लेखन :
गडवाटकरी 'सचिन पोखरकर'
महाराणी
 ताराबाई यांच्या कालखंडात नर्मदा नदी पार करून उत्तरेत मोगलांच्या अनेक 
प्रांतावर भगवा झेंडा फडकविणारे नेमाजी शिंदे हे पराक्रमी वीर होते. माळवा 
प्रांतातील उज्जैन, काळाबाग इत्यादी अनेक प्रांतावर नेमाजींनी वचक निर्माण 
केला होता. महाराष्ट्रातील औरंगजेबाच्या सेनेवर दबाव आणण्यासाठी महाराणी 
ताराबाईंनी उत्तरेत मोगलांच्या प्रांतावर हल्ला करण्याचे धोरण आखले होते. 
छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांची खानदेशात नेमणूक केली होती. छत्रपती 
राजारामाच्या कालखंडात त्यांनी मोगलांच्या ताब्यातील खानदेश प्रांतावर 
हल्ला करून नंदुरबार, शिरपूर, थाळनेर इत्यादी गावातील खजिना स्वराज्यात 
आणला होता. नेमाजींनी माळव्यात मोगलांवर.मोठे विजय संपादक केले होते. गनिमी
 काव्याने लढणारे नेमाजी शत्रूपक्षावर अचानक हल्ला करून गनिमांकडून आपल्या 
लोकांचे नुकसान होण्याअगोदर खजिना घेऊन पसार होत. खानदेशात मोगलांवर.प्रचंड
 विजय मिळवून नेमाजींनी वर्हाड वर आक्रमक केले होते. मोगल बातमी पत्रात 
नेमाजी शिंदे चाळीस हजार स्वार व पायदळ सह वर्हाड मध्ये दाखल झाल्याची नोंद
 आहे. मोगलांचा वर्हाडचा सुभेदार गाजिउद्दीन फिरोजजंग याचा नायब रूस्तमखान 
हा प्रचंड सैन्यासह नेमाजी वर चालून आला. नेमाजींच्या फौजेने मोगलांचा 
जबरदस्त पराभव केला. रूस्तमखान जखमी होऊन मराठ्यांच्या कैदेत सापडला. दोन 
हजार मोगली स्वार या लढाईत ठार झाले.
मार्च
 1704 मध्ये नेमाजींनी माळव्यातील मालोदा या गावावर हल्ला करून तेथील खजिना
 स्वराज्यात आणला. शाहु महाराज सुटका झाल्यानंतर त्यांना सुरवातीला मिळणारे
 #सरदार सेनानी मध्ये नेमाजी होते. शाहू महाराजांच्या आदेशानुसार बहादुर 
शहास मदत म्हणून नेमाजींनी हैद्राबाद जवळ कामबक्ष च्या सेनेवर हल्ला केला. 
शाहु महाराजांच्या तर्फे नेमाजींनी अनेक युध्दात भाग घेतला.
#उत्तरेतील_मराठयांचा_दरारा
फोटो - काल्पनिक सरदार

No comments:
Post a Comment