विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 2 May 2024

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज, फ्रेंच, हैदर आणि निजाम या सर्वाना पुरून उरावे अशी मुत्सद्देगिरी आणि लढाऊ बाणा दाखवला ते म्हणजे “सेनापती मुरारराव घोरपडे”...🚩

 


अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज, फ्रेंच, हैदर आणि निजाम या सर्वाना पुरून उरावे अशी मुत्सद्देगिरी आणि लढाऊ बाणा दाखवला ते म्हणजे “सेनापती मुरारराव घोरपडे”...
🚩लेखन :

गडवाटकरी 'सचिन पोखरकर'

● रियासतकार सरदेसाई यांनी मुराररावांचे मूल्यमापन यथायोग्य केले आहे :
‘मुरारराव म्हणजे कर्नाटकातील मराठेशाहीचा मूर्तिमंत इतिहास होय...’ हे वर्णन करताना रियासतकारांनी मुराररावांच्या शौर्याचा आणि स्वाभिमानाचा गौरवपूर्वक उल्लेख केलेला आहे. हैदराशी त्यांनी ज्या बाणेदारपणाने लढा दिला त्याला तर तोड नाही. मुराररावांनी बाणेदार वर्तन करून शत्रूपुढे शूर पुरुषास शोभण्यासारखा आपला शेवट करून घेतला, असे सांगत असताना रियासतकार म्हणतात, “मुराररावांचे बाणेदार वर्तन अद्यापी या देशात ताजे आहे. त्यांना गुत्तीच्या वेढ्यात अडकून पडावे लागले आणि पराभवही पत्करावा लागला. पण तो पत्करीत असताना त्यांनी शरणागती स्वीकारली नाही की अपमानकारक तडजोडही केली नाही...” या गुणांमुळेच रियासतकारानी मुराररावांना शूर राष्ट्रपुरुषांच्या मालिकेत समाविष्ट केले आहे..
मुरारराव इतिहासात 'चीफ ऑफ गुत्ती' या नावाने विशेष उल्लेखले जातात. त्यांच्या काळात घोरपड्यांचे सैन्य दक्षिण भारतात अनेक ठिकाणी घोडदौड करीत होते. रियासतकार सरदेसाई यांनी मुराररावांच्या पराक्रमाची वर्णने केली आहेत. एके ठिकाणी त्यांनी म्हटले आहे. 'कर्नाटकात उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक कागदपत्रांत घोरपड्यांचे उल्लेख अनेक ठिकाणी सापडतात. सोंदा, बिदनूर, सिरा, श्रीरंगपट्टम्, चितळदुर्ग, गुत्ती, सोंडूर गुंटकल, कडाप्पा, त्रिचनापल्ली आणि चेनापट्टम (मद्रास). तसेच, पांडेचरी, पूर्व किनारा या सर्व ठिकाणांचे उल्लेख घोरपड्यांच्या कागदपत्रात आढळतात. हा सर्व प्रदेश आपल्या राज्यातील आहे, असे मुराररावांनी अनेक ठिकाणी म्हटले आहे. हा प्रदेश मिळवण्यासाठी घोरपडे घराण्यांतील पुरुषांना आपले प्राण गमवावे लागले..”
――――――――――――
🎨 ओंकार जगताप 👌🏼♥️🔥

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...