगाच्या अटी समजून घेण्याच्या मोहिमेवर पाठवले. जयसिंग ची अट होती की पहिल्यांदा शिवानी वैयक्तिकरित्या बिनशर्त शरणागती पत्करावी .त्यानंतर बादशहाकडून त्याच्यावर दया दाखवली जाईल. मग शिवाजी महाराजांनी अटी मान्य झाल्या अगर झाल्या नाहीत तरीही सुरक्षितपणे जयसिंगांची भेट घेऊन परत येता येईल असं वचन जयसिंगाकडून मागितलं. रघुनाथ बल्लाळ 9 जून रोजी परत आला आणि त्याने 10 जूनला महाराज दुसऱ्या दिवशी भेटीला येतील असा निरोप जयसिंगाला पाठवला. 11 जून रोजी जयसिंगाला भेटले आणि महाराज सहा ब्राह्मणांसोबत एकटेच आल्याचं त्याला सांगितलं. जयसिंगाने निरोप दिला की सगळे किल्ले मुघलांना देणे मान्य असेल तरच भेटीसाठी यावे अन्यथा आल्या पावली परत जावे.
अटी मान्य असल्याचे वर करणे भासवून शिवाजी महाराज जयसिंगराला भेटायला आत गेले. जयसिंगच्या मुजुमदाराने त्यांचे स्वागत केले. आत गेल्यानंतर जयसिंग ही उठून समोर आला आणि राजांना त्याने आलिंगन दिले व आपल्या शेजारी बसवले. तरीही दगाफटका होऊ नये म्हणून दोन सशस्त्र सैनिक जवळ उभे ठेवले होते. तसेच दिलेरखान आणि किरत सिंग यांना इशारा करताच पुरंदर वर हल्ला करण्याच्या सूचना आधीच दिल्या होत्या. त्यानुसार जयसिंगाने इशारा सूचना दिली आणि मुघल सैन्याने खडकाळ्यावर हल्ला करून काही भागाचा ताबा घेतला. जयसिंगाच्या शिबिरातून हे स्पष्ट दिसत होते. त्यावेळी महाराजांनी मराठा सैनिकांची कत्तल टाळण्यासाठी किल्ला देण्याची तयारी दाखवली. जयसिंगाने ही लगेच मी तुझं आणि दाजी बेग यांना दिलेरखान व किरातसिंगाकडे पाठवून युद्ध थांबवावे आणि शिबंदीला निघून जाण्याची परवानगी द्यावी असा आदेश दिला. महाराजांनीही आपला अधिकारी सोबत देऊन किल्ला खाली करून देण्याच्या आधी त्या रात्री पुरती विश्रांती करता मुदत मागून घेतली.
पुरंदरचा तह अर्थात मुत्सद्देगिरीचा कळस -
जयसिंगाने शिवाजी महाराजांना पाहुणा म्हणून ठेवून घेऊन मध्यरात्री कायमस्वरूपी तहाच्या अटी ठरवण्यासाठी बसले. त्या अशा -
अ) स्वराज्याचे 23 किल्ले आणि चार लाख होनांचा वार्षिक महसूल देणारी भूमी बादशहाच्या संतनतीला जोडावी.
ब) राजगड आणि तेथील एक लाख होऊन वार्षिक महसुलांसह त्यांचे बारा किल्ले त्यांच्याच ताब्यात रहावेत.
शिवाजी महाराजांनी बादशहाच्या सेवेत निष्ठापूर्वक काम करावे या अटीवरच हा करार करण्यात येत आहे असे बादशहाला कळवले.
माझ्या आज पर्यंतच्या अविवेकी आणि राजद्रोही वर्तनामुळे मला बादशहा समोर जाण्यासाठी तोंड नाही अशी सबब सांगून महाराजांनी आपल्या पुत्रास 5000 च्या घोडदळासह मनसबदार म्हणून नेमले जावे, मला मनसब किंवा मुघलांच्या सेवेतून वगळला जावं तथापि तुम बादशहाच्या दख्खन मधील कुठल्याही युद्धाच्या वेळी माझ्यावर सोपवलं जाईल ते काम मी पार पाडून देईन.
याशिवाय महाराजांनी आणखी एक अट घातली- जर तळ कोकणातील वार्षिक चार लाख होन आणि घाटी मुलकातील वार्षिक पाच लाख होनांचा मुलुख बादशहाकडून मला दिला आणि असे शाही फर्मान काढून माझ्याकडे मालकी दिली तर मी बादशहाला तेरा वर्षात हप्त्यांनी 40 लाख होन देईन. (महाराजांनी हा मुलुख स्वबळावर काबीज करावयाचा आहे.)
जयसिंगाने ही एक अट घातली - शिवाजी महाराजांनी मुघलांना विजापूर वरच्या आक्रमणात पुत्र संभाजी यांच्या मनसबीतील दोन हजार घोडदळ आणि आपल्या नेतृत्वाखालील सात हजार पायदळासह मदत करावी.
तथापि दिलेरखान नाराज झाला. या तहात त्याला काहीच मान मिळाला नव्हता. त्याने खनकातून बाहेर पडण्यास आणि युद्धतहकुबिला मान्यता देण्यास नकार दिला. त्यामुळे जयसिंगाने शिवाजी महाराजांना रायसिंगा बरोबर दिलेरखाना कडून संमती घेण्यासाठी हत्तीवरून पाठवण्यात आले. मग दिलेरखान खुश झाला आणि त्याने महाराजांना दोन घोडे एक तलवार रत्नजडित कट्यार आणि दोन मौल्यवान पोशाख भेट दिले. तसेच तो महाराजांना जयसिंगाकडे घेऊन आला आणि राजांना त्याच्या समोर सादर केलं. जयसिंगानही महाराजांना पोशाख एक घोडा हत्ती आणि हिरेजडीत तुर्याचे शिरोभूषण दिल. त्याच दिवशी म्हणजे 12 जून रोजी 7 हजार स्त्री पुरुष पुरंदर किल्ला मुघलांकडे सोपवून पुरंदर सोडून गेले. तसेच इतर पाच किल्ल्यांचा ताबा घेण्यासाठी मुघल अधिकाऱ्यांना महाराजांच्या माणसांसोबत पाठवले.
शिवाजी महाराजांनी जयसिंगाला धूर्तपणे सांगितले की- "ते बादशहाचे एकनिष्ठ परंतु निश शस्त्र सेवक म्हणूनच सेवा करतील!"
महाराज जयसिंगाकडे दूत पाठवत होते तेव्हाच जयसिंगाने ही बादशहाकडे दूरदृष्टीने शिवाजी राजांच्या नावे शाही फर्मान पाठवून द्यावे अशी विनंती अनेक वेळा केली होती. योगायोगाने महाराजांनी शरणागती पत्करल्याच्या दुसऱ्याच दिवशी फर्मान आणि शाही पोशाख जयसिंगाकडे पोहोचले. महाराजांनी ही राजश्रीष्ठाचाराचे पालन करीत सहा मैल पुढे जाऊन फरमानाचे स्वागत केले व पोशाख स्वीकारला.
14 जून रोजी जयसिंगाने महाराजांना एक हत्ती आणि दोन घोडे भेट दिले व दाऊद खानाची औपचारिक भेट घेऊन खरात सिंगा बरोबर त्यांना राजगडावर पाठवले. कोंढाण्यावर पोहोचताच महाराजांनी किल्ला खरात संघाच्या ताब्यात देऊन ते पुढे राजगडाकडे रवाना झाले. 17 जून रोजी राजगडावर पोहोचताच त्यांनी संभाजींना उग्रसेन कछवाहकडे पाठवले आणि ते 18 तारखेला जयसिंगाच्या छावणीत आले. मराठ्यांचे खालील किल्ले मुघलांना दिले - १)वज्रगड २)पुरंदर ३)कोंढाणा ४)रोहिडा ५)लोहगड६) विसागड ७)टाकी ८)तिकोना ९)माहुली १०)मुरंजन ११)खिरदुर्ग १२)भंडारदुर्ग १३)तुलसी खुल १४)नळदुर्ग १५)अंकोला १६)मार्गगड १७)कोहज १८)वसंतगड १९)नंग २०)कर्नाळा २१)सोनगड २२)मानगड २३)खडकाळा.
तहाच्या अटी, शरणागतीचा खलिता आणि क्षमापत्र बादशहाकडे मान्यतेसाठी पाठवले. सोबत अटी मान्य करून शिवाजी ला मानाचा पोशाख पाठवून द्यावा असे जय सिंहाचे शिफारस पत्रही पाठवले. 23 जून रोजी ही पत्रे बादशहाकडे पोहोचली व त्याने त्या सर्वांना आनंदाने मान्यता दिली. अशाप्रकारे मोहीम सुरू केल्यापासून तीन महिन्याहून कमी कालावधीत महाराजांना शरण येण्यास जयसिंगाने भाग पाडले होते. शिवाजी महाराजांनीही त्यांच्या वचनाचे पालन केलं आणि आदिलशाही विरुद्धार्थी लढाईत मुघलांच्या झेंड्याखाली उत्तम कामगिरी केली. सप्टेंबर मध्ये बादशहाकडून शिवाजी महाराजांविषयी च्या शिफारशी मान्य केल्याचा खलिता आणि महाराजांसाठी शाही फर्मान व मानाचा पोशाख आला. शिवाजी महाराज त्यावेळी कोकणात होते. 27 सप्टेंबर 1665 रोजी निरोप मिळाल्याबरोबर ते छावणीत दाखल झाले. 30 तारखेला आपला मुलगा की रात सिंग आणि मुजुमदार यांनी खान यांच्यासोबत शाही खाली त्याचं स्वागत करण्यासाठी पाठवून दिलं. जयसिंगाने ही त्यांना रत्नजडित तलवार आणि कट्यार देऊन ती धारण करण्यासाठी भाग पाडले. बादशहाची मेहेर नजर झाल्यामुळे त्यांना पुन्हा सशस्त्र केले.
त्यानंतर 9 आणि आगामी मोहिमेच्या तयारीसाठी जयसिंगान महाराजांना शाही तिजोरीतून दोन लाख रुपये दिले. 20 नोव्हेंबर 1665 रोजी विजापूर वर आक्रमण करण्यासाठी जयसिंग पुरंदर किल्ल्यातून बाहेर पडला. त्यावेळी नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली 9 000 घेऊन शिवाजी महाराज येऊन मुघलांना मिळाले. पुरंदर ते मंगळवेढा हा प्रदेश १८ डिसेंबर पर्यंत सहजपणे जिंकला. कारण शिवाजी महाराजांची फौज अग्रभागी होती ते पाहून सर्व किल्लेदारांनी शरणागती पत्करली. याबद्दल बादशहाकडून शिवरायांना प्रशस्तीपत्र मानाचा पोशाख आणि रत्नजडित कट्यार मिळाली.
आता मुघल सैन्याने विजापूरच्या दिशेने कुच केली. 25 डिसेंबर रोजी त्यांचा विजापूर फौजेबरोबर पहिला खटका उडाला. यात विजापूरकरांचा सिद्धी हा सेनापती व त्यांचे इतर पंधरा सेनापती ठार झाले. शिवाजी महाराज आणि त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजी यावेळी प्रथमच एकमेकांच्या विरोधात लढले! यानंतर 27 तारखेला पुन्हा पुढे कूच केली तेव्हा दुसऱ्यांदा विजापुरी फौजेशी त्यांची चकमक उडाली. हा हल्लाही यशस्वीपणे परतवून लावला.
29 डिसेंबर रोजी जयसिंग विजापूर किल्ल्याच्या उत्तरेला दहा महिला वरील मखनापूर येथे पोहोचला. त्याला पाच जानेवारी 1666 पासून माघार घेणे भाग पडले. कारण त्याने घाई घाई ने विजापूर वर हल्ला चढवला होता आणि त्यासाठी त्याच्याकडच्या मोठ्या तोफा आणि वेढ्यासाठी लागणारे साहित्यही बरोबर घेतलेले नव्हते. याउलट विजापूरकरांनी जय्यत तयारी करून शारजा खान व सिद्धी मसूद यांच्याकरवी मुलांच्या मुलाखात घुसखोरी व लुटालुट सुरू केली. मुघल फौज 27 जानेवारीला परंडा जवळ आल्या.
विजापूरच्या अपयशाला दिलेरखानाने शिवाजी महाराजांना जबाबदार धरत त्यांच्या अटकेची मागणी केली. त्यामुळे जयसिंगाने शिवाजी महाराजांना पन्हाळा ताब्यात घेण्यासाठी पाठवले. 11 जानेवारी 66 रोजी जयसिंगाचा निरोप घेऊन शिवाजी महाराज पाच दिवसात पन्हाळ्याला पोहोचले. सूर्यास्तापूर्वी तीन तास आधी त्यांनी पन्हाळ्यावर हल्ला केला. तथापि तिथली फौज सावध होती. त्यांनी निकराचा लढा दिला आणि महाराजांचे 1000 सैनिक मारले गेले व जखमी झाले. महाराजांनी तिथून माघार घेतली आणि ते विशाळगडावर निघून गेले. तरीही त्यांनी सिद्धी मसूद व रणदुल्ला खान याच्या नेतृत्वाखाली 6000 फौज कैद केली.
पन्हाळ्यावरील अपयशाला नेताजी पालकर जबाबदार होते. ठरलेल्या वेळी व ठरलेल्या ठिकाणी ते नसल्यामुळे महाराजांना अपयश आले. म्हणून त्यांनी नेताजीला पदावरून कमी केले. परंतु विजापूरकरांनी नेताजीला चार लाख होनांचा प्रस्ताव दिला आणि तो स्वीकारून नेताजी ने मुघलांच्या हद्दीत लुटालुट सुरू केली. जयसिंगाने नेताजी ला 20 मार्च रोजी उच्च मनसब देण्याची तयारी दाखवली व 50 हजार रुपये रोख रक्कम देऊन जहागीर दिली आणि मुघलांच्या सेवेत दाखल करून घेतले .
तथापि जानेवारी 1666मध्ये नेताजी मुघलांपासून अलग झाला. मग शिवाजी महाराजांनी ही असेच केले तर मुघल परत अडचणीत येतील हे पाहून जयसिंगाने बादशहाला लिहिलं की- आता आदिलशहा आणि कुतुबशाह यांनी हात मिळवणी केली आहे. त्यामुळे हर प्रकारे शिवाचं हृदय जिंकून त्याला बादशहांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी उत्तरेत पाठवून देणे आवश्यक झालं आहे. बादशहाच्या संमतीनंतर जयसिंगाने शिवाजी राजांनी शाही दरबारात भेट द्यावी यासाठी प्रयत्न सुरू केले.
दिलीप गायकवाड.
०९-०४-२०२४.
No comments:
Post a Comment