!!छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती थोरले शाहू महाराजांनी जयंती निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा!!
श्री महाराष्ट्र देशाधिपति, शौर्योदार्यगुणप्रख्यात, राजा शंभू छत्रपती राजानें, आपुला स्वधर्मयुक्तविहित मार्गानें राज्य परिपालन करताना व , देशाच्या अगदीं दक्षिणेकडच्या प्रदेशांत, त्याच्या ताब्यांतील जे लढाऊ किल्ले होते, त्यांची व्यवस्था छत्रपती संभाजी महाराजांना योग्य पद्धतीने लावले, त्यांचा त्यानें अंशतः उपयोग राज्य कारभार व प्रदेशाच्या संरक्षण करण्यासाठी केला होता. आपल्या अमलाखालील प्रदेशाचे त्यानें प्रांत (जिल्हा) म्हणून अनेक भाग केले होते. पुण्याजवळील वडिलोपार्जित जहागिरी जो वेरूळ, इंदापूर, पुणे, सुप शिवाय त्याच्या ताब्यांत पुढील प्रांत होते. १) मावळाप्रांत---हलींचे मावळा, सासवड, जुन्नर आणि खेड हे तालुके --व त्याच्या सभोंवतींचे १८ डोंगरी किल्ले;
२) वांई, सातारा आणि क-हाड हे प्रांत-हल्लींचा सातारा जिल्ह्याचा पश्चिमेचा भाग-व त्यांच्या भोंवतींचे १५ डोंगरी किले;
३ )पन्हाळा प्रांत -हल्लींचा कोल्हापूर इलाख्याचा पश्चिमेचा भाग व १३ डोंगरी किल्ले;
४ )दक्षिण कोंकणप्रांत-हल्लींचा रत्नागिरी जिल्हा व ५८ डोंगरी किल्ले आणि जलदुर्ग;
५) ठाणेंप्रांत-हल्लींचा उत्तर कोंकणभाग व १२ किल्ले;
६)त्रिंबक आणि बागलाण प्रांत-हल्लींचा नाशिक जिल्ह्याचा पश्चिमभाग व ६२ डोंगरी किल्ले. या प्रांताखेरीज त्याच्या शिबंदी लष्कराची ठाणीं पुढील प्रांतांत होतीं
. ८)वनगड प्रांत-हल्लींचा धारवाड जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग व २२ किल्ले;
९,) बिदनूर, १०कोल्हार ११)श्रीरंगपट्टण-हल्लींचा म्हैसूरप्रांत या तीन विभागात १८ किल्ले; १२) कर्नाटक प्रांत -हल्लींच्या मद्रास इलाख्यांत सामील केलेला कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील प्रांत व १८ किल्ले १३)वेलोरप्रांत-हल्लींचा अर्काट जिल्हा । व २५ किल्ले; आणि
१४) तंजावर प्रांत व ६ किल्ले-सदर तंजावर प्रांत हे तंजावर छत्रपती कडे होते...
स्वराज्य विस्तार
. सह्याद्रीच्या सर्व रांगेवर लहान मोठे किल्ले व पश्चिमेस समुद्रकिना-यापर्यंत व ह्या किल्लयांच्या पूर्व प्रदेशापर्यंत मधील प्रदेशाची रुंदी ५० मैलांपासून फार तर १०० मैलांपर्यंत होती.तळटिप- तत्कालीन काळात एक मैल म्हणजे आजचा सव्वा दोन किलोमीटर होय..
प्रांत म्हणजे जिल्हा कारभाराच्या सोयी साठी समजून घेणे..
विशेष:- १७०७ नंतर छत्रपती संभाजी महाराज पुत्र थोरले शाहू महाराजांनी सदर प्रदेशातील छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर यांच्या ताब्यात असलेले प्रदेश सोडून बाकी सर्व प्रदेश आपल्या अमंलखाली आणले कारण हे छत्रपती कैलास वासी थोरले महाराज साहेब यांच्या कडून आपल्या वडिलांनी मिळाले असे छत्रपती शाहू महाराज बोलत हे विशेष......
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे 9049760888
No comments:
Post a Comment